लग्नानंतरच्या प्रत्येक गोष्टीत मुलीला आईं नव्याने कळते.
कसं ते बघा. म्हणजे हा माझा अनुभव आहे तो इथे मांडत आहे. कदाचित तुम्हाला ही असे जाणवले असेल.
मी लग्नाआधी जॉब करायचे. 9 वाजता ऑफिस ला पोहचावे लागे. त्यासाठी सगळं अवरून घरातून 8.30 ला निघाव लागे.
सकाळी तर माझी खूप घाई उडे. सगळ्यांनाच घाई असे. त्यामुळे मी आईला म्हणे," आईं, सकाळी मला काही तुला स्वयंपाक मध्ये मदत करायला येत नाही. हवं तर मी संध्याकाळी सगळं करेन. पण सकाळी जमण अवघड. प्लीज समजून घे." ती पण समजून घेई.
संध्याकाळी मी घरी येईपर्यंत तिने बऱ्यापैकी सगळं अवरले असे. एखादा पदार्थ करणे फक्त बाकी ठेवे का तर कामाची थोडीफार सवय असावी म्हणून.
पण हेच जेव्हा मी लग्न होऊन सासरी गेले तेव्हा सकाळी लवकर उठून नाश्ता , डबा करून मग मला ऑफिसला जावे लागे. तेव्हा ही मला 8.30 ला च निघाव लागे. पण तेव्हा हे सगळ करून निघाव लागे.
त्यावेळी मला जाणवलं आईं किती समजून घेती आपल्याला.
माझ्या पाळीच्या दिवशी मला खूप त्रास होई. त्यामुळे त्या दिवसात सकाळी उठले की मला अधी अंघोळीला जायचं असायचं. आई माझा होणारा त्रास बघत असल्याने ती मला अंघोळीसाठी बाथरूम रिकामं झाले की उठवायची.
पण आता सासरी अस होत नसत ना. इथं आपल्यालाच सकाळी लवकर उठून पाणी तापवून मग सगळ आवरून परत नाश्ता ,डबा करून वेळेत ऑफिस मध्ये पोहचाव लागत.
त्यावेळी आईं नव्याने कळते. आपल्याला होणार त्रास ती किती अचूक ओळखते.
सासरी, सगळ्यांनच्या अवडी निवडी जपताना , जेवणाच्या वेळा, नखरे जपताना आईं आठवते ,तिने कसे काय आपले नखरे, वेळा जपल्या.
मी आधी ऑफिस मधून घरी आले की आईं बरोबर गप्पा मारत असे. दिवसभर मोबाईल बघायला वेळ मिळत नसल्याने कधी कधी मी मोबाईल हातात धरून
कान तिच्याकडे करून ऐकत असे. त्यावेळी ती नेहमी म्हणे, " ठेव तो मोबाईल, इकडे बघ, लक्ष दे"
तेव्हा मी म्हणे," आहे लक्ष बोल"
आता जेव्हा माझा नवरा सेम असच करतो तेव्हा मला ते आवडत नाही. पुढची व्यक्ती बोलत असताना मोबाईल मध्ये काय लक्ष द्यायचं अस होत. मग त्यावेळी वाटत, आपण असे आईबरोबर करताना तिला पण वाईट वाटले असेल ना.
बिचारी दिवसभर कोण बोलायला नसते म्हणून संध्याकाळी आपण दिसल्यावर बोलायला येते तर आपण मोबाईल वर.
लग्नाआधी आईं मला दररोज विचारी," काय करू भाजी सांग, दररोज काय वेगळं करायचं, सुचत नाही"
तेव्हा मी म्हणे, " कर काय पण, त्यात काय इतकं विचार करण्यासारखं"
पण हीच वेळ जेव्हा मी सासरी गेल्यावर माझ्यावर आली तेव्हा जाणवलं.
आपण एक दोन महिन्यातच दररोज काय नवीन करायचं हा विचार करून कंटाळलो मग आईं तर इतक्या वर्षापासून हे सगळं करत आहे, ती किती कंटाळली असेल.
एक दोन महिन्यातच मला या सगळ्या गोष्टी जाणवल्या.
मला आईच कौतुक वाटते, त्यावेळी ती जॉब करून, आम्हाला सांभाळून, घरच्यांचं सगळं बघून, सण वार उत्साहात करत असे.
आता मात्र आपल्याला हे सगळं म्हणजे दमछाक वाटते.
मी जेव्हा माहेरी गेले तेव्हा मी आईला हे सगळ सांगितलं.
मी म्हणलं," आईं, सासरी गेल्यावर तू काय आणि किती करतेस हे कळलं. जेव्हा हे सगळं मला करायची वेळ आली तेव्हा जाणवलं. लग्न झाल्यापासून सासू सासर्यांचे सगळ करते मी, सगळ हातात देते तेव्हा मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटत. ते तर माझे सासरचे, तस बघायला गेलं तर त्यांनी माझ्यासाठी काही केलं नाही तरी पण मी सगळं करते त्यांच्यासाठी, सगळं वेळेत हातात देते, तू तर माझी आई ,लहानपणापासून तू माझं किती केलस पण मी तुझी म्हणावी तशी सेवा करू शकले नाही."
आई म्हणली -" अग त्यात काय इतकं, प्रत्येक आईं आपल्या लेकरासाठी एवढ करतेच"
मी -," तरी पण आईं, ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव मला आधी झाली असती तर मी इथे असताना तुला काही करू दिलं नसत . पण आता एक करू शकते, या पुढे तू माझ्याकडे आलीस कीवा मी इकडे आले तर तू काहीच करायचं नाहीस. सगळी कामं मी करणार , तू फक्त आराम करायचास."
आईनेही माझ्या समधानासाठी हो म्हणले.
पुढच्यावेळी मी जेव्हा माहेरी गेले तेव्हा मी आईला काही करू देत न्हवते. तिला आराम करायला लावला.
पण थोड्याच वेळाने आईं माझ्या जवळ आली आणि म्हणली, " बस झाल आता, तिकडे सगळं तू करतेच ना, माहेरी पोरीने अरामासाठी यावं. बास आता. आराम कर"
अजूनही माझे प्रयत्न चालूच आहेत. पण शेवटी आईं ती आईच.
आई आपल्यासाठी करते हे आपण मान्यच करतो पण किती आणि काय करते हे आपण स्वतः त्या गोष्टी करू लागतो तेव्हा जाणवत.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा