Login

अनोळखी बंधन भाग ५ ( अंतिम)

न पाहता प्रेमात पडलेले प्रेमी
" सेजल पाडा अजून तुझे वय काय आहे....... अशी एकटी या अनोळख्या शहरात राहण्यापेक्षा तू लग्नाचा का नाही विचार करत....... " तिची आई थोड्या हळव्या आवाजात तिच्याकडे बघून विचारते........


आत्ता पुढें,

" एकदा तुमचा ऐकून बघितले ना..... काय झालं, आता तरी माझ आयुष्य मला माझ्या पद्धतीने जगू द्या....... " सेजल आपल्या आईकडे बघून बोलते........

" अग बाळा , मी तुझ्या भल्यासाठीच बोलत आहे...... मला मान्य आहे , एकदा आमच्यामुळे तुझ्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम निर्माण झाले , पण मग काय तू आयुष्यभर अशी एकटीच राहणार आहेस का ? प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एका जीवनसाथीची गरज असते...... " तिची आई तीला समजावण्याचा प्रयत्न करत बोलते........

" नाही आई,  मी पण अशी एकटी राहणार नाही परंतु यावेळी माझ्या जोडीदार मी स्वतः निवडणार आहे........ " सेजल मनामध्येच विचार करत उत्तर देते......

" ठीक आहे बाळा,  जशी तुझी इच्छा.......  या जगात प्रत्येक माणूस वाईट असतो तसे नाही,  काही काही माणस चांगलेही असतात........  तू तुझ्या आयुष्यासाठी जो काही निर्णय घेईल त्यात आम्ही तुझ्या सोबत असू....... " तिची आई प्रेमाने तीच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते....... थोड्यावेळाने तिचे आई वडील तिकडून निघून जातात..........

" हॅलो, मला तुम्हाला भेटायचे आहे..... " सेजल आपल्या अनोळखी मित्राला मेसेज करून त्याच्या उत्तराची वाट पाहू लागते........

" मला ! पण असे अचानक का ठरवलं ? " समोरून लगेच उत्तरही येते......

" मला तुम्हाला काहीतरी विचारायचे आहे ? " सेजल विचारात तर असते पण लिहिताना तिचे हात थरथर कापत असतात.......

" मला काही विचारण्यासाठी तुला कधीपासून परमिशन घेण्याची गरज लागली आहे..... " समोरचा व्यक्ती मात्र बिनधास्तपणे लिहीत असतो........

" तुम्ही माझ्यासोबत लग्न करणार का ? " सेजल पण त्याचे उत्तर ऐकून पटकन आपल्या मनातले गोष्ट लिहून जाते.......

" What? Are you serious? म्हणजे मी तुझा जीव वाचवला,  तुला जगायला शिकवलं ,  याची परतफेड म्हणून तू माझ्यासोबत लग्न करणार आहेस का ? " समोरचा व्यक्ती एका क्षणाचा ही विलंब न लावता तिला विचारतो.........

" नाही,  माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून मी तुमच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे....... " सेजल पण आपल्या मतावर ठाम असते........

" आपण कधीही एकमेकांना भेटलो नाही की कधी एकमेकांचा आवाजही ऐकायला नाही.......  फक्त दिवस रात्र मेसेजवर बोलत असतो त्यामुळे तुला माझ्यावर प्रेम होणे कसे काय शक्य आहे......." समोरची व्यक्ती ही मेसेज करते......

" कधी कधी व्यक्तीसमोर असावी यापेक्षा जास्त महत्त्वाचे हे असते की , आपल्या प्रत्येक निर्णयात ती आपल्या सोबत असावी...... तुम्ही जेव्हापासून माझ्या आयुष्यात आले आहात माझे आयुष्य आनंदाने भरलेले आहे........  याच्यापुढे अजून मी कुठली अपेक्षा करू , एका व्यक्तीने माझ्या निरर्थक आयुष्याला सार्थकी केले हेच माझ्यासाठी खूप आहे........ " सेजल आपल्या मनातली भावना शब्दात उतरवण्याचा प्रयत्न करू लागते.........

" हो पण जर मी दिसायला विचित्र असलो आणि माझा आवाजही व्यवस्थित नसेल,  तरीही तुझ्या आयुष्यात मी तेवढाच महत्त्वाचा असेल का ? " समोरच्या व्यक्तीने मेसेज पाठवला आणि तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करू लागला........ दोन मिनिट तर सेजल पण त्याच्या मेसेजचा विचार करत होती.......

" तुमचं दिसणं किंवा तुमचा आवाज माझ्यासाठी इतका महत्त्वाचा नाही,  फक्त तुम्ही माझ्यासोबत असणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहात........ मी तुमच्यावर मनापासून प्रेम केले आहे त्यामुळे फक्त तुम्हाला बघितल्यावर किंवा तुमचा आवाज ऐकल्यावर माझ्या मनातले प्रेम कमी होईल असं अजिबात घडणार नाही........ माझ्या आयुष्यात जर कोणी व्यक्ती येईल तर ती फक्त तुम्ही असेल , नाहीतर मी आयुष्यभर लग्न करणार नाही......." सेजल आपला निर्णय सांगून मोकळी होते.........

थोडा वेळ समोरून काहीच रिप्लाय येत नाही त्यामुळे सेजलला आता खूपच टेन्शन येऊ लागते...... ती टेन्शनमध्येच किचनमध्ये इकडून तिकडे येरझाऱ्या घालू लागते.......  दहा मिनिटांनी मात्र त्याच नंबर वरून तिला कॉल येऊ लागतो........ समोरून कॉल येताना पाहून ती गडबडीतच फोन उचलून आपल्या कामाला लावते........

" माझा आवाज नीट ऐक आणि खिडकीतून समोर बघून सांग की अशा व्यक्तीबरोबर तू खरच लग्न करण्यासाठी तयार आहेस का ? " फोनवर सेजल काही बोलायच्या आधीच समोरून आवाज येतो.......  तशी ती गोंधळलेल्या नजरेने खिडकीतून समोर पाहू लागते ........ तर समोर मावशीच्या मैत्रिणीचा मुलगा तीला उभा  दिसतो, तो सध्या हसून तिच्याकडेच पाहत असतो त्यामुळे ती पूर्णपणे गोंधळून जाते..........

" काय झालं ? हा चेहरा तुला नाही आवडला का ? " तो मस्करीच्या स्वरात बोलतो........

" तुम्ही , पण हे कसं शक्य आहे ? " सेजल ला अजूनही स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नसतो.......

" का शक्य नाही......  मावशीकडून खरं तर मला तुमचा नंबर मिळाला होता परंतु तुमच्याशी बोलण्याचे माझे धाडस होत नव्हते.........  एक दिवस तुम्हाला किचनमध्ये चाकू घेऊन स्वत च्या हातावर ठेवताना मी पाहिले तेव्हा मी स्वतःही खूप घाबरून गेलो..........  मी तसंच तुम्हाला वाचण्यासाठी तुमच्या घरी येणार होतो परंतु त्याच्याने आजूबाजूलाही  सगळ्यांना समजले असते म्हणून मग मी माझ्या शब्दांनी तुम्हाला वाचवण्याचा  प्रयत्न केला आणि तो यशस्वीही झाला........ " समोरची व्यक्ती तिच्याकडे बघत स्मितहास्य करत बोलू लागते.........

" तुम्हाला माझ्या भूतकाळाबद्दल सगळं काही माहित आहे आणि तरीही तुम्ही....... " सेजल आश्चर्याने त्याच्याकडे पाहून त्याला विचारते.......

" हो मला तुझ्या भूतकाळाबद्दल सगळं काही माहित आहे आणि तरीही मी तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार आहे आणि हे आतापासूनच नाही जेव्हा तू तुझ्या मावशीकडे नवीन राहायला आली होती,  तेव्हा तुला पाहता क्षणीच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो,  पण तेव्हा ही सांगण्याची खरी वेळ नव्हती.........  आज मात्र तुझ्यावरचे प्रेम मी अगदी जगाला ओरडून सांगू शकतो,  फक्त तू माझे हे प्रेम स्वीकारायला तयार आहेस का ? " ती व्यक्ती खिडकीच्या जवळ येऊन तिच्या डोळ्यात आर पार पाहत विचारते.........

" वरून मी तुमच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार आहे........ " सेजल पण आपल्या खिडकीच्या जावई येऊन लाजत त्याला उत्तर देते.......

" ठीक आहे , मी उद्या माझ्या आईला घेऊन तुझ्या मावशीच्या घरी येतो....... तुझ्या घरच्यांना भेटून आपल्या लग्नाची मागणी घालतो....... " वरून पण तिचं तिलाच बघून गालात हसत उत्तर देतो......... दुसऱ्या दिवशी वरून आणि त्याची आई सेजलच्या मावशीच्या घरी येऊन त्या दोघांच्या लग्नाबद्दल बोलनी करतात......... ते त्यांच्या घरच्यांनाही हे लग्न मान्य होते......... घरच्यांच्या आशीर्वादाने आणि देवा ब्राह्मणाच्या साक्षीने काही मोजक्या लोकांमध्ये त्या दोघांचे लग्नही होते.........

.


समाप्त


************************************
( कथा आवडत असल्यास कॉमेंट्स आणि लाइक्स नक्की करा........ तुमच्या मौल्यवान समीक्षा देऊन तुमचा अभिप्राय नक्की कळवा........ )

🎭 Series Post

View all