Login

अनोळखी बंधन भाग ३

न पाहता प्रेमात पडलेले प्रेमी
एक दिवस तर हद्दच होते गिरीश तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून तीला घरातून बाहेर काढतो....... आता सेजल कडे तिच्या माहेरी जाण्याखेरीस दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही..........

आत्ता पुढें,
सेजल तीच्या माहेरी येऊन राहू लागते........ परंतु हा समाज एका मुलीला कुठेही सुखाने जगू देत नाही,  तसेच काहीसे सेजल सोबतही झालेले असते......... त्यांच्या आजूबाजूला राहणारे लोक तिच्या विषयी वाईट साईट बोलू लागतात........ नवऱ्याने टाकली आहे म्हणजे नक्की हीच्याताच  काहीतरी दोष असणार असे कठोर शब्द तिच्या कानावर येऊ लागतात..........

पहिली हसणारी , खेळणारी सेजल जणू कुठे गायब झालेली होती ........ आताची सेजल एकदम शांत शांत आणि उदास राहू लागते.......  माहेरी पण ती आईची थोड्याफार कामांमध्ये मदत करत रूममध्ये एकटीच शांत बसून राहत असे....... कोणासोबत जास्त बोलायला तिला आवडायचे नाही....... तिच्या आईला पण तिच्याबद्दल खूपच वाईट वाटत होते , शिवाय आजूबाजूंचे बोलणे ऐकून त्यांना त्यांना पण आपल्या मुलीची चिंता वाटू लागली होती.........

अशातच सेजल ची आई तिच्या बहिणी सोबत बोलून सेजलला आपल्या बहिणीकडे मुंबई शहरात पाठवून देते......... तिकडे येऊन पण सेजलच्या परिस्थितीमध्ये फारसा काही फरक जाणवला नव्हता,  फक्त इकडची माणसं दुसऱ्यांच्या घरात डोकावून पाहण्यात जास्त इंटरेस्टेड नसल्यामुळे आजूबाजू वाल्यांचा त्रास तेवढा मिटला होता............

सेजल आपल्या मावशीकडे पण तिला घर कामात मदत करू लागली होती परंतु घरातून बाहेर कुठे जात नव्हती.......  दिवस रात्र घरातच एका कोपऱ्यात गप्प बसून राहत होती........ तिची मावशी ज्या बिल्डिंग मध्ये राहत होती ती बिल्डिंग U आकाराची असल्यामुळे बिल्डिंग मधल्या शेजाऱ्यांच्याच खिडक्या एकमेकांच्या खिडक्यासमोर येत होत्या.......... सेजलच्या मावशीची मैत्रीण पण तिच्या बाजूलाच राहत असल्यामुळे त्यांच्या किचनच्या खिडकीच्या समोरच तिच्या किचनची खिडकी दिसत होती,  त्यामुळे खिडकीमधूनच एकमेकांना आत मधले पूर्ण किचनही व्यवस्थित दिसत होते.........

सेजल ची मावशी पण कधी कधी आपल्या मैत्रिणी सोबत गप्पा मारतच किचनमधली सगळी काम करत होती त्यामुळे त्या मैत्रिणी सोबत सेजलची पण आता ओळख झाली होती....... सेजलच्या मावशीकडून तिच्या मैत्रिणीला सेजल बद्दल घडलेले सगळे काही समजले होते......... तिच्या मैत्रिणीचा एक मुलगा होता....... तो पण आधी मधी आपल्या आईला मदत करण्यासाठी किचनमध्ये येत होता.......  तेव्हा त्याचे सेजल कडे लक्ष जात होते........ सेजलच्या चेहऱ्यावरची उदासी त्याला काहीतरी वेगळच सांगण्याचा प्रयत्न करत होती........  तो नेहमी तिच्याकडे पाहत होता परंतु सेजलने आजपर्यंत एकदाही नजर वर करून त्याच्याकडे पाहिलेले नव्हते............

