' जिकडे जन्म दिलेले आई-वडीलच आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, तिकडे नवऱ्याकडून तरी काय अपेक्षा करावी.. ..... ' मनामध्ये स्वतःला समजावून सेजल लग्नासाठी स्वतःला तयार करण्याचा प्रयत्न करू लागते........
आत्ता पुढें,
बघता बघता सेजलचं गिरीश सोबत लग्नही होते...... नऊ दिवस नऊलाचे म्हणतात ना तसाच काय तो तिचा संसार चालू होता............ गिरीश नेहमी तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा......... सेजल गिरीशला घाबरून घरातली सगळी कामे करायची........ तरीही तो काही ना काही चूक काढून तिला त्रासच द्यायचा....... त्याचे आई-वडील ही कधी मध्यस्थी घेऊन त्याला समजवण्याचा प्रयत्न करत नसे , उलट त्याची आई तर अजूनच त्याची बाजू घेऊन सेजललाच वाईट साईट बोलत असे..... .
सेजलने आपल्या आईलाही हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सासरी गेल्यावर थोडाफार सहन करावेच लागते , हेच आपले भाग्य असते , असे सांगून तिची आई ही तिला नेहमी समजावण्याचा प्रयत्न करत असे.........
सेजल ने आता यालाच आपली नियती मानून सगळं सहन करणे शिकले होते....... नेहमी हसतमुख राहणारी सेजल आता दबावा खाली राहत होती....... तिच्या चेहऱ्यावर उदासी स्पष्टपणे दिसून येत होती , परंतु तिच्या सासरकडच्यांना मात्र त्याच्याशी काहीही घेण देणं नव्हते........ सकाळी लवकर उठून सेजल घरातली सगळी काम करायला घ्यायची ती पूर्ण दिवस तिचा कामातच निघून जायचा, कधी रात्र व्हायची हे तिला समजायचे नाही............
" ही आमटी कोणी बनवली आहे ? " एक दिवस रात्री उशिरा घरी आल्यावर गिरीश समोर वाटीतली आमटी बघून खवळून बोलू लागला........
" मी.... का काय झालं ? " सेजल घाबरून त्याच्याजवळ येऊन त्याला विचारू लागले........
" ही आमटी अशी बनवतात का ? तुझ्या आईने तुला एवढी साधी गोष्ट ही शिकवली नाही का ? " गिरीश तिच्याकडे बघून रागाने बोलू लागतो.........
" आमटी तर चांगली बनली होती..... आई-बाबांनाही आवडली होती..... त्यांनीही व्यवस्थित खाल्ली...... " सेजल घाबरूनच त्याला हळू-हवाचाच उत्तर देऊ लागते......
गिरीश आमटीची वाटी जोरात आपटून सेजल च्या जवळ येऊन त्याच्या जोरात कानाखाली मारतो.......
" याच्यापुढे माझ्यासोबत असा वाद करायचा नाही....... मला उलट बोललेलं मी अजिबात खपवून घेणार नाही........ " गिरीश आपल्या एका हाताच्या बोटांनी सेजलचे केस जोरात आवळून पकडत धमकीच्या स्वरात बोलून तिकडून निघून जातो........... सेजल मात्र तिकडेच बसून अश्रू गाळू लागते...... त्या घरात तिचे अश्रू पुसायलाही कोणी नसते......... गिरीश ने मारल्यामुळे तिचा एक गाव चांगलाच लाल झालेला असतो..........
गिरीशने आमटीची वाटी फेकल्यामुळे सगळीकडे आमटी सांडलेली असते........ सगळं साफ करून झोपायला तिला मध्य रात्र उलटते त्यामुळे सकाळी लवकर जाग येत नाही........ त्यात गिरीशला घाबरून ती हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर झोपलेली असते............
" सुनबाई किती वाजले बघ , अजून उठली नाहीस का आणि तू इकडे का झोपली आहेस ? " सेजलची सासू हॉलमध्ये येताच घड्याळ बघून रागाने तिला उठवू लागते.........
" ते..... आई मी रात्री काम करायला उशीर झाला म्हणून मग इकडे झोपले....... " सेजल आपल्या सासूबाई कडे बघून खोटंच उत्तर देते.......
" माझा मुलगा दिवसभर बाहेर जाऊन मेहनत करतो त्यामुळे तुझे हे काम आहे की , रात्री तुझी सगळी काम झाल्यावर रूम मध्ये जाऊन त्याची सेवा करावी आणि तू इकडे झोपली आहेस....... लाज नाही वाटत का तुला....... तुझ्या गाला ला काय झालं इतका का लाल झाला आहे ? " बोलता-बोलता सेजलच्या सासूचे लक्ष तिच्या गालावर जाते आणि तिला विचारत असताना त्यांना काय ते समजून जाते.......
" ते रात्री अंधारात धडकले आणि लागलं...... " सेजल पण खोटं उत्तर देते.......
" ठीक आहे...... ठीक आहे...... जा पटकन आवरून घे...... गिरीश उठला असेल , त्याचा नाश्ता जाऊन तयार ठेव नाहीतर परत त्याला राग येईल........ " सेजल ची सासू तिला बोलून तिकडून निघून जाते........
सेजल पटकन आवरून गिरीश चा नाष्टा आणि डबा रेडी करू लागते...... गिरीश सकाळी पण तिच्याशी न बोलताच आपला नाश्ता करून डबा घेऊन ऑफिस साठी निघून जातो..........
हळूहळू सेजल आणि गिरीश यामधले वाद वाढू लागतात........ गिरीश नेहमीच तिच्यावर मारहाण करू लागतो........ तो सेजल ला बाहेर कोणासोबत बोलायलाही पाठवत नव्हता, जर कोणाशी बोलताना दिसलीस तरी तिच्या चरित्रावर शंका घेत होता...... तिचे सासू-सासरे ही गिरीश च्या बाजूने तिलाच ओरडायचे..... त्यामुळे तिने कितीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी कोणीही तिच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचे नाही...........
एक दिवस तर हद्दच होते गिरीश तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून तीला घरातून बाहेर काढतो....... आता सेजल कडे तिच्या माहेरी जाण्याखेरीस दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही..........
.
..
...
To be continued
************************************
( कथा आवडत असल्यास कॉमेंट्स आणि लाईकस द्यायला विसरु नका...... )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा