अतूट नाते..!

Unbreakable Bond Of Love❤
मी होते एक विझलेला दिवा
अंधारात खितपत पडलेला...

तू दिलीस मला नवी ज्योत,
ऊर्जा अन् बरंच काही...!

पावलोपावली सांभाळून घेतलं
आणि सावरून घेतलंस तू...

प्रत्येक क्षण नि श्वास
तुझ्याशी शेअर केला...

आज जरी मी असले गर्तेत
तरी तुझीच निरागस प्रतिमा
स्पष्ट दिसते माझ्या नजरेत...

असले जरी मी दूर
तरी तुझ्याच आठवणीत रमणार..

केली आहे मैत्रीच तर
ती शेवटपर्यंत निभावणार...

हा एक ध्यास आहे मैत्रीचा,
तुझ्यावर असलेल्या विश्वासाचा...

हे आहेत बंध मैत्रीचे,
विश्वासाचे आणि आपुलकीचे...

जे तोडूनही तुटणार नाहीत
असे हे अतूट नाते मैत्रीचे...!!

©️®️ अबोली डोंगरे.