त्याला अपल्या आईकडूनच सेजल बद्दल,  तिच्या भूतकाळाबद्दल सगळं काही माहीत झाले होते...... तरीही त्याच्या मनाला तिच्याबद्दल वेगळेच आकर्षण वाटत होते.......... तो पण एका चांगल्या कंपनीत काम करत होता....... लग्नाचे वय झाले असून ही लग्नामध्ये इंटरेस्ट नसल्यामुळे त्याने आपल्या आईला आधीच बजावून सांगितले होते,  पण आता मात्र त्याच्या वागण्यामध्येही थोडाफार बदल दिसून येत होता........  जेव्हा पण तो घरी असायचा किचनमध्ये उभा राहून काही ना काही कामाच्या निमित्ताने किचनमध्ये यायचा त्याच निमित्ताने त्याला सेजल ला बघायला भेटायचे.............

एक दिवस त्याची आई आणि सेजलची मावशी मिळून बाहेर जाणार होते त्यामुळे त्याच्या आईने सेजल चा नंबर त्याला देऊन तिला तिची मावशी घरी उशिरा येणार आहे असे सांगायला सांगितले होते...........  त्याने सेजल चा  नंबर आपल्या मोबाईल मध्ये सेव करून ठेवला परंतु स्वतः तिला मेसेज न करता त्याने आपल्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका लहान मुला कडून तिच्यापर्यंत तो मेसेज पोहोचवला.............

त्यादिवशी सेजल पण घरात एकटीच होती.......  घरातल्या एका कोपऱ्यात बसून ती आपल्या भूतकाळाबद्दल विचार करत होती.......... अचानक त्या सगळ्या जुन्या गोष्टी आठवून ,आपल्या नवऱ्याने आपल्यावर केलेले खोटे आरोप आठवूण सेजलच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले आणि ती स्वतःला खूपच एकटी समजु लागली......... ते सगळे विचार तिच्या डोक्यावर खूपच हवी झाले होते,  त्या विचारातच ती जागेवरून उठली आणि किचनच्या दिशेने आली............

सेजल त्या वाईट विचारतच आपली नजर सगळीकडे फिरवत असताना तिच्या नजरेला किचनमध्ये ठेवलेला चाकू दिसला.......... सेजल ने क्षणभराचा विचारही न करता सरळ किचनमध्ये येऊन तो चाकू आपल्या हातात घेतला........ सेजलने मनाशी काहीतरी ठरवून तो चाकू आपल्या दुसऱ्या तळ हाताच्या नसवर ठेवला आणि ती रागाने आपली नस कापणार इतक्यात तिने चाकू घेण्यासाठी बाजूला ठेवलेल्या तिच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली........ सेजल घाबरूनच आपल्या फोनच्या दिशेने पाहू लागली...........

सेजलने आपल्या हातात असलेला चाकु खाली ठेवून बाजूला असलेला मोबाईल उचलून त्यावर आलेला मेसेज रीड करायला सुरुवात केली..........

" हे जीवन खूप सुंदर आहे , याला असा नकारात्मक विचार करून वाया घालू नका........
देवाने आपल्याला हे सुंदर आयुष्य दिले आहे , तर त्याचा भरपूर आनंद घ्यायला शिका......... " मेसेज वाचून सेजल गोंधळलेल्या नजरेने त्या नंबर कडे पाहू लागली,  कारण तो मेसेज एका अनोळखी नंबर  वरून आला होता.........

सेजल ने परत एकदा विचार करून तो मोबाईल तिकडेच ठेवला आणि चाकू आपल्या हातात घेतला....... ती तो चाकू आपल्या तळ हातावर ठेवणार इतक्यात परत एकदा तिच्या मेसेजची टोन वाजली........ ती परत एकदा चाकू खाली ठेवून मोबाईल हातात घेऊन तो मेसेज रीड करू लागली...........

" तू स्वतः जोपर्यंत हारत नाहीस,
  लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस.......
  आपलं जगणं सार्थकी लाव,
   आयुष्याला मरणाच्या दारात असं झोकु नकोस...... " परत त्याच नंबर वरून अजून एक मेसेज आला होता...... तो वाचून सेजल पण थोडा वेळ विचार करत उरली.........


.


..


...


To be continued


********************************
( कथा आवडत असल्यास कॉमेंट्स आणि लाइक्स नक्की द्या........ )

🎭 Series Post

View all