उंच माझा झोका
भाग -2
भाग -2
रसिका खूप समंजस आणि सोशिक. मोजकं बोलणारी पण आपल्या गोड हसण्याने सगळ्यांना आपलंसं करणारी. उगाच वाद-विवाद करणे किंवा कोणी अरे म्हटले तर आपण कारे म्हणणे तिच्या स्वभावातच नव्हते.तिने कधी नवऱ्याबद्दलही तक्रार केली नाही. ना माहेरी ना सासरी.
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो.
म्हणून ती त्याच्याकडे दुर्लक्ष करायची.
तिचे सासू-सासरे पण खूप चांगले होते.तिचं त्यांच्याशी छान पटायचं.
त्यांनाही राजीवचं वागणं पटायचं नाही. तेही अधून मधून टोकत राहायचे त्याला.
............

रसिकाला त्यादिवशी थोडे बरे नव्हते.
तिने त्याच अवस्थेत राजीवचा टिफिन बनवला भाजीत मीठ घालायला विसरली.
झाले तेवढेच निमित्त पुरेसे होते. त्याने रसिकाला जेवढे बोलून घेता येईल तेवढे घेतले. तिच्या आई-वडिलांचाही उद्धार करून टाकला. तुझ्या आईने असेच शिकवले का? तू बिनडोक आहेस. तुला अक्कल नाही. तुला काहीच जमत नाही तर लग्न कशाला केलेस?हा दगड माझ्याच नशिबी होता का? तोंड काळे कर.... वगैरे वगैरे.
गेल्या वर्षभरापासून रसिका खूप सगळं सहन करत आली होती.पण... हे बोलणे तिच्या वर्मावर लागले. अंतरंगातून व्यथीत झाली ती.

त्याला आपली किंमत नाही हे क्षणभरासाठी सोडून देऊयात. ठीक आहे आपले नशीब. पण माझ्यापासून त्याला जर सुख लाभत नसेल,त्याला त्याच्या संसारात मी नकोशी झाली असेल तर असा भार बनून संसार कशासाठी करायचा? त्याला मोकळे करूयात ना,त्याला शोभेल अशी शोभेशी(ची) बाहुली घेऊन यायला.
मन विदीर्ण झालेल्या अवस्थेत उद्विग्न होऊन तिने कुणाशीही काहीही न बोलता स्वतः ठामपणे निर्णय घेतला.
बस इथे थांबायचे.
इथून आपली वाट वेगळी असेल.
बस इथे थांबायचे.
इथून आपली वाट वेगळी असेल.
मी दगड, मी बिनडोक,मला अक्कल नाही. हा त्याचा समज खोटा ठरवायचा. त्यालाही कळलं पाहिजे आयुष्यात की आपणही चुकलो काही बोलण्यात आणि वागण्यातही.
'मी' कोण हे दाखवून देईन एक दिवस.
निश्चय करून निघाली.
तिला आता एक मिनिटही त्या घरात थांबायचे नव्हते.
आवश्यक तेवढे कामापुरते पैसे आणि अंगावरच्या कपड्यासोबत एक जोडी कपडे घेऊन ती बाहेर पडली. सरळ रेल्वे स्टेशनवर आली. कुठे जायचे माहिती नव्हते समोर जी ट्रेन उभी होती त्या ट्रेनचे तिकीट काढले आणि निघाली.ती थेट पुण्याला पोहचली.
तिथे तिची एक कॉलेजची मैत्रीण राहत होती. ती पण एकटीच रहात होती रुम करून. रसिका तिच्याकडे गेली. तिथून तिने त्याचदिवसापासून नोकरी शोधायला सुरुवात केली.

तिच्याकडे बीई ची डिग्री होतीच.
एका छोट्या कंपनीत तिला नोकरी मिळाली .
सुरुवात तर करूयात नंतरचं नंतर बघू म्हणून तिने ती स्वीकारली आणि तिचं नवीन जीवन सुरू झालं.
क्रमश:
पुढील भागात
भाग-3मधे
©®शरयू महाजन

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा