अस्तित्व एक संघर्ष-अबोल प्रीत-भाग-१५

Dance practice of Vivek & Khushi.

अस्तित्व एक संघर्ष

अबोल प्रीत-भाग-१५


(पूर्वार्ध- मागील भागात आपण पाहिलं की, खुशी आणि विवेक यांचं नाव त्यांच्या नकळत कोणी तरी dance competition मध्ये देतं. विवेकला बिलकुल नाचता येत नसल्याने पुढे तो competition मध्ये नाचू शकेल का? जाणून घेण्यासाठी वाचा पुढे काय झालं...)

घरी आल्यापासून विवेक रुममध्ये बसून डान्सबद्दलच विचार करत होता. तेवढ्यात तिथे प्रेरणा आली.

प्रेरणा: (विवेकच्या डोक्यात टपली मारत) काय रे, कसला एवढा विचार करतोय?

विवेक: (वर बघत) तू कधी आलीस?

प्रेरणा: (हातांची घडी घालून) जब विकी साहब, आप अपने खयालों में खोए हुए थे. आता सांग पाहू, कोण आहे ती मुलगी?

विवेक: मुलगी? कोण मुलगी?

प्रेरणा: तीच, जिच्याबद्दल तू एवढा विचार करतोय?

विवेक: (वैतागत) ए दीदी, विचार करतोय म्हणजे मुलीचाच करणार का?

प्रेरणा: (थोडा विचार करत) आता अभ्यासात तर तू हुशार आहे त्यामुळे परीक्षेचा तर एवढा विचार नाही करणार... आणि राहिलं ऑफिसचं टेन्शन तर तुझा बॉस तुला काही त्रास देत नाही सो विचार करत असला तर मुलीचाच करत असशील...

विवेक: एक मिनिट, माझा बॉस काही त्रास देत नाही म्हणजे तुझा देतो का? तसं काही असेल तर सांग... उगाच मनस्ताप सहन करत जॉब नको करुस...!

प्रेरणा: छे रे, माझा बॉस म्हणजे प्रतिक सर... ते आणि त्रास... स्वप्नात सुद्धा पण बिलकुल देणार नाही... एकदम फ्रेंडली ट्रीटमेंट मिळते आम्हाला बॉस कडून आमच्या...

विवेक: oh that's great... मग ठीक आहे...

प्रेरणा: तू विषय नको बदलू... कसला एवढा विचार करतोय ते सांग आता...

विवेक: अग माझं नाव दिलं आहे dance competition मध्ये

प्रेरणा: (चकित होऊन) काय...?

विवेक: हां ना... 

प्रेरणा: (मग जोरजोरात हसून) कोणी हा मूर्खपणा केला.

विवेक: ते मला ही माहीत नाही असं म्हणत त्याने घडलेला सगळा प्रकार सांगितला.

प्रेरणा: कोणी केलं असेल बरं.... तुला काय वाटतं?

विवेक: ते सोड दीदी, मला आता डान्सचं पडलं आहे. 

प्रेरणा: तू सुट्टी घेतोय बोललास ना! मग प्रॅक्टिस कर आणि परफॉर्म कर...

विवेक: तुला काय जातं बोलायला? मी कसा नाचतो हे तुला ही माहीत आहे. मला हसतील ग सगळे...

प्रेरणा: कोणी नाही हसणार... आहे तुझ्याकडे अजून वेळ शिकायला. आणि तुझे फ्रेंड्स म्हणाले ना, तुला मदत करणार म्हणून... मग झालं तर.

विवेक: पण मला सुट्टीची सॅलरी मिळणार नाही म्हणाले सर...

प्रेरणा: हां पार्ट टाइम जॉबला थोडी ना तुला सॅलरी मिळणार आहे आणि सध्या आलेल्या परिस्थितीला सामोरं जावं तर लागणार ना...!

विवेक: हो खरं बोलतेय तू...

प्रेरणा: मग कधी पासून सुरु करतोय प्रॅक्टिस?

