अस्तित्व एक संघर्ष
पर्व-२ -अबोल प्रीत
भाग-८
खुशी-खुशबू दोघींचं पदवीच्या पहिल्या वर्षांचं कॉलेज सुरु झालं होतं. दोघींनी कॉलेजमध्ये त्यांच्या क्लासमध्ये जाण्यापूर्वी बुरखा काढून बॅगेत भरला. कॉलेज त्यांच्यासाठी सुरक्षित असल्याने त्यांना अकबर आणि श्रीधर दोघांनी बुरखा न घालता लेक्चर अटेंड करायची परवानगी दिली होती. काहीच दिवसांत खुशीची अमिषा नावाच्या मुलीशी आणि खुशबूची योगिता नावाच्या मुलीशी घनिष्ठ मैत्री झाली. योगिता कॉलेजच्या शेजारील परिसरात राहत होती. मग काय खुशबू आणि खुशी रोज कॉलेज मध्ये येण्यापूर्वी योगिताच्या घरी जाऊन बुरखा बॅगेत भरुन कॉलेजला येत असत. काही आठवडे असेच निघून गेले आणि खुशबूला तिच्याच कॉलेजमध्ये स्टुडन्टसाठी कमी दरात अभ्यासाच्या गोष्टी मिळत असलेल्या डिपार्टमेंटमध्ये घेण्यात आलं. तिथे तिला बुक किंवा इतर गोष्टी सेल झाल्यावर बिलिंग करायचं काम मिळालं. काम मोजून दीड तासांचं असलं तरी त्याबद्दल तिला मोबदला म्हणून काही पैसेही मिळणार होते. अर्थात हे सगळं ती घरी न सांगता करणार होती. त्यामुळे खुशीला ही तिच्यासाठी थांबण्याव्यतिरिक्त गत्यंतर नव्हतं. खुशी त्यामुळे लायब्ररीमध्ये अभ्यास करत तेवढा वेळ थांबत असे. खुशबूचं काम आटपलं की ती खुशीला मिसकॉल देत असे मग खुशी तिथून निघत असे.
***
विवेक त्याच्या मित्रांशी लेक्चर संपल्यावर गप्पा मारत पायऱ्या उतरत होता. तो गप्पांमध्ये इतका मश्गुल होऊन चालत होता की समोरुन पायऱ्या चढत येणाऱ्या खुशीकडे त्याचं लक्ष गेलं नाही. खुशी ही पुस्तकं हातात सांभाळून खाली मान घालून पायऱ्या चढत होती. दोघेही आपापल्या विचारात चालत असल्याने विवेकचा बाजूने चालणाऱ्या खुशीला जोरात धक्का लागला. विवेकचं लक्ष गेलं तसं त्याने ती पाय घसरून खाली पडणार तेवढ्यात पटकन तिचा एक हात पकडून दुसरा हात मागून कंबरेला पकडला. तिच्या हातातील पुस्तके खाली पडली होती. विवेकच्या मित्रांनी ती भरभर उचलली. ती घाबरुन त्याच्याकडे पाहत होती तर तो मात्र तिला पाहून हरवून गेला होता. गोल चेहरा, ओठांची होणारी थरथर, खांद्यापर्यंत रुळणारे कुरळे केस, घारे डोळे आणि त्या डोळ्यांना प्रोटेक्ट करणारा ब्राऊन रंगाचा चष्मा. आपला मित्र अजून काही तिला सोडत नाही आहे हे पाहून जय जोरात खाकरला. तसा विवेक भानावर आला आणि त्याने तिला सोडत विचारलं, "are you alright...?" खुशीने मानेनेच हो म्हटलं आणि संकोचून उभी राहून आपली पुस्तकं बघू लागली. लगेच विवेकचा मित्र अखिलेशने पुस्तके तिच्या हातात दिली. ती अखिलेशला thank you म्हणत मग विवेककडे पाहत त्याला ही thank you म्हणून लायब्ररीच्या दिशेने निघून गेली. विवेक मात्र कितीतरी वेळ तिकडेच पाहत होता. त्याला असं बघताना पाहून जय म्हणाला, "अरे, आता परत येईपर्यंत इथेच थांबणार आहेस का...?" त्याचं बोलणं ऐकून विवेक भानावर आला.
विवेक: काही बोललास...?
