Login

उंच माझा झोका भाग

एका अपमानित स्त्रीची भरारी
जलद कथालेखन स्पर्धा माहे जुलै 2025

उंच माझा झोका
भाग -1

"तू... तू.... तुम्ही....?"

आत मध्ये पाय ठेवताच समोर जे दिसलं ते बघून राजीव लडखडत उभा राहिला .त्याची जणू बोबडीच वळली होती. तोंडातून शब्दच फुटत नव्हता. तो समोर कोणाला बघत होता.
तो एका प्रख्यात आयटी कंपनीत इंटरव्यू द्यायला आला होता.
पण समोर रसिकाला बघून त्याच्या पायातले बळच गेले.
आणि नकळत त्याच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले.

हे तर निश्चितच झाले होते की त्याला ती नोकरी मिळणे आता शक्य नव्हते.
रसिकाचीही त्याचा आवाज आणि प्रश्न ऐकून एकदम चलबिचल झाली. तिने वर पाहिले ती बघतच राहिली. आणि सावरत म्हणाली,

"का...?शक्य नाही...? मी या खुर्चीवर असू शकत नाही ?
अं...हो... अक्कल नाही ना मला. विसरलेच मी."
ती अतिशय खोचकपणे आणि तेवढेच बाणेदारपणे उत्तरली.

टेबल समोरच्या खुर्चीकडे हात दाखवत म्हणाली, " बसा "

तरी त्याला उभेच बघून म्हणाली, "फाईल टेबलवर ठेवून जा. बाहेर बसा. बोलावते नंतर."

आता आत रसिकाचे रक्त तापले होते. तर बाहेर राजीव सैरभैर अवस्थेत.आत ती परेशान तर बाहेर तो.

काय संबंध होता दोघांचा? दोघं तर वेगळे झाले होते.दोघांच्या वाटा वेगळ्या. तरी...
रसिका विचार करत होती, "हा इथे?बरी संधी साधून आली आपणहून. सिलेक्ट करून घेऊयात याला.
त्याने जेवढा त्रास दिला ना,जेवढं गांजलं, जेवढा अपमान केला, माझी औकात काढली होती.त्याचा बदला घेण्याची संधी दिली आहे देवाने ही.अजूनही विचातोय म्हणजे विश्वास नाहीच आपल्यावर. दाखवून देवू 'मी' कोण, काय करु शकते ते.

इकडे राजीवचे विचार चक्र भलत्याच दिशेने चालू होते. ही एवढ्या मोठ्या पोस्टवर कशी पोहोचली? कधी पोहोचली? आपल्याला काहीच कसं कळलं नाही.

राजीव- रसिका दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर. दोघांचीही कुटुंब मध्यवर्गीय. दोन्ही कुटुंबातील घरच्यांच्या पसंतीने विवाह ठरलेला.
राजीव एका मोठ्या आयटी कंपनीत नोकरीवर. तर रसिका नुकतीच इंजिनियर झालेली. तिचेही कॅम्पस सिलेक्शन झालेले. आई वडिलांना वाटले राहील आपल्याजवळ चार सहा महिने. तोवर चांगलं स्थळ बघू आणि लग्न करून देऊ नंतर तिच्या घरी गेल्यावर बघेल ती नोकरीचे.

ती लग्न होऊन सासरी आली. सासू-सासर्‍यांचेही तेच म्हणणे आपल्या घरी काही कमी नाही. राजीवचा पगारही पुरेसा आहे.
पुढे करता येईल.

पण राजीव फार इगोष्टिक. फार अहमपणा होता त्याच्या ठिकाणी.
लग्नानंतर लवकरच रसिकाच्या लक्षात आले,
तो नेहमी रसिकाला कमी लेखायचा. त्याच्या लेखी ती म्हणजे बुद्धूच. तिला काहीच येत नाही. नोकरी नाही. तो तिला नेहमी त्याच्या ऑफिस मधील मुलीचे उदाहरण द्यायचा.
"तिची राहणी, वागणे बोलणे बघ नाहीतर तू."
घरी आल्यानंतरही तिच्यासोबत फोनवर घंटा घंटा बोलायचा.

रसिका एकदमच साधी. जरी ती इंजिनियर असली तरी तिला ज्याला आपण चंगळ वाद म्हणू असे शोक नव्हते.

याउलट राजीव हाय फाय लाईफ जगणारा. त्यासोबत येणारे बाई, बाटली,सिगारेट हे शोक करण्यात त्याला फार मोठेपणा वाटायचा.

तो ऑफिसच्या लोकांसोबत फॅमिली ट्रीपला जायचा तेव्हा रसिकावरही दबाव आणायचा पण रसिकाला ते अजिबात आवडत नव्हते तिने कधीच त्या लाईफचा स्वीकार केला नाही.
त्यामुळे त्याला ऑफिसमधलीच ती मुलगी आवडायला लागली जी त्याच्यासारखीच हाय फाय लाईफ जगणारी होती. कमावती होती.
ह्या सगळ्याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला.

राजीव रसिकाला टाळायला लागला.घरी उशिरा येणे कामापुरते बोलणे. तिच्याही काही इच्छा आकांक्षा असतील,तिलाही बाहेर जावेसे वाटत असेल हे त्याच्या गावीही नव्हते. तो तिचा पान उतारा करण्याची एकही संधी सोडत नव्हता. त्याच्या लेखी तिची किंमत पायतणा इतकीच.
एक दिवस कहरच झाला.

क्रमश:
पुढील भाग -2 मधे
राजीव नेमकं काय करतो रसिका सोबत ते वाचु पुढील भागात.

©®शरयू महाजन
0

🎭 Series Post

View all