कथेचे नाव : एक उन्हाळी सुट्टी अशीही....
" पोलीस पोलीस, आशा प्रवीण वरद टाळ्या वाजवा लवकर लवकर. " स्वाती चा आवाज ऐकून बाकी कोणाचे तिच्याकडे लक्ष गेले नाही, पण खाली रस्त्यावर थांबलेल्या पोलीस दादांनी मात्र गच्चीकडे बघून स्वातीचे अभिवादन स्वीकारले. तिची घाई, पोलिसांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची उत्सुकता पाहून पोलीस दादा थांबले होते.
तेवढ्यात स्वातीच्या मागून आशा प्रवीण आणि सगळी गॅंग आली . पाच-सहा जणांनी एकदम टाळ्या,थाळ्या , पिपाणी यांच्या आवाजाने वातावरण भारावून टाकले. निमित्त होते माननीय पंतप्रधानांच्या आदेशाचे! मार्च 2019 मध्ये कोरोना महामारी जाहीर झाल्यानंतर, महामारीचा उद्रेक होऊ नये म्हणून, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, काम करणाऱ्या पोलीस, डॉक्टर्स, तर जीवनावश्यक सेवा देणारे यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची. देशाची एकता शांतता अबाधित आहे याचा जगाला संदेश देण्यासाठी माननीय पंतप्रधानांनी दिलेल्या आदेशाचे पालन त्यावेळी देशवासीयांनी केले होते. त्यापैकीच एक पेरकर कुटुंब.
पेरकर कुटुंबाकडे एक घरगुती समारंभ होता. त्यासाठी त्यांच्याकडे त्यांच्या दोन बहिणी मुले आले होते. दोन-तीन दिवसानंतर कोरोना आणि देशाला गिळंकृत करू नये, म्हणून लॉक डाऊन चा निर्णय जाहीर झाला. बघता बघता सगळीकडे शुकशुकाट दिसू लागला. बसेस बंद, कार्यालय बंद, बाजार बंद !!
या बंदमुळे देशच ठप्प झाला. रोज येणाऱ्या महामारीच्या बातम्या सगळ्यांची झोप उडवत होत्या. कॉरंटाईन, सॅनिटायझर , वाफ घेते हे शब्द परवलीचे झाले होते. परत आपल्या प्रियजनांना भेटू शकू की नाही, हे जग परत बघता येईल की नाही, या भीतीनेच सगळ्यांप्रमाणे पाहुण्यांनी गजबजलेले पेरकर कुटुंबीय चिंतेत होते.
लॉकडाऊन सुरू होऊन पंधरा दिवस होत आले होते. दररोज बातम्या बघताना सर्वांचे प्राण कंठाशी येत असत. आता तरी लोक डाऊन थांबेल, आपल्या लेकरांकडे नवऱ्याकडे वापस जाता येईल याच आशेवर स्वाती आणि आशा रोजचा दिवस कंठत होत्या.
पण लॉकडाऊन मारुतीरायाच्या शेपटासारखे लांबतच चालले होते . आता तर टीव्हीवरील मालिका संपून दूरदर्शन शिवाय इतर सर्व चॅनल बंद पडले होते. रामायण, महाभारत,आणि बातम्या याशिवाय करमणुकीचे साधन राहिले नव्हते.
घरात कामवाली नाही की बिल्डिंगमध्ये दुसरे कोणी नाही . यावेळी संपूर्ण अपार्टमेंट मध्ये फक्त दास खेडकर कुटुंबीय होते. त्यामुळे काही गप्पा मारण्याचा, मन रमवण्याचा प्रश्नच येत नसे.
पण परिस्थिती माणसाला शिकवते हे खरे आहे. परिस्थितीमुळे अडकलेल्या या कुटुंबाने स्वतःभोवती आवरण तयार करून घेतले. स्वतःचाच एक दिनक्रम तयार केला.
सकाळी उशिरा उठणे, चहा सोबत गप्पांची एक फेरी पूर्ण करणे. घराची सफाई करणे, भांडी, कपडे , नाश्ता , स्वयंपाक या या कामांची विभागणी केली होती. स्वाती, आशा, अंजली मिळून आलटून पालटून ही कामे करत असत.
मुलांनी मात्र *बॉडी बिल्डिंग* करण्याचा चंगच बांधला होता. सकाळी गच्चीवर व्यायाम करायचा, त्यानंतर रामायण बघत भरपेट नास्ता, थोडा आराम, दुपारचे जेवण परत आराम. यामुळे सर्वांची बॉडी मात्र चांगलीच बोल्ड होत होती.
दुपारच्या आरामनंतर मात्र पारंपरिक खेळाची मेजवानी असे. गाण्याच्या भेंडया, काच पाणी, लुडो यात सर्वजन सहभाग घेत.
दुपारच्या आरामनंतर मात्र पारंपरिक खेळाची मेजवानी असे. गाण्याच्या भेंडया, काच पाणी, लुडो यात सर्वजन सहभाग घेत.
संध्याकाळी मात्र गच्चीवर फिरायला जाणे, म्हणजे कुटुंबीयांसाठी एक उत्सव असायचा. फ्रेश होऊन, छान तयार होऊन, कळकट उदास झालेले *गाऊन* बदलून घरातील महिला मंडळी गच्चीवर फिरायला जात असत. यांना सोशल मीडियावरील वॉकिंग चा व्हिडिओ चे वेड लागले होते. वॉक करून, आपणही त्या मॉडेल सारखे 'चवळीची शेंग ' होऊ, या अट्टाहासापाई तिघीजणी आणि आई कंबर मोडेपर्यंत *वॉक वॉक वॉक* करत. यात कोणाच्या कमरेचा घेर जराही कमी झाला नाही, मोबाईल रिचार्ज करण्याचे प्रमाण मात्र वाढले.
असो., कोणत्याही एका रुटीनचा माणसाला लगेच कंटाळा येतो. पेरकर कुटुंब देखील त्या रुटीनला कंटाळले.
उन्हाळी सुट्टी म्हटलं की मामाच्या गावी जावं,, पोटभर आंबे खावे, यथेच्छ खेळावं हे समीकरण ठरलेले असते. पण या उन्हाळी सुट्टीत मात्र मामाच्या गावी येऊन देखील भाचे कंपनीला बंदिस्तच राहावं लागलं होतं.
मामाच्या मोठ्या गावातील सोन्या-चांदीच्या पेठा बंद झाल्या होत्या. नवीन कपडे घेण्याचा प्रश्नच येत नव्हता. मामाची बायको देखील त्या गीतातील मामी इतकीच " सुगरण" होती.
फक्त " रोज रोज पोळी शिकरण " च्या ऐवजी " पोळी वरण" असे . पण अंजली मात्र त्या मानाने जरा चतुरच! तिने एक युक्ती केली. खरोखरच सुगरण असलेल्या आशाताईंना तिने सोशल मीडियावर एक पाककृतीचे चॅनल सुरू करण्याचा सल्ला दिला.
मामाच्या मोठ्या गावातील सोन्या-चांदीच्या पेठा बंद झाल्या होत्या. नवीन कपडे घेण्याचा प्रश्नच येत नव्हता. मामाची बायको देखील त्या गीतातील मामी इतकीच " सुगरण" होती.
फक्त " रोज रोज पोळी शिकरण " च्या ऐवजी " पोळी वरण" असे . पण अंजली मात्र त्या मानाने जरा चतुरच! तिने एक युक्ती केली. खरोखरच सुगरण असलेल्या आशाताईंना तिने सोशल मीडियावर एक पाककृतीचे चॅनल सुरू करण्याचा सल्ला दिला.
बऱ्याच चर्चेअंती सर्वानुमते चॅनल सुरू करण्याचे ठरले. सुस्त झालेल्या पेरकर कुटुंबात चैतन्य आले. एका दगडात अनेक पक्षी मारले होते. एक तर सगळ्यांमध्ये उत्साह वाढला. नवीन काहीतरी करायचे म्हणून सगळे कामाला लागले आणि अंजलीचे स्वयंपाकाचे काम कमी झाले !
चॅनलचे नाव ठरले "खमंग तडका " मग काय विचारता. जो तो कामाला लागला. साहित्याची जमवाजमव, पदार्थांची नावे, त्यासाठी लागणारी भांडी तयारी करून व्हिडिओ शूटिंग सुरू झाले.
