Login

समाजबाह्य

गावाकडच्या मातीत उमललेली दोन प्रियकरांची गोष्ट
गोष्ट सुरू होते एका छोट्याशा गावातून, जेमतेम १–२ हजार लोक संख्या असेल गावाची . छोट्याशा गावात मुबलक अश्या सुविधा होत्या आणि त्याचच जन्म घेत होती एक प्रेम कथा ...
सुनील आणि रमेश एकाच गावात एकच गल्लीत राहणारे दोन समवयस्क मुलं दोघांचं वय जेमतेम १५–१६ असेल ....नुकतीच तारुण्यात प्रवेश करणारे हे दोघं तरुण.....
सुनील दिसायला एकदम नाजूक दिसायला देखणं नाक नक्षी एकदम सुंदर एखाद्या मुलीला पण लाजवेल अशी ... कसल्या तरी वर्तमान पत्रात येणाऱ्या मासिकात पाहून पाहून स्वतःची आणि स्वतःच्या त्वचेची काळजी घेणारा एकदम कोवळा पोरगा
आणि त्या उलट रमेश शेतात मेहनत करून पिळदार शरीरयष्टी तयार केलेला थोडा सावळा पण नाकी डोळी एकदम राजबिंडा असा रमेश घरची परिस्थिती तशी बेताचीच तरी स्वप्न मोठे मोठे राजा चे घरचा एकुलता एक असा रमेश ... दोघं पण एकाच वर्गात शिकायला अभ्यासात हुशार असे रमेश नेहमी वर्गात सगळ्यांचा आकर्षण असायचा आता तोंडी परीक्षा आणि सराव परीक्षा सुरू होत्या इकडे रमेश चा अभ्यास जोरात सुरू असे आणि त्या उलट सुनील चे ना अभ्यासात हुशार ना कुठल्या कामाच्या गोष्टीत अग्रेसर सगळी कडून डब्बा गुल .. सुनील च्या वडिलांनी सुनील ला बजावले होते की १० च्या बोर्डाच्या परीक्षेत जर अपेक्षित टक्के पडले नाही तर त्याचे शहरात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न ते भंग करतील .. आणि हो ह्या बहारद सुनील दादा ला शहरात जाऊन शिक्षण घ्यायचे.. शिक्षण एक फक्त बहाणा आहे खरं तर त्याला शहरात जाऊन सुटकेचा श्वास घ्यायचा होता जरी तो शिक्षणात हुशार नसला तरी तो खूप चांगला नृत्य करायचा हा त्याला नाच करायला खूप आवडायचा ... आणि त्याच्या वडीलांना ते कदापि स्वीकार न्हवते त्यांना त्याने नाच केलेला बिलकुल आवडत नसे ... आणि ह्या काय ऐकत नसे चोरून लपून का होईना पण tv वर गाणी लागला की हा आपला.थिरकायचा म्हणजे थिरकायचा आणि वेळ प्रसंगी बाबा चा मार पण खायचा .... बोर्ड ची परीक्षा काही महिन्या वरच येऊन टाकलीय बघू आपण की रमेश आणि सुनील कशे जवळ येतात... पुढील भागात
0

🎭 Series Post

View all