Login

निरागसतेचा साज!

निरागसतेचा साज!
शीर्षक: निरागसतेचा साज!

हृदयाची स्पंदने
सांगतात प्रेम भाव
नको नात्यात
कशाचीच हाव

सजण्यासाठी चढवला
तिने निरागसतेचा साज
सख्याचा एका कटाक्षाने
आली तिच्या गालावर लाज

मनातल्या सुरांना
सखीची चाल लागते
प्रेमभावनेच्या शब्दांतच
सखी गीत मागते

एका गुलाबाने
सखीची कळी खुले
पुन्हा सख्याच्या थापांना
ती सुद्धा अशी अलगद भुले

© विद्या कुंभार

सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all