Login

अनोखे नाते भाग-३

अनोख्या नात्याची सुंदर विण
मुग्धा व मयुरीच्या गप्पा रंगत होत्या .मुग्धाची आजी जेवणाची तयारी करण्यासाठी कधी उठुन गेली कळलच नाही..दोघींच्या मैफिलीत तीसर कुणीच नव्हतं..फक्त बोलतांना मुग्धा मध्ये मध्ये रवीचा हात घट्ट पकडत होती व "हो ना रे मामा"..हेच वाक्य बोलत होती...

सागर सार चिञ फक्त बघत होता .आज मुग्धामध्ये त्याला दिप्तीचा भास होत होता..लग्नानंतर बरेचदा रवी आल्यावर तहान भुक विसरून दोघ भाऊ बहीण त्याने अश्याच मनसोक्त गप्पा मारतांना बघितलेली होती ...त्याच्या डोळ्यात सहजच आठवणीने अश्रू तरळले होते ..सागरचे वडिलही हा नजारा फक्त बघत होते...सागर मनाला सावरण्यासाठी घराच्या बाहेर येऊन उभा राहिला ..डोळ्यातील अश्रूंना सावरल तोच पाठिमागून खांद्यावर हात पडला ..मायेचा स्पर्श होता तो सागरच्या वडिलांचा...

दिप्ती हे जग सोडून गेली तेव्हा परिस्थिती खूप भयानक होती..सुखी समाधानी संसार असतांना अचानक एका दिवशी शिल्लक कारणाने सागर व दिप्तीत वाद झालेत व हातातील सहा महिन्याच बाळ तावातावात जमिनीवर ठेवत दिप्तीने सागरला घाबरवण्यासाठी बेडमध्ये गळफास लावण्याच नाटक केल..खरतर ती वेळच वाईट होती .खुप प्रयत्न करूनही दिप्ती वाचली नाही .दिप्तीचा हताताईपणा सर्व परिवाराला अस्ताव्यस्त करून गेला.

तो काळ खुपच भयानक होता तेव्हा सागरला वडिलांनीच सावरल होतं..एकुलती एक मुलगी अशी गेल्याने दिप्तीच्या वडिलांनी व नातलगांनी सागरला धारेवर धरल होत.त्यात रवीही होता .सहा महिन्याची मुग्धा सागरच्याच रक्ताची मग काय?मुग्धाकडे दिप्तीच्या वडिलांनी त्या क्षणापासून कधी बघितलही नव्हतं...

"जेव्हा मुग्धाला ञास होईल तेव्हा ह्या बापाच्या दु:खाची जाणिव ह्या नालायक माणसाला ".असे आंतविधीत जिवाच्या अकांताने दिप्तीचे वडिल सागरला बोलले होते..किती भयानक प्रसंग होता तो...काय?चुकल होत सागरच ..जिवापाड प्रेम केल होत दिप्तीवर सतत दिप्तीच्याच सुखाचा व विचारांच्या जोरावर चालला होता संसार...दिप्ती लाडकी होती मान्य होत ,दिसायलाही सुंदर होती पण अहंकाराने काठोकाठ भरलेली होती..उठता बसता सागरचा आपमान करत असतांनाही तीच्या मनाप्रमानेच वागत होता ना?सागर...आई वडिलांचा एकुलता एक मुलगा पण फक्त बायकोच्या इगोपायी शहरातच दुसरी चुल मांडण योग्य नसतांनाही फक्त व फक्त दिप्तीच्या आग्रहाखातर त्याने तो निर्णय घेतला होता...सुट्टीच्या दिवशी पुर्ण वेळ आईवडिलांना देण्याच वचन दिप्तीने दिल होत पण आईवडिलांपासून दूर ठेवण्यासाठी नवनविन शक्कल काढून ती सागरला त्याच्या कर्तव्यापासून दूरच तर खेचत होती...

दिप्तीच्या आईला खरच मुलीच वागण पटत नव्हत पण वडिलांची पुर्ण साथ होती दिप्तीला ...हो सागरची आई होती जरा जुन्या वळणाची पण सुनेच कौतुक करणही कधी टाळल नाही तीने...

"दिप्ती बेटा तुसागर येतोय त्याच्यासोबत ये फक्त जेवायला ये ,सार मी करेल गं,तु येत गेलीस घरी तर आम्हालाही बरं वाटत ...".

अस जरी सासू बोलली तरी ,"तो तीचा स्वार्थ आहे ".हेच बोलायची दिप्ती तीला नकोसाच होता सागरचा परीवार पण सागरने तीच्या परिवाराला आपलसच समजायचं हा अट्टहास कायमच असायचा तीचा...सागरचे बाबा तसे समजदार..सागरला सतत समजवायचे..

"सागर हळूहळू तीलाही कळेल व सार ठीक होईल बघ फक्त तु जास्त टोकाला जाऊ नकोस ,भांडू तर नकोस ,श्रींमंत मुलींशी लग्न केलस बघ ,तर तीच्या अपेक्षांची पुर्ती कर रे बाबा "...हेच ते सांगत..

"बाबा पण माझ तुमच्याप्रती कर्तव्य ?.."अस जर सागर म्हणाला तर ते म्हणत," तुझी स्थिती समजू शकतो रे मी,तुझ्या लग्नाला मी होकार दिला तेव्हाच मनाची तयारी केली होती बघ...तुझ्या आईलाही समज दिली होती पण ती हळवी रे गुंतते तुमच्यात...तु तुझा संसार बघ तु सुखी तर आम्ही सुखी बघ.."

इतक समाजदार कुटुंब होत सागरच ,पण त्यादिवशीही दिप्तीने खोटापणा केला होता . सागरच्या संतापाचा अंत बघितला होता तीने.तो तरी किती सहन करणार होता .तो नवर्याबरोबर एक मुलगाही होता ना?त्याचीही काही कर्तव्य होती.त्यालाही भावना होत्या.आईवडिलांनी त्याला तळहाताच्या फोडावाणी जपल होत तर तो चिडणार होताच ना?.