विवेक: उद्यापासूनच.

प्रेरणा: ऑल द बेस्ट, आणि भले प्राईझ मिळो अथवा न मिळो पण परफॉर्मन्स मस्तच झाला पाहिजे.

विवेक: तू येशील ना बघायला?

प्रेरणा: allowed असेल तर नक्की येईन

विवेक: (प्रेरणाला मिठी मारत) मला टेन्शन येतंय ग... जमेल ना मला?

प्रेरणा: हो रे नक्की जमेल... (तेवढ्यात लिविंग रुम मध्ये असलेला प्रेरणाचा मोबाईल वाजू लागला. ) बहुतेक माझा मोबाईल वाजतोय. समिधा असणार बहुतेक... आलेच मी... म्हणत तिथून निघून गेली. 

***

दुसऱ्या दिवशी..

विवेक जय आणि अखिलेशची कॉलेज गेटबाहेर नेहमी प्रमाणे वाट पाहत होता. तेवढ्यात त्याला समोरून जय-अखिलेश खुशी-अमिषा बरोबर येताना दिसले.

विवेक: आज चौघेही एकदम...?

अखिलेश: मग आपल्याला डान्सची जी तयारी करायची आहे.

विवेक: नाव नको रे काढू डान्सचं... मला रात्रभर विचार करून करून झोप नाही लागली...

जय: (विवेकच्या खांद्यावर हात ठेवून) मै हूँ ना... तो किस बात की चिंता...

विवेक: बाबा रे, बोलणं खूप सोपं आहे पण जेव्हा आपली वाट लागते ना तेव्हा कळतं.

जय: विकी, मी आहे ना म्हणालो ना... मग कशाला टेन्शन घेतोय?

विवेक: तू तर असा बोलतोय की, जणू काही मला तू एकाच दिवसात डिस्को डान्सर बनवणार...

जय: चिल यार... कळेल तुला आज लेक्चर्स संपले की... चला आता लवकर... आज आत जायचं नाही आहे का?

अखिलेश: (घड्याळ बघत) अरे हो, फक्त 15 मिनिटं उरली आहेत. (मग अमिषाकडे पाहून) लेक्चर्स संपली की प्रॅक्टिस करायची आहे लक्षात राहू दे.

अमिषा: (त्याच्या समोर हात जोडून) हो रे बाबा नक्की येतो. निघू आता..

अखिलेशने मानेनेच हो म्हटलं तशी खुशीचा हात पकडून अमिषा घाईघाईने लेक्चर्सला गेली.

जय: (पाठमोऱ्या अमिषाकडे पाहत असलेल्या अखिलेशला हात लावत) तुमचं दर्शन घेऊन झालं असेल तर निघूया गुरुवर्य..

अखिलेश: (भानावर येत) हो हो मी तेच म्हणत होतो. जय पुढे काही बोलणार त्या आधीच अखिलेशने तिथून पळ काढला.

जय: (विवेकच्या खांद्यावर हात टाकून) आता तुला काय झालं?

विवेक: जमेल ना रे मला? मला टेन्शन आलं आहे रे खूप...

जय: जय हो तो, टेन्शन कायको लेने का? चल आता... असं म्हणत विवेकला घेऊन जय ही लेक्चर्ससाठी जायला निघाला.

***

सगळे लेक्चर्स संपल्यावर जयने सांगितल्याप्रमाणे अखिलेश, विवेक खुशी- अमिषाची वाट पाहत होते. दोघीही ठरलेल्या ठिकाणी आल्या. पण त्यांना जय कुठे दिसेना.

अमिषा: अरे, जय कुठे आहे? आणि डान्स कधी शिकवणार आहे?

अखिलेश: अग, त्यानेच आम्हाला तुम्हां दोघींना घेऊन यायला सांगितलं आहे.

अमिषा: कुठे?

विवेक: इथे प्रश्नांची उत्तरं देत बसलो ना की, आपली डान्स प्रॅक्टिस राहील बाजूला. चला लवकर निघू. विवेक अखिलेशच्या मागोमाग दोघीही निघाल्या.

