Login

अनोळखी बंधन भाग ४

न पाहता प्रेमात पडलेले प्रेमी
" तू स्वतः जोपर्यंत हारत नाहीस,
  लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस.......
  आपलं जगणं सार्थकी लाव,
   आयुष्याला मरणाच्या दारात असं झोकु नकोस...... " परत त्याच नंबर वरून अजून एक मेसेज आला होता...... तो वाचून सेजल पण थोडा वेळ विचार करत उरली.........

आत्ता पुढें,

" कोण आहात तुम्ही आणि मला का मेसेज करत आहात ? " शेवटी वैतागून सेजल ने पण त्या नंबर वर मेसेज पाठवला..........

" मी कोण आहे हे जास्त महत्त्वाचं नाही,  पण तुझे आयुष्य किती महत्त्वाचे आहे हे तुला समजणे आता जास्त गरजेचे आहे....... " समोरून मेसेज चे उत्तर आले.......

" माझ्या आयुष्याची तुम्ही काळजी करू नका,  तसे पण काळजी करण्यासारखं त्याच्यामध्ये आता काहीही उरलेले नाही....... " सेजल ने भावूक होऊन उत्तरं दिले.........

" जोपर्यंत आपण स्वतःला कमी लेखत नाही इतर कोणामध्येही आपल्याला कमी लेखनाची हिंमत नसते त्यामुळे आधी तुम्ही स्वतःची इज्जत ठेवायला शिका,  तेव्हाच इतर लोकही तुमची इज्जत करतील...... " समोरून मेसेज आला......

" तुम्हाला काय माहित आहे माझ्या आयुष्याबद्दल,  माझ्यासोबत काय काय झाले आहे हे समजल्यावर तुम्ही असे भाषण देणार नाही........ " सेजल रागानेच  मेसेज पाठवते.....

" जे झाले आहे ,  बाहेरच्या लोकांनी जे केले आहे तुम्ही तसाच विचार करत स्वतला त्रास देणार असाल तर तुम्ही इन डायरेक्टली त्या लोकांचे म्हणणे खरं ठरवण्यामध्ये यशस्वी व्हाल........  त्यापेक्षा हे मिळालेले नवीन आयुष्य कसे जगता येईल , स्वतःला कसं सिद्ध करता येईल,  याचा विचार करा म्हणजे तुम्हाला तुमच आयुष्य तुमच्या पद्धतीने जगता येईल....... " समोरच्या व्यक्तीने मेसेज पाठवला त्याच्या मेसेजचा सेजल पण विचार करू लागली........ एक नजर समोरच्या चाकू कडे पाहिले आणि मग नंतर किचन मधून बाहेर निघून गेली......... त्या नंबरला " अनोळखी मित्र" या नावाने सेव्ह केले होते.......

यानंतर सेजलला ती व्यक्ती सतत मेसेज करून मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत होती त्यामुळे सेजलच्या वागण्यामध्येही भरपूर सुधारणा झाली होती.......

" तुमचे शिक्षण झालेले असूनही तुम्ही असे घरी बसून राहता...........  त्यापेक्षा घरातून बाहेर पडा आणि आपल्या शिक्षणाच काहीतरी सार्थक करा....... " एक दिवस असेच त्यांचे मेसेज चालू असताना समोरच्या व्यक्तीने तीला मेसेज केला.......

" पण माझे शिक्षण तयार गावाखेड्यात पूर्ण झाले होते,  मग मुंबईसारख्या शहरात मला जॉब मिळेल का ? " सेजल ने त्याला विचारले.........