जय: (अखिलेशला टाळी देत दोघेही हसू लागले) काही नाही... काही नाही...
विवेक: नवीन आली आहे वाटतं...कोणत्या वर्षाला आहे काय माहीत... कधी पाहिलं नाही...
अखिलेश: नवीन तर आहे... फर्स्ट इयरला आहे...
विवेक: तुला कसं कळलं... तू ओळखतो तिला...?
अखिलेश: जेव्हा तू तिच्यात हरवून गेला होतास ना भावा, तेव्हा तिची खाली पडलेली पुस्तकं आम्ही उचलली ना राव...
जय: अखी, काही खरं नाही विकीचं... एक बार क्या उसे देखा तो ये तो अपने यारोंको भी भूल गया...
विवेक: (दोघांच्या मानेवर त्याचे हात ठेवून पकडत) भरपूर खेचली हां माझी, तुम्ही समजतात तसं काही नाही आहे... चला निघूया आता...
दोघे: (स्वतःला सोडवून) हो बाबा तुझंच खरं...
विवेक: आता निघायचं की घेऊ तुम्हाला एकेका कोपच्यात...
अखिलेश: चल मित्रा चल..
तसे तिघेही कॉलेजमधून बाहेर पडले.
***
विवेक दोघांशी थोडा वेळ कट्ट्यावर गप्पा मारुन बाय बोलून त्याच्या पार्ट टाइम जॉब करत असलेल्या ठिकाणी गेला. काम करत असताना त्याला तीच आठवत होती... विवेक, लक्ष देऊन काम कर... का तिचा विचार करतोय... तो मनाशीच म्हणाला आणि पुन्हा कामात बिझी झाला. घरी आल्यावर ही कॉलेजच्या नोट्स पूर्ण करत असताना त्याला अखिलेश आणि जयचं बोलणं आठवलं आणि तो अभ्यास करता करता हसू लागला. प्रेरणा नुकतीच फ्रेश होऊन रुममध्ये आली होती आणि विवेकला असं हसताना पाहून ती त्याच्या जवळ येऊन म्हणाली, "काय रे काय झालं, एकटाच काय हसतोय...?"
विवेक: काही नाही ते आठवलं... (मग आपण कोणा समोर बोलतो आहोत हे त्याला लक्षात आलं) काय नाही ते...आपलं...
प्रेरणा: ते आपलं काय... ठीक आहेस ना तू...?
विवेक: अग काही नाही ग...
प्रेरणा: नक्की का... प्रेमात बिमात नाही ना पडला कोणत्या मुलीच्या...
विवेक: ए दीदी, जरा हसलो काय मी एकटाच... तू तर एकदम प्रेमात पडलास का विचारायला लागलीस... (मग थोडा वेळ थांबून) एक मिनिट.. एक मिनिट... तुला कसं माहीत प्रेम अँड ऑल... तू तर नाही ना पडलीस कोणाच्या प्रेमात....?
प्रेरणा: (त्याच्या पाठीवर मारत) छे रे, मीना आहे ना टीम मधली तिचं आता लग्न आहे. तिचं लव्ह मॅरेज आहे तर ती सुद्धा अशी एकटीच काहीतरी आठवून हसत बसते म्हणून आपलं तुला विचारलं आणि पळ काढला.
विवेक: दीदी तू पण ना म्हणत तो ही प्रेरणाच्या मागे धावू लागला.
***
खुशबू: अम्मीजान, अन्वर भाईजानने कॉल किया था, वो घर आते वक्त कबीर को स्कूल से लेकर आने वाले है
फातिमा: हां हां, हमें और तुम्हारी बुआ नूर को भी उन्होने कॉल किया था
खुशबू: (डोक्याला हात लावून) ये भाईजान भी ना... मला वाटलं होतं फक्त मलाच सांगितलं... यांनी तर तुला ही सांगितलं आणि नूर आत्येला पण सांगितलं. तिचा चेहरा पाहून खुशीला हसू आवरेना.
नूर: खुशी का हसतेय अशी... आता खुशबूला थोडी ना माहीत होतं की आम्हाला माहीत आहे ते...
खुशबू: (नूरच्या गळ्यात हात घालून) हां आत्या, अजून ओरड... हसते ती माझ्यावर...
फातिमा: (खुशीला स्वतः जवळ बोलवत) वाह रे वाह खबरदार कोणी माझ्या खुशीला ओरडलात तर...
खुशी फातिमाला बिलगून खुशबूकडे पाहून हसू लागली.
खुशबू: अम्मी, आप मेरी अम्मी हो या खुशी की... तुम्हाला माझी साईड घ्यायला हवी ना...
फातिमा: वाह रे वाह, तुझी आत्या तुझी बाजू घेणार आणि मी माझ्या भाचीला एकटं सोडू...
अकबर: (घरी येत) क्या हो रहा है, तुम चारों का...
अब्दुल (श्रीधर): (त्याच्या मागून येत) खुशी बेटा, जरा पाणी आण
खुशी लगेच पाणी घेऊन येते
नूर (श्रेया): (श्रीधरच्या बाजूला बसून हळूच विचारते) काय झालं, एकदम आल्या आल्या पाणी मागितलं. अकबरला ती अब्दुलला काय विचारते हे लक्षात येतं म्हणून तो तिच्याजवळ येतो.
अकबर: अक्का, नंतर बोलूया... मुली पण आहेत इथे..
नूरने मानेने होकार दिला आणि पुन्हा किचन मध्ये वळली.
फातिमाने नूरच्या खांद्यावर हात ठेवून तिला शांत रहायला सांगितलं. खुशबूचं लक्ष काय चाललं आहे त्याकडेच असल्याने तिला नक्की कुठेतरी काहीतरी सिक्रेट आहे जाणवलं.
***
अन्वर कबीरच्याच शाळेत सर म्हणून शिकवत असल्याने आणि त्याला आज जास्त लेक्चर नसल्याने तो येतांना कबीरला सोबत घेऊन आला. कबीरने आल्यावर त्याच्या नेहमीच्या ठिकाणी बॅग ठेवली आणि तो, अन्वर फ्रेश होऊन आले. घरातील शांतता पाहून अन्वरला काहीतरी गडबड तर नाही ना झाली याची शंका आली. रात्री यावर बोलू म्हणत तो शांत राहिला. खुशबूच्या डोक्यात तर आज काहीही करुन नक्की काय प्रकार आहे ते जाणून घ्यायचा निर्णय पक्का झाला. आता तिला फक्त वाट पहायची होती त्यांच्यात काय बोलणं होतं आहे त्याची.
***
रात्री खुशबू, खुशी आणि कबीर झोपले आहेत याची खात्री करुन घेतल्यावर सगळे अकबर-फातिमाच्या रुममध्ये आले. अन्वरने एकवार हॉलमध्ये नजर फिरवून रूमचा दरवाजा बंद करुन घेतला. खुशबू खुशी झोपली आहे ना हे पाहून हळूच तिच्या बेडवरुन खाली उतरली आणि ती फातिमा-अकबरच्या रुमच्या दाराजवळ कान टेकवून उभी राहिली. तिला आतलं त्यांचं बोलणं ऐकू येऊ लागलं.
नूर (श्रेया) : श्रीधर, आता तरी सांगाल का काय झालं...?
अब्दुल (श्रीधर) : आपल्या विकलेल्या रुमचा पत्ता शरदला कळला तो तिथे आपली चौकशी करायला गेला होता.
नूर (श्रेया) : (घाबरुन बेडवर बसत) काय...?
अब्दुल (श्रीधर) : घाबरु नकोस, तिथे कोणाला ही श्रीधर-श्रेया कोण आहेत ते माहीत नाही आहे..
फातिमा : (श्रेयाच्या खांद्यावर हात ठेवून) डर मत नूर, आम्ही आहोत ना सगळे तुमच्या बरोबर...
अकबर : हां अक्का, फातिमा सही कह रही है...
नूर : भाईजान, भाईजान तुम्ही त्या शरदला नाही ओळखत तो किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो ते... (बोलता बोलता ती रडू लागली)
फातिमा : नूर, शांत हो... आपण इतकी वर्षे जपूनच राहिलो आहोत ना... आता पण राहू... बघ खुशबू ही खुशीबरोबरच यायला जायला असते आणि आपला कबीर तो तर अन्वरच्या डोळ्यासमोरच आहे... मग का घाबरतेस तू अशी...
नूर: भाभी, खूप जीव तुटतो ग माझा... जेव्हा माझा पोटचा गोळा मला आई म्हणून हाक न मारता छोटी अम्मी म्हणून हाक मारतो. खूप मन करतं माझं त्याने मला एकदा तरी आई म्हणून हाक मारावी म्हणून...
फातिमा : आपण कबीरला सगळं खरं खरं सांगायचं का?
अब्दुल (श्रीधर) : नको नको, इतकी वर्षे थांबलोत आता अजून थोडा वेळ थांबूया...
अकबर: श्रीधर, बरोबर म्हणतोय...
तेवढ्यात बाहेर उभं राहून ऐकणाऱ्या खुशबू कडून टेबलवर ठेवलेला फ्लॉवर पॉट पडला.
फातिमा: कोणी तरी आहे वाटतं बाहेर...
अन्वर: मी बघतो थांब... म्हणत रूममधून बाहेर आला. पण आपण पकडले जाऊ या भीतीने खुशबू आधीच एकीकडे लपून बसली. अन्वरने एकवार सगळीकडे पाहिलं आणि तो पुन्हा रुममध्ये निघून गेला. तो निघून गेला तसा खुशबूने चेहऱ्यावरचा घाम पुसून घेतला. आता तिथेच उभं राहून ऐकणं तिला शक्य नसल्याने ती तिच्या रुमच्या दिशेने जायला निघाली.
अन्वर: अम्मी, कोणी नव्हतं बाहेर...
फातिमा: मग आवाज कसला झाला...
अन्वर: नाही माहीत पण मी खात्री करून घेऊनच आलो आहे.
फातिमा: बरं...
अन्वर: अम्मी, अब्बू हमें लगता है कि हमें खुशबू और खुशी को तो ये बात बताना जरुरी है...
अब्दुल (श्रीधर): अन्वर बेटा, ऐसा आपको क्यूँ लग रहा है...? मतलब कुछ तो आपके दिमाग में जरुर बात आई होगी जिसके बाद आप ये नतिजे में पहुंच गए होंगे...
आता सगळ्यांच लक्ष अन्वर काय बोलतोय याकडे लागून होतं. कारण अन्वर एक खूप समजूतदार, चाणाक्ष आणि दूरदृष्टीने विचार करणारा मुलगा होता.
अन्वर: हमें ऐसे इसलिए लग रहा है कि खुशी और खुशबू को ये बात पहले से पता रही तो वो कोई भी डिसीजन लेने से पहले दो बार जरुर सोचेंगी. अभी भी दोनो जो भी करती है सोच समझकर करती है लेकिन अगर उसके पिछे असली वजह क्या है ये अगर पता रहे तो वो सतर्क रहेगी.
सगळ्यांनी त्याचं बोलणं ऐकून घेतलं. हा विचार तर त्यांच्या चौघांच्या ही मनात आला नव्हता. कोणीच काही बोलत नाही आहे हे पाहून अन्वर पुन्हा म्हणाला, "मी बोललो ते योग्यच बोललो ना...?"
अब्दुल (श्रीधर): हां बेटा, तुम सच कह रहे हो... हमें उन दोनो को ये बात बताना जरूरी है...
नूर (श्रेया): आता नको, उद्या रात्री दोघींना याबद्दल सांगू...
फातिमा: हां, अभी रात भी बहुत हो चुकी है... कल उन दोनो से बात कर लेंगे.
अब्दुल (श्रीधर) : अकबरमिय्या, फातिमा आपा आप दोनो अभी सो जाईए, मै और श्रेया भी सोने जा रहे है... अन्वर बेटा आप भी अब सोने जाईए...
अन्वर: हां मामाजी... शब्बा खैर... आप सबको...
सगळे: शब्बा खैर बेटा...
अन्वर त्या रुममधून बाहेर पडला आणि पाणी पिण्यासाठी किचनमध्ये निघून गेला.
नूर (श्रेया) : (फातिमाला मिठी मारून) शब्बा खैर भाभी...
फातिमा: शब्बा खैर, और अभी आप टेन्शन लेना बंद किजीए.... हम सब एकसाथ थे और एकसाथ ही रहेंगे...
नूरने मानेने होकार दिला आणि फातिमाला पुन्हा बिलगली.
अब्दुल (श्रीधर): श्रेया, रात्र खूप झाली आहे चल जाऊ...
नूर (श्रेया): (मिठीतून दूर होत) हो...
दोघेही फातिमा, अकबरच्या रुममधून बाहेर पडून स्वतःच्या रुमच्या दिशेने निघून गेले.
***
अन्वर पाणी पिण्यासाठी किचनमध्ये आला. त्याला तिथे आधीच खुशबू पाणी पिताना दिसली. अन्वरला पाहून खुशबू थोडी घाबरली.
अन्वर: (तिला असं घाबरलेलं पाहून) आप ऐसे डर रही हो जैसे की हमने आपकी कुछ गलती पकड ली हो..
खुशबू: (थोडी पुन्हा घाबरुन) गलती कैसी गलती भाईजान...?
अन्वर: वही गलती जो आपके चेहरे से साफ नजर आ रही है...
खुशबू: भाईजान, आप क्या बोल रहे हो, हमें कुछ समझ नहीं आ रहा है...
अन्वर: तुम्हीच होतात ना मघाशी तिकडे...
खुशबू: (काही न कळलं असं दाखवत) कुठे... कुठे बोलताय भाईजान...
अन्वर: तोच फ्लॉवर पॉट पडला तो तुमच्याकडून ना... आम्ही पाहिलं तुम्हाला...
खुशबूच्या लक्षात आलं आता खोटं बोलून काही उपयोग नाही. तिने लगेच स्वतःचे हात त्याच्या समोर जोडले.
खुशबू: भाईजान, हमारी गलती माफ किजीए... हम आपकी बात चुपकेसे सुन रहे थे... तुम्ही सगळे असे अचानक टेन्शनमध्ये का येतात त्याचाच विचार मला राहून राहून येत राहतो... म्हणून मी असं वागले. पण तुम्ही अम्मी अब्बूला आणि आत्या-मामाना नका सांगू...
अन्वर: (काही विचार करुन) हं ठीक आहे. हम नहीं कुछ बताऐंगे किसी को... और आप भी खुशी या कबीर को इस बारे में ना बताए...
खुशबू: हां भाईजान...
अन्वर: और हां, उद्या अम्मी आणि आत्या तुम्हाला दोघींना याबद्दलच सांगणार आहेत तर मग त्यावेळी तुम्हाला यातलं काही माहीत आहे हे त्यांना लक्षात येता कामा नये..
खुशबू: हो भाईजान...
अन्वर: जावा आता झोपा खूप उशीर झाला आहे...
खुशबू: हो हो, गुड नाईट भाईजान...
अन्वर: हं, गुड नाईट..
खुशबू अन्वरला गुड नाईट म्हणून तिच्या रुममध्ये झोपायला निघून गेली. अन्वरही पाणी पिऊन त्याच्या रुममध्ये झोपायला निघून गेला.
***
कॉलेज मध्ये लेक्चरस संपले तसं विवेक, जय आणि अखिलेश निघू लागले. तिघेही त्याच पायऱ्यांपाशी पोहचले जिथे खुशी दिसली होती तसा विवेक थोडा थांबून इकडे तिकडे पाहू लागला.
जय: का रे मध्येच का थांबलास...?
अखिलेश: भावा, आज पुन्हा तिच्या धडकण्याची वाट पाहत थांबायचं आहे का...?
दोघेही त्याच्यावर जोरजोरात हसू लागले.
विवेक: गप्प बसा रे... चला निघूया... उशीर होतो आहे ना...
जय: (हसणं थांबवत) नाही रे आम्हाला नाही उशीर होत आहे... तुला होतोय का कुठे जायला...?
विवेक: थांबा मग इथेच मी निघतो...
जाणाऱ्या विवेकच्या मागे तसे दोघेही धावू लागले.
अखिलेश: चालतं की इतकं मैत्रीत... एवढं काय रागवायला हवं...
जय: आणि तू तिच्यात त्यावेळी हरवूनच इतका गेला होतास की आमच्या जागी दुसरं कोणीही असतं तर त्यांनी पण तुला असंच चिडवलं असतं.
विवेक: नाही रे तुम्ही समजतात तसं काही नाही आहे.
अखिलेश: चल जाऊ दे निघूया आपण...
विवेक: हो निघू चला...
तिघेही हसत हसत कॉलेजमधून बाहेर पडले.
***
रात्री पुन्हा एकदा सगळेजण फातिमा-अकबरच्या रुममध्ये जमले होते आणि आता ते सगळे खुशी आणि खुशबूच्या येण्याची वाट पाहत होते. अन्वर त्या दोघींना घेऊन रुममध्ये आला. खुशबूला आधीच माहीत असल्याने तिला तितकं टेन्शन नव्हतं पण खुशी काहीशी टेन्शनमध्येच रुममध्ये आली होती.
फातिमा: (दोघीना) बसून घ्या...
दोघीही बेडवर बसल्या. त्यांच्या एका बाजूला अन्वर, अकबर आणि दुसऱ्या बाजूला फातिमा बसली. श्रीधर, श्रेया दोघेही उभेच होते. श्रीधरने बोलायला सुरुवात केली. त्याने त्याच्या फॅमिलीबद्दल माहिती दिली. कशी त्याची आणि दिशा म्हणजेच श्रेयाची ओळख झाली तिथपासून ते मुंबईला येण्यापर्यंतची सगळी गोष्ट त्याने त्या दोघींना सांगितली.
श्रेया: खुशी, खुशबू आम्हाला तुम्हा दोघीना अजून एक गोष्ट सांगायची आहे...
खुशी: (काही टेन्शनमध्येच) कोणती गोष्ट...?
श्रेया: खुशी कबीर तुझा सख्खा भाऊ आहे... तू कबीरची मोठी बहीण आहे...
खुशी: (काहीशी शॉक लागून ओरडली) काय... पण मग तो फातिमा मामीना अम्मी आणि तुला छोटी अम्मी का म्हणतो...?
श्रेया: कारण, शरद आम्हाला शोधत मुंबई मध्ये आला तेव्हा कबीर माझ्या पोटात होता... आणि त्याच्या सुरक्षितेसाठी आम्हाला असं करावं लागलं. जेणेकरून जर तशी वेळ आलीच असती तर आम्ही कबीरला फातिमा भाभीकडे ठेवून तुला बरोबर घेऊन दुसरीकडे तात्काळ जाऊ शकलो असतो. कबीरला तसं घेऊन जागा बदलणं म्हणजे सगळ्यांच्या जीवाला धोका होता.
आमची मजबूरी होती त्यामुळे आम्हाला हे इतकी वर्षे लपवावं लागलं... माफ करशील ना तुझ्या आईबाबांना असं म्हणत श्रेयाने तिचे हात खुशीच्या समोर पुढे केले. खुशी लगेच येऊन तिला आणि श्रीधरला बिलगली. श्रेयाने खूषबूला ही आपल्यापाशी बोलावलं आणि तिला ही आपल्या मिठीत घेतलं.
खुशी: आता आपण सगळे सुरक्षित आहोत ना...?
श्रीधर फातिमा, अकबरकडे आता काय बोलावं असा विचार करून पाहू लागला. अकबर बेडवरून उठला आणि खुशी जवळ आला.
अकबर: खुशी बेटा, अभी तक हमारे सर से लटकती तलवार दूर नहीं हुई है... शरद आज भी तुम्हारे अम्मी अब्बू को मारने के लिए ढुंढ रहा है...
फातिमा: हां बेटा, आज हमने सब मिलकर तुम दोनो को ये बात सिर्फ इसिलिए बताई है ताकी तुम कही भी जाने से पहले, या किसी भी अजनबी से बात करते समय सोच समझकर बात कर लो...
खुशबू: हम सब वो इंदुमती और शरद इनको जेल क्यू नहीं भेजते...?
अन्वर: आप को क्या लगता है खुशबू, इतना करना आसान रहता तो श्रीधर मामाने अब तक उन्हे कब का जेल में भेज दिया होता... ये सब इतना आसान नहीं है जितना आपको लग रहा है.
श्रेया: आपण कधीतरी यातून नक्की बाहेर पडू.. तोपर्यंत आपल्याला आपली काळजी आणि खबरदारी ही घ्यावीच लागेल
श्रीधर: आणि अजून एक गोष्ट... कबीरला यातलं काहीही कळता कामा नये...
खुशी, खुशबू दोघींनी मानेने होकार दिला आणि कबीरचं गुपित त्या रुममध्येच बंदिस्त झालं.
***
क्रमशः
(ऑफिस वर्कलोड मुळे भाग पोस्ट करण्यात खूपच उशीर झाला यासाठी मी तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागते. यापुढे पुन्हा इतका उशीर होऊन तुम्हा सर्वांना वाट पाहावी लागणार नाही यासाठी नक्की प्रयत्न करेन.)