***

खुशी: (अमिषाच्या कानात हळूच) यार नक्की, जातो कुठे आहोत.

अखिलेश: (त्यांची कुजबुज ऐकून) कळेल कळेल लवकरच...

काही वेळातच चौघेही एका मोठ्या अपार्टमेंटपाशी पोहचले.

विवेक: बघ आलोच आपण... म्हणत त्याने तळमजल्यावर असलेल्या एका रुमची बेल वाजवली. क्षणभरातच जयने येऊन रुमचा दरवाजा उघडला आणि त्याने त्यांना आत यायला सांगितलं. चौघेही ती रुम आ वासून बघत होते. त्या रुममध्ये एका ठिकाणी नटराजाची मूर्ती होती. मूर्तीसमोर असलेली फुलं आणि अगरबत्तीचा सुवास यावरुन नुकतीच पूजा झाल्याचा अंदाज येत होता.  चौघेही रुममध्ये इतरत्र पाहत होते. तेवढ्यात कोणत्या तरी मुलीचा आवाज आला, " काही चहा, कॉफी घेणार का?" चौघांनी वळून आवाज येत असलेल्या दिशेला पाहिलं. एक त्यांच्याच वयाच्या आसपास असलेली एक सुंदर मुलगी त्यांच्या समोर उभी होती. तिला पाहिल्यावर चौघांच्या नजरा आपसूकच जयकडे वळल्या. सगळे जयला पुढे काही विचारणार त्या आधीच त्या मुलीने स्वतःची ओळख करुन दिली.

ती: हाय, मी संजोत.... तुम्हाला.... ती पुढे काही बोलणार इतक्यात इतका वेळ दूर असलेला जय लगेच तिकडे येऊन म्हणाला, " ही संजोत, ही आणि मी... म्हणजे आम्ही दोघे...

अखिलेश: (मस्करी करण्याच्या इराद्याने) तुम्ही दोघे काय....

संजोत: आम्ही दोघे तुम्हाला डान्स शिकवणार आहोत.

जय: हो... तेच सांगत होतो मी... संजू त्यांना...

पण तिकडे त्याचं ऐकायला संजू होती कुठे. तिने समोर असलेला पडदा बाजूला केला. पडद्यामागे असलेल्या आरशात पाहत ती म्हणाली, " सुरु करायची का प्रॅक्टिस?"

जय: हो करुया ना...! पण तुझी त्यांच्याशी ओळख करुन द्यायची राहिली की...

संजोत: आतापर्यंत तू सगळ्यांची नावं इतकी वेळा घेतली आहेत की, मी स्वतःच त्यांना फक्त बघून ओळखेन.

जय: (केसांवरुन मागे हात फिरवत) ते मी खूप इक्सायटेड झालो होतो ना... त्या नादात खूपदा बोललो आहे त्यांच्याबद्दल....

संजोत: (हळूच बोलते) हो आणि जे बोलायला हवं ते कधी बोलायला जमलंच नाही...

जय: काही म्हणालीस का?

संजोत: छे कुठे काय...? करुया ना सुरवात?

अमिषा: (बॅग बाजूला ठेवून) येस आय ऍम रेडी... मागोमाग खुशी ही येते.

संजोत: (अमिषाला) तू अमिषा आणि ( खुशीकडे पाहून) तू खुशी.

अखिलेश: एकदम बरोबर.

संजोत: तू अखिलेश आणि ( मागे उभ्या असलेल्या विवेककडे हात दाखवून) हा विवेक.

अखिलेश: (जयच्या कानात हळूच) जय भाऊ, झाली की ओळख... आता तिची खरी ओळख आम्हाला कधी करुन देताय.

अमिषा: अखि, तिकडे काय करतोय जय सोबत... इकडे ये. माझ्या बाजूला.

अखिलेश: हो आलो.

संजोत: (जयकडे रागात पाहत) तुमच्या