" प्रयत्न करण्याच्या आधीच तुम्ही हार म्हणून मोकळे होता , इथेच तर तुमच्या चुकते ना.....  तुम्ही आधी प्रयत्न तर करून बघा........ " त्या व्यक्तीने मेसेज चे उत्तर दिले...... सेजल ने पण मग जॉब करण्याचा निर्णय घेतला....... तिच्या मावशीला पण तिच्या या निर्णयावर खूप आनंद झाला........  सेजल  ने घरी बसल्या बसल्या आपले सगळे डॉक्युमेंट तयार केले आणि आपला बायोडाटा बनवून जवळपासच्या तीन-चार कंपनीमध्ये फॉरवर्डही केला....... खूप दिवस झाले पण कोणत्याही कंपनीमधून काही रिप्लाय आला नाही म्हणून पुन्हा एकदा तीच्या मनात निराशाची भावना निर्माण होऊ लागली........

" मला नाही वाटत की मला मुंबईसारख्या शहरात चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळेल....... " सीजन शेवटी नाराजी मध्ये  मेसेज केला.........

" प्रयत्नाती परमेश्वर....... तुम्ही प्रयत्न करणे सोडू नका बाकी सगळं वरचा सांभाळून घेइल...... " समोरून लगेच तिच्या मेसेज वर रिप्लाय आला....... त्याचा एकूण पुन्हा एकदा आत्मविश्वासाने अजून काही कंपन्यांमध्ये आपल्या बायोडेटा फॉरवर्ड केला........ असेच दोन-चार दिवसानंतर एका कंपनीमधून तिला इंटरव्यू साठी फोन आला........ सेजल ला खूपच आनंद झाला होता........  आज ती इंटरव्यू देण्यासाठी त्या कंपनीमध्ये ही जाणार होती.......  तिने सकाळीच मेसेज करून त्या व्यक्तीलाही तसे सांगितले होते...........

त्या कंपनीच्या एच आर डिपार्टमेंट मधल्या लोकांनी तीचा इंटरव्यू घेतला.........  ती इंटरव्यू मध्ये सिलेक्ट हि झाली आणि तिला जॉबही मिळाला........ सेजल ने त्या कंपनीच्या बाहेर आल्याबरोबर आनंदानेच आपल्या त्या अनोळखी मित्राला मेसेज करून ही आनंदाची बातमी दिली......... त्या मित्रांने पण तीचे अभिनंदन केले.........

आता सेजल स्वतःच्या पायावर उभी होती........ तिला एका चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली होती त्यामुळे तिच्या वागण्या बोलण्यामध्ये भरपूर फरकही झाला होता....... पहिल्यासारखी उदास न राहता सेजल आत्ता स्वतःकडे लक्ष देत होती ........ तीला सपोर्ट करण्यासाठी तिचा तो अनोळखी मित्र होताच.......
  तिला काहीही वाटले तरी ती आपल्या मित्राला मॅसेज करून विचारत होती ......... त्याच्यावर तो योग्य तो पर्याय तिला सांगत होता........  असेच दिवसा मागून दिवस जात होते.......  त्यांचं बोलणं खूप वाढले होते........  त्यांचे दिवसाची सुरुवातही मेसेज वरून होते आणि रात्रीचा शेवट हि एकमेकांना मेसेज करूनच होत होता...........

एक दिवस सेजल चे आई-वडीलही तिला भेटण्यासाठी मावशीच्या घरी आले होते........  आपल्या मुलींची प्रगती पाहून त्यांनाही खूप आनंद झाला होता.........

" आई मी आता इतका पगार घेते की , स्वतःचा खर्च स्वतः करू शकते त्यामुळे मला असे वाटते की, मी आता वेगळी रूम भाड्याने घेऊन तिकडेच राहावे......  उगाच माझ्यामुळे मावशीला त्रास नको........ " आपल्या आईकडे बसून सेजल आपल्या मनातली गोष्ट सांगू लागते.......

" सेजल पाडा अजून तुझे वय काय आहे....... अशी एकटी या अनोळख्या शहरात राहण्यापेक्षा तू लग्नाचा का नाही विचार करत....... " तिची आई थोड्या हळव्या आवाजात तिच्याकडे बघून विचारते........

.


..


...


To be continued

*******************************
( कथा आवडत असल्यास कॉमेंट्स आणि लाइक्स नक्की द्या....... )

🎭 Series Post

View all