" नमस्कार मी आशा, खमंग तडका या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. " या ओळीसाठी अगणित वेळा रिटेक घ्यावे लागत होते. बोलता बोलता कधी चॅनल चे चायनल होत असे, तर कधी खमंग तडका म्हणताना गडबड उडत असे. शूटिंगच्या वेळी मात्र अशा गमतीजमती होत, आणि हसता हसता सर्वांची पुरेवाट होत असे. व्हिडिओ शूट मध्ये कधी करणाऱ्याचा पाय दिसे तर कधी दुसऱ्या कोणाची सावली! कधी गॅसवर उतू जाणारा चहा!!
साहित्य उपलब्ध नसेल तर त्याऐवजी यासारखे दिसणारे दुसरे साहित्य वापरून वेळ निभावावी लागत होती. केक सजवण्यासाठी क्रीम मिळाली नसल्यामुळे अगदी आर्टिफिशियल फुलांनी केकची सजावट करावी लागली होती. पण या सगळ्यांमध्ये पेरकर कुटुंबाचा वेळ मजेत जात होता. वेगवेगळे पदार्थ चाखायला मिळत होते.
साहित्य उपलब्ध नसेल तर त्याऐवजी यासारखे दिसणारे दुसरे साहित्य वापरून वेळ निभावावी लागत होती. केक सजवण्यासाठी क्रीम मिळाली नसल्यामुळे अगदी आर्टिफिशियल फुलांनी केकची सजावट करावी लागली होती. पण या सगळ्यांमध्ये पेरकर कुटुंबाचा वेळ मजेत जात होता. वेगवेगळे पदार्थ चाखायला मिळत होते.
कधी स्वतःसाठी चहा सुद्धा न करून घेणाऱ्या मामालाही पाककलेची प्रेरणा मिळाली. त्यांनी हे चॅनेलसाठी 'पनीर भुर्जीची ' पाककृती करून दाखवली.
या सगळ्यांमध्ये उन्हाळी सुट्टी मजेत घालवणे सुरू होते. दिवस जात होते, मात्र लॉकडाऊन संपत नव्हते. स्वाती आणि आशा दोघींनाही आपापल्या घराची ओढ लागली होती. स्वातीची चिडचिड वाढत होती. तिची मुलगी, आजारी सासूबाई आणि नवरा शहरात होते. " हिनेच, हिनेच मला आग्रह केला. आता कर माझ्या पाठवण्याची व्यवस्था. आता काय मी बघू शकत नाही माझं घर, तुझ्यामुळेच झालंय सगळं अंजली... " स्वातीचा राग अंजलीवरच निघत होता.
त्यात भरीस भर म्हणजे स्वातीच्याच घराशेजारी राहणाऱ्या पुतण्याचा एक दिवस कॉल आला आणि बोलता बोलता तो सहज म्हणाला , " काकू तू काकाची काळजी करू नकोस. मस्त चालू आहे त्यांचं. आजीची काळजी घेण्यासाठी एक मावशी येतात. आणि त्या काकांनाही काय हवं नको ते बघतात. कदाचित काही दिवसात त्या घरीच राहण्यासाठी येतील... "
झालं!!!! आता मात्र स्वातीने सत्याग्रहच केला. "जोपर्यंत घरी जाता येणार नाही, तोपर्यंत अन्न त्याग करेल. "
बिचाऱ्या भावाने मात्र धावपळ करून, कोरोना टेस्ट करून , स्पेशल परवानगी काढून लाडक्या बहिणीला, आणि भाच्याला तिच्या गावी पोहोचवले. पुढच्या आठ दिवसात याच पद्धतीने आशा देखील तिच्या गावी पोहोचली.
आता मात्र अंजलीने उन्हाळी सुट्टीत येण्याचा आग्रह केला कि, स्वाती म्हणते,
" *नको बाई ती उन्हाळी सुट्टी, नको ते माहेर पण! तुझे तुलाच लखलाभ! मला माझा नवरा, माझा संसार गमवायचा नाही...*
" *नको बाई ती उन्हाळी सुट्टी, नको ते माहेर पण! तुझे तुलाच लखलाभ! मला माझा नवरा, माझा संसार गमवायचा नाही...*