" सेजू बाळा ,तुझी तयारी झाली की नाही...... अगं मुलाकडचे येतच असतील, पटकन आवरून घे....... " सेजल ची आई म्हणजेच ललिता तिच्या रुम मध्ये येत तिच्याकडे बघून बोलू लागते........
" आई मला लग्न नाही करायचं आहे..... " सेजल आपल्या आईकडे बघून केविलवाण्या नजरेने बोलते........
" लग्न नाही करायचं म्हणजे, अग इतके चांगले पाहुणे समोरून चालून आले आहे आणि तू मध्ये काय हे वेगळच बोलत आहेस........ मला तुझे काहीही एक ऐकून घ्यायचे नाही , पटकन तयार करून बाहेर ये आणि पूर्वा, तुला मी तिची तयारी करायला इकडे बोलावले होते. .... तरीही तुम्ही दोघी बसून गप्पा मारत आहात ? " ललिता पूर्वावर एक जळजळीत कटाक्ष ताकत बोलतात........
" सेजा , च लवकर तयारी कर नाहीतर तुझी आई मला पण धारेवर धरेल....... " पूर्वा तिच्या हातात असलेली साडी सेजलच्या समोर धरत बोलते......... सेजलचा पण ना इलाज होतो....... आता तीच्या कडे तयारी करण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग राहत नाही.......... सेजल साडी नेसते, पूर्वा पण तिची मदत करते ........ त्यानंतर पूर्वा तिची छान तयारी करून देते........
काही वेळातच बाहेरून हसण्या बोलण्याचा आवाज येऊ लागतो म्हणजेच पाहुणेमंडळी आली आहे याचा अंदाजा आत असलेल्या सेजल ला होतों...... सेजल एकदा स्वतःला आरशामध्ये निहाळते....... त्या साडी मध्ये ती खरच खूप सुंदर दिसत असते.........
" सेजल ऐक , त्या पाहुण्यांसमोर नजर खाली ठेवूनच बस आणि डोक्यावरचा पदर खाली पडू देऊ नकोस..... त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तर दे....... " सेजलची आई जी तिला आत घ्यायला आलेली असते, ती तिच्याकडे बघून काही इन्स्ट्रक्शन देत बोलते..........
सेजल आपल्या आई सोबत बाहेर येतं पाहुण्यांच्या समोर ठेवलेल्या पाटावर जाऊन बसते....... तिची नजर खाली जमिनीवरच असते.......
" तुझं नाव काय ग पोरी ? " समोरून एका मध्यमवर्गीय बाईचा आवाज येतो.......
" माझे नाव सेजल राजेश तळपदे.. .. " सेजल हळू आवाजात उत्तर देते.......
" तुझं शिक्षण किती झाले ? " ती बाई पुन्हा प्रश्न विचारते......
" मी B. Com पूर्ण केले आहे...... " सेजल पुन्हा खाली बघूनच उत्तर देते........
" तुला जेवण बनवता येतं आणि घरची काम करता येतात का ? " तेवढ्यात एका बाजूने एका मध्यमवर्गीय माणसाचा आवाज येतो..........
" हो...... " सेजल एका शब्दात उत्तर देते , मनातून मात्र थोडी घाबरलेली असते........
" ठीक आहे , तुम्ही मुलीला आत पाठवू शकता....... आपण पुढचं बोलून घेऊ...... " ती बाई पुन्हा बोलते, तशी सेजल ची आई सेजल ला आत घेऊन जाते........ सेजल आत येऊन बसते परंतु तिचे मन मात्र उदास झालेले असते.......
" सेजु तू नवऱ्या मुलाला पाहिले का ? " पूर्वा जी आत मध्ये बसून हळूच बाहेर सगळ्यांना पाहत असते ती सेजल कडे पाहून तिला विचारते.........
" नाहीं ग... " सीजन पूर्वेकडे बघून उदास चेहऱ्याने बोलते.......
" थांब इकडे ये आणि इकडून हळूच वाकून बघ , तो समोर बसलेला आहे ना तोच नवरा मुलगा आहे....... " पूर्वा तीला दरवाजातून एक ठिकाणी इशारा करत दाखवते....... सेजल हळूच त्या दिशेला पाहते तर तिकडे एक मुलगा बसलेला असतो....... अंगापिंडाने जरा धष्टपुष्ट असतो, मोठ्या मिश्या , वयाने पण सेजल पेक्षा जरा जास्तच वाटत असतो...... त्याला पाहून सेजल चे मन अजूनच नाराज होते.........
" सेजू , मुलगा जरा वयाने जास्तच वाटत आहे ना...... त्याच्या त्या बलाढ्य शरीरापुढे तू एकदम नाजूक भाऊली असल्यासारखी वाटते ....... " पूर्वा तिचे मत सेजलला सांगु लागते........ सेजल काही बोलणार इतक्यात ती बाई आत येऊन सेजल ला खाली बसवून तिची ओटी भरते........ सेजल सोबत थोड्या गप्पा मारत ती बाई तिकडून निघून जाते.........
" सेजू बाळा, मुलांना आणि त्याच्या घरच्यांना तू खूप आवडली आहे......... " ललिताबाई आत येऊन आनंदाने तिच्याकडे बघून बोलू लागतात.........
" आई पण तो मुलगा मला नाही आवडला...... " सेजल नाराज मनानेच आपल्या आईकडे बघून बोलते........
" हि काय बोलत आहे ? " सेजल चे वाक्य नेमक तिचे वडील ऐकतात आणि ते पुढे येऊन तिच्या आईला विचारू लागतात...........
" तुम्ही तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊन नका , तुम्ही जावा तुमच्या कामाला....... " ललिता आपल्या नवऱ्याला तिकडून पाठवून देते. ......
" सेजल आपल्या गावामध्ये असे अजिबात चालत नाही तुला माहित आहे ना....... तुझ्यापेक्षा कितीतरी लहान असलेल्या मुलींची लग्न झाले आहे....... तुझ्या हट्ट मुळे आम्ही तुला ग्रॅज्युएशन पूर्ण करू दिले , पण आता पुढे काही मनमानी करू नकोस . ... तुला गप्प पने हे लग्न करावे लागणार आहे........ " ललिता सेजल कडे बघून तिला धमकीच्या स्वरात समजावू लागते.........
" अग आई , पण मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होते....... चांगली नोकरी करायची होती ..... आता कुठे तर माझ ग्रॅज्युएशन कंप्लिट झाले होते...... तू लगेचच लग्नाचा हट्ट करून बसली आहेस........ " सीजन आपल्या आईला समजावण्याचा निरर्थक प्रयत्न करू लागते..........
" आपल्या गावात आजपर्यंत कोणतीच मुलगी नोकरीसाठी बाहेर पडलेली नाही आहे........ तरीही मुलाकडचे समंज साहेत ....... मुलगा स्वतः चांगला शिकलेला आहे...... लग्न झाल्यानंतर तू एकदा तुझ्या नवऱ्यासोबत बोलून घे, तो नक्कीच तुला कामाला जाण्याची परवानगी देइल........ " सेजल ची आई तिचे बोलण तोंडात तिकडून निघून जाते.........
' जिकडे जन्म दिलेले आई-वडीलच आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, तिकडे नवऱ्याकडून तरी काय अपेक्षा करावी.. ..... ' मनामध्ये स्वतःला समजावून सेजल लग्नासाठी स्वतःला तयार करण्याचा प्रयत्न करू लागते........
.
..
...
To be continued
********************************
( कथा आवडत असल्यास कॉमेंट्स आणि लाईक करा........ )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा