अस्तित्व एक संघर्ष-पर्व-२-अबोल प्रीत-भाग-११

Its a Coffee Time of Khushi And Vivek

अस्तित्व एक संघर्ष

पर्व-२ अबोल प्रीत

भाग-११


दुसऱ्या दिवशी अमिषा आणि खुशी लेक्चर्स संपल्यावर क्लास मधून बाहेर पडल्या. अमिषा खुशीला बाय बोलून अखिलेशला भेटायला निघून गेली. खुशी ही मग लायब्ररीत जाण्यासाठी पायऱ्या चढू लागली. आज तरी विवेक दिसेल का आपल्याला... खुशी हाच मनात विचार करत लायब्ररीच्या दिशेने चालू लागली.

तेवढयात तिची वाट कोणीतरी अडवली. खुशीने वर पाहिलं. एक मुलगा हाताने तिची वाट अडवून तिच्याकडे पाहून हसत होता.
खुशी: Excuse me...
त्या मुलाने हात बाजूला केला नाही. तो अजूनही खुशीकडे हसून पाहत होता.
खुशी: Hello, side please...
मुलगा: नाही जाऊ दिलं तर...?
खुशी: (रागाने पाहत) वाट सोड माझी...
मुलगा: वाट सोडायचीच असती तर त्या दिवशी पाठलाग नसता केला...?
त्या मुलाचं हे बोलणं ऐकून खुशीच्या लक्षात आलं. त्या दिवशी तिचा पाठलाग करणारा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून हाच होता.
मुलगा: (खुशीच्या जवळ येत) ओळखलं का आता...?
खुशी: दूर राहून बोल... आणि माझा पाठलाग का करत होतास...?
मुलगा: हाय एकदम तिखट बोलतेस तू.... (स्वतःच्या छातीवर हात ठेवून) इथे काळजात भिडतो तुझा आवाज...
खुशी त्याचं बोलणं ऐकून घाबरुन मागे फिरु लागली. लायब्ररी तिच्या पासून लांब होती. आवाज द्यावा तर कोणाला द्यावा. त्या मजल्यावर त्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं.
खुशी पायऱ्यांच्या दिशेने जायला वळू लागली. तसं त्याने पुन्हा तिच्या समोर येऊन तिची वाट अडवली.
खुशी: माझी वाट सोड, जाऊ दे मला...
मुलगा: मी सोडतो तुला, हवं तिकडे... तू फक्त तुला कुठे जायचं आहे ते सांग...
खुशी: बऱ्या बोलाने मला जाऊ दे, नाहीतर...
मुलगा: (खुशीच्या जवळ येत) नाहीतर काय करणार...?
खुशी पळून जाणार तेवढ्यात त्याने तिचा हात पकडला.
खुशी: हात सोड माझा...
मुलगा: नाही सोडणार... काय करशील...? त्याने त्याची पकड अजून घट्ट केली.
त्याचं बोलणं चालू असताना त्याच्या मागून विवेकने आवाज दिला.
विवेक: नचिकेत, हात सोड तिचा...
नचिकेत: (विवेककडे वळून) तुला नको त्यावेळी यायची सवयच आहे का...?
विवेक: नको त्यावेळी नाही, अगदी योग्य वेळी यायची सवय आहे. (विवेकने नचिकेतचा हात पकडला.) सोड म्हणतो ना...!
नचिकेत: (खुशीचा हात सोडून विवेकची कॉलर पकडली) खूप हौस आहे ना तुला मदत करायची. कोण लागते कोण रे तुझी ही...
विवेक: (त्याच्या कॉलर वरचा नचिकेतचा हात सोडवत) तिची किंवा इतर कोणाचीही मदत करायला ते माझे कोणी लागतात का हे मला पाहायची गरज नाही. विवेकने इशाऱ्याने खुशीला जायला सांगितलं. पण नचिकेतने त्याला काही केलं तर... या भीतीने खुशीचं त्याला एकटं तिथेच सोडून जायचं मन करेना.

एव्हाना लायब्ररीतून बाहेर पडणाऱ्या कॉलेजच्या वाइस प्रिंसिपल नाडकर्णीचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. त्या सरळ त्यांच्या दिशेने आल्या.
नाडकर्णी मॅडम: Whats going on...? Come with me in my cabin. (मग खुशीकडे पाहून) you also come with them. नचिकेत रागानेच विवेककडे पाहत नाडकर्णी मॅडमच्या मागे मागे चालू लागला. विवेकने घाबरलेल्या खुशीला हातानेच घाबरु नको अशी खूण केली. तिघेही मॅडमच्या केबिन मध्ये आले. मॅडम त्यांच्या खुर्चीवर बसल्या.
नाडकर्णी मॅडम: (खुशीकडे पाहून) what is your name...?
खुशी: खुशी देशमुख...मॅम..
नाडकर्णी: and you are in which year...
खुशी: first year ma\"am
नाडकर्णी: ok tell me what exactly happened between this two boys...
खुशीने घाबरुन एकदा नचिकेतकडे आणि एकदा विवेककडे पाहिलं.
नाडकर्णी: हे बघ खुशी, घाबरायची गरज नाही... जे झालं ते सगळं खरं खरं सांग...
खुशीच्या अजूनही घशातून आवाज निघेना. नाडकर्णी मॅडमने विवेक आणि नचिकेतला बाहेर थांबायला सांगितलं. जेणेकरुन त्यांना तिच्या बरोबर बोलणं सोपं जाईल. मॅडमचं ऐकून विवेक, नचिकेत दोघे बाहेर जाऊन थांबले. ते दोघे बाहेर गेल्यावर नाडकर्णी मॅडम खुर्चीतून उठल्या आणि तिच्या डोक्यावरुन हात फिरवून म्हणाल्या, "हे बघ, मला तुझ्या सारखीच एक मुलगी आहे, त्यामुळे न घाबरता जे झालं ते सांग...!"
खुशीने मानेने होकार दिला पण भीतीने तिच्या घशाला कोरड पडल्याने तिने मॅडमकडे इशाऱ्याने पाणी मागितलं. मॅडमनी तिला पाणी दिल्यावर तिने लगेच पाणी पिऊन घेतलं.
नाडकर्णी: आता न घाबरता सांग, काय झालं ते...
खुशीने त्यांना नचिकेतने कसा तिचा दोन दिवसांपूर्वी पाठलाग केला होता आणि आज त्याने तिची लायब्ररीत जाताना कशी वाट अडवली इथपासून ते मॅडम येण्यापर्यंतचा सगळा प्रकार सांगितला.
नाडकर्णी: या नचिकेतच्या parents शी मला नक्कीच यावर बोलावं लागेल. (खुशीकडे पाहून) त्या दोघांना आत बोलावलं आहे म्हणून सांग. खुशीने त्या दोघांना आत बोलावलं.
नाडकर्णी: नचिकेत पालंडे तुझे वडील आपल्या कॉलेजचे एक ट्रस्टी आहेत याचा अर्थ हा होत नाही तू केलेल्या कोणत्याही गोष्टी माफ केल्या जातील. मी आजच पालंडे यांच्याशी तू हा जो प्रकार केला आहे त्याबद्दल बोलणार आहे आणि तुला या कॉलेजमध्ये शिकू द्यायचं की नाही हा निर्णय घेतला जाईल.
नचिकेत: मॅम, प्लीज असं करु नका... माझं वर्ष वाया जाईल अशाने... हवं तर मी या दोघांची माफी मागतो.
नाडकर्णी: माफी तर तुला मागावीच लागेल ती पण लेखी... आणि ते ही मि पालंडे यांच्यासमोर...
नचिकेतने मान खाली घालून होकार दिला.
नाडकर्णी: नचिकेत, जर कमिटीचा निर्णय तुला एक संधी द्यायचा ठरला तर मला पुन्हा तुझी कोणतीही तक्रार येता कामा नये हे लक्षात ठेव. (खुशीकडे पाहून) खुशी, याने किंवा इतर कोणीही कसला ही त्रास दिला तर तू माझ्याकडे complaint घेऊन येऊ शकते. पण हे पण एक लक्षात घे, घर, कॉलेजच्या बाहेरच्या जगात प्रत्येक व्यक्तीला स्वतःच रक्षण कसं करायचं हे आलंच पाहिजे. आज तुझ्या मदतीला विवेक होता पण प्रत्येक वेळी कोणी तरी असेलच असं नसतं. मी काय म्हणते आहे ते समजत आहे ना तुला...?
खुशी: येस मॅम...
नाडकर्णी: उद्या मि पालंडे येतील तेव्हा तुम्हाला तिघांना ही केबिन मध्ये पुन्हा बोलावलं जाईल.
तिघे: ओके मॅम...
नाडकर्णी: आता तुम्ही निघू शकता.
तसे तिघेही केबिन मधून बाहेर पडले. नाडकर्णी मॅडमनी लगेच मि पालंडे यांना घडलेला प्रकार सांगून दुसऱ्या दिवशी येण्याबाबत सांगितलं. मि पालंडे यांना त्यांच्या मुलाने केलेला प्रकार कळल्यावर वाईट वाटलं त्यांनी नाडकर्णी मॅडमची माफी मागून दुसऱ्या दिवशी येण्याबाबत ही कळवलं.
***

विवेक, खुशी आणि नचिकेत तिघेही कॉलेजच्या बाहेर आले. नचिकेत दोघांना सॉरी म्हणून त्याच्या बाईकवर बसून निघून गेला. तो निघून गेल्यावर विवेक, खुशी दोघेही शांतच होते.
विवेक: खुशी, आय ऍम सॉरी....
खुशी: तू सॉरी कशाला म्हणतोय, चूक त्याची होती...
विवेक: मी त्यासाठी सॉरी नाही म्हणत आहे. त्या दिवशी जेव्हा तुला वाटलं मी तुझा पाठलाग करत आहे म्हणून... तेव्हा मी तुला रागाच्या भरात खूप काही बोलून गेलो. त्याबद्दल खरंच खूप सॉरी... मी खूप बोललो तुला....
खुशी: इट्स ओके... मला पण तुला त्याच साठी सॉरी म्हणायचं आहे. मी ही तुला त्यावेळी बडबडले होते त्यासाठी सॉरी.
विवेक: (हसून) माफ करेन पण एका अटीवर...
खुशी: कोणत्या...?
विवेक: कॅन्टीनमध्ये माझ्या बरोबर कॉफी घेशील का...?
खुशी: (घड्याळात पाहून) हो चालेल.
विवेक: तुला लेट होत असेल तर काही हरकत नाही आपण उद्या घेऊ.
खुशी: (हसून) नाही नाही, आहे वेळ माझ्याकडे... जाऊ आपण...
दोघेही हसत बोलत कॅन्टीनच्या दिशेने निघून गेले.
***

विवेकने कॅन्टीनमध्ये जाऊन एका टेबलवर त्याची बॅग ठेवली आणि खुशीला तिथेच बसायला सांगून तो कॉफी आणायला निघून गेला. खुशीने मोबाईलवर खूशबूचा काही मेसेज आला का पाहून मोबाईल बॅगमध्ये ठेवला आणि तिने वर पाहिलं. विवेक समोरुन तिला दोन कॉफी आणताना दिसून आला. त्याने हळूच कॉफी तिच्या समोर ठेवली.
विवेक: घे, मस्त वाटेल...
खुशी: (कॉफीचा कप उचलत) हो घेते...
विवेक: (खुशी कॉफी पिणार इतक्यात) एक मिनिट थांब...
खुशी: (कॉफी पिणार इतक्यात थांबली) काय झालं...
विवेक: तुला अजून साखर हवी असेल तर सांग हा... मी घेऊन येईन...
खुशी: (हसून) चालेल...
दोघांनी कॉफीचा एक एक घोट घेतला आणि एकमेकांकडे पाहून हसले.
विवेक: चांगली आहे ना की अजून साखर हवी...? मी मला जितकी लागते तेवढीच टाकली होती म्हणून विचारतोय.
खुशी: हां ओके आहे, चालेल मला. नको आहे साखर.
विवेक: (पुन्हा संभाषण वाढवण्यासाठी) मग कसं वाटलं कॉलेज...
खुशी काही बोलणार इतक्यात अमिषा, अखिलेश आणि जय तिकडे आले.
विवेक: तुम्ही इकडे... (मग अमिषाकडे पाहून) तू पण इकडे कशी काय...?
खुशी: अमिषा, तू यांच्या बरोबर... तू यांना ओळखते...?
अखिलेश: हे थांबा थांबा, सांगतो सांगतो सगळं... बसू का आधी...
विवेक: हो बसा बसा...
सगळेजण त्या दोघांबरोबर बसले.
जय: (अखिलेशला) तुम्ही दोघे कॉफी घेणार आहात का...? म्हणजे मी आणतो.
अखिलेश: (अमिषाकडे पाहून) चालेल.
जय 3 कॉफी आणायला निघून गेला. खुशी अजूनही अमिषाकडे इशाऱ्याने विचारत होती. अमिषा ही तिला सांगते म्हणून इशारा करत होती.
अखिलेश: तर विवेक, तुला ओळख करुन देतो, ही अमिषा...
विवेक: माहीत आहे मला...
अखिलेश: तसं नाही रे म्हणायचं आहे मला...
विवेक: मग
अमिषा: खुशी, मी तुला म्हणाले होते ना, मी तुला ओळख करुन देईन कधीतरी...
खुशी: हां म्हणाली होतीस...
अमिषा, अखिलेश: (एकमेकांकडे हाताने ईशारा करुन त्या दोघांना म्हणू लागले) आम्ही दोघे समजलं ना...
खुशी, विवेक: ओह हो, समजलं समजलं...
तोपर्यंत जय कॉफी घेऊन आला.
विवेक: मग आता काय म्हणायचं आम्ही अमिषाला...
अमिषा: सध्या तरी अमिषाच... (मग खुशीची ओळख करुन देत) ही खुशी माझी खास फ्रेंड. खुशी,(जयकडे हात दाखवत) हा जय... आणि (विवेककडे हात दाखवत) हा तर माहीत आहे तुला... तिचं बोलणं ऐकून खुशी विवेककडे पाहून हसली.
विवेक: (घड्याळात पाहून) चलो एव्हरीबडी, मी निघतो... मला लेट होईल नाहीतर...
अमिषा: कुठे लेट होईल...?
खुशीचे ही तो काय बोलतो याच्याकडे कान टवकारले गेले.
विवेक: अग मी पार्ट टाईम जॉब करतो एका ठिकाणी तिथेच जातोय.
अमिषा: अच्छा... ओके देन बाय...
विवेक: येस बाय... (मग त्याने खुशीकडे ही पाहून बाय केलं)
खुशी: तुम्ही दोघे पण जॉब करतात का...?
जय: नाही म्हणजे मी वेगळ्या एका ठिकाणी जातो...
अखिलेश: (अमिषाकडे पाहत) आणि हिला घरी सोडणं हाच माझा सध्यातरी जॉब...
अमिषा: अखि, तू पण ना...
अखिलेश: जय, वेगळ्या एका ठिकाणी म्हणजे कुठे रे...
जय: भावा, कळेल की, काय घाई आहे...
अखिलेश: ओह, आलं बरं का लक्षात...
जय: (त्याच्या हातावर टाळी देत) हां आता कसं...
खुशी आणि अमिषा दोघीही न काही समजल्याने एकमेकांना पाहू लागल्या.
खुशी: निघूया का आपण..?
तिघे: हं, चालेल... तसे चौघेही कॅन्टीन मधून निघाले.
अमिषा: खुशी, तू विवेकला सॉरी म्हणालीस का...?
खुशी: हो म्हणाले, पण...
अमिषा: पण काय...
खुशीने तसं सगळं काही सांगितलं.
जय: तो नचिकेत तर ना... धरुन त्याला कधीतरी गाठलंचं पाहिजे बघ...
अखिलेश: तुला अजून काही नाही ना त्रास दिला त्याने...?
खुशी: नाही नाही, विवेक नेमका त्याच वेळी आला सो काही त्रास नाही देऊ शकला तो...
अमिषा: पण हा नचिकेत आहे तरी कोण...?
जय: आपल्या कॉलेजच्या एका ट्रस्टीचा मुलगा... ट्रस्टी तसा स्वभावाने चांगला आहे असं मी ऐकलं आहे पण हा नचिकेत त्याच्या बाबांच्या एकदम विरुद्ध. तू सांभाळूनच रहा बरं का...!
खुशी: पण त्याने मॅडम समोर माफी मागितली की यापुढे असं कधीही वागणार नाही म्हणून...
अखिलेश: नचिकेत आहे तो... त्याच्या बोलण्यावर जाऊ नकोस... तो काय कसा वागेल त्याचा नेम नाही.
खुशी हे ऐकून घाबरली. तिला असं घाबरलेलं पाहून अमिषा त्या दोघांना म्हणाली, "अरे, काय घाबरवत आहात माझ्या फ्रेंडला...?"
दोघे: ओह सॉरी, पण आम्हाला तिला घाबरवायचं नाही आहे तर सावध रहावं इतकंच वाटतं आणि आम्ही असू ना anytime मदतीला...
जय: जसा आज आपला विवेक होता... (जय विवेक या शब्दावर थोडा जोर देत म्हणाला)
अखिलेश: अमिषा, चल निघूया आपण...
अमिषा: खुशी, तू जाशील का नीट...
खुशी: हो हो जाईन मी...
जय: मी आहे ना... मी सोडतो तिला...
अमिषा: (अखिलेशच्या बाईकवर बसत) थँक यू जय, बाय खुशी, बाय जय...खुशी घरी पोहचली की मेसेज कर... म्हणत दोघेही बाईकवरुन निघून गेले.
***

जय: (खुशी बरोबर चालत चालतच बोलू लागला) खुशी, तुला कुठे सोडायचं आहे...?
खुशी: इथे बाजूलाच एक बिल्डिंग आहे ना तिकडेच जायचं आहे मला...
जय: तू कॉलेजच्या इतक्या जवळ राहतेस...?
खुशी: नाही नाही, तिथे माझ्या बहिणीची फ्रेंड राहते. सो मी आणि माझी बहीण आम्ही तिथे भेटतो आणि मग एकत्र घरी जातो.
जय: ओके, ठीक आहे. मी तुला तिथे सोडतो मग...
खुशी: हं चालेल...
जय रस्त्यात तिला विवेक आणि अखिलेश त्याचे पक्के मित्र कसे बनले हे सांगतच बिल्डिंगपाशी आला.
जय: बघ, तुझी बिल्डिंग आली.
खुशी: हां... थँक यू वि (ती विवेक बोलणार तेवढ्यात थोडा वेळ थांबली मग परत त्याला म्हणाली) सॉरी थँक यू जय...
जय: इट्स ओके, एका दिवसात नाव पाठ नाही होणार... समजू शकतो मी... घरी गेल्यावर मात्र आठवणीने अमिषाला मेसेज कर...
खुशी: (हसून) हो नक्की... बाय अँड थँक यू वन्स अगेन...
जय: अजून किती ते थँक यू ऐकावं लागणार आहे मला...
खुशी: (जोरजोरात हसू लागली) अच्छा बाय... म्हणत ती निघून गेली. मग जय ही त्याच्या रस्त्याला जायला निघाला.
***

खुशी-खुशबू नेहमी प्रमाणे त्यांचा बुरखा घालून योगिताला बाय बोलून तिच्या घरुन निघाले. रस्त्यात दोघींचं नेहमी प्रमाणे बोलणं सुरु झालं.
खुशबू: तो खुशी, तुमने माफी मांगी या नहीं... उस नेक दिल इंसान से...?
खुशी: हां खुशबू, सच में नेक दिल ही है वो... और उसके दोस्त भी...
खुशबू: ओह, तो बात इतनी आगे बढ भी गयी की दोस्तोंसे भी मुलाकात हो गयी...
खुशी: खुशबू, काही तरीच असतं तुझं...
खुशबू: बरं मग तूच सांग कसं ते...
खुशीने तिला घडलेला सगळा प्रकार सांगितला.
खुशबू: या अल्लाह, खुशी, तुझ्या आईबाबांना तर नाही ना बोलावलं आहे...?
खुशी: नाही नाही... फक्त त्या नचिकेतच्या बाबांना... पण मला त्याची भीतीच वाटते आहे. म्हणजे त्याने परत काही केलं तर...
खुशबू: हं, घरी सांगायला हवं का आपण...?
खुशी: नको, तुम्हे तो पता है फिर आगे क्या होगा वो...
खुशबू: हां वो भी है... अभी मुझे लग रहा है, हम दोनो को कराटे भी सिख लेना चाहीए...(ती हातानेच हा हू करून इशारे करु लागली)
खुशी: खुशबू, चूप हो जा, किसी की आँखे फोड देगी घर जाते जाते...
खुशबू: नहीं रे, मी तर फक्त बघत होते की कसं करु आपण ते...
लेकिन हमें सच में सिखना चाहीए.
खुशी: हो बाबा, शिकूया.... चल आता लवकर... म्हणत दोघीही भरभर घरी जायला निघाल्या.

क्रमशः


🎭 Series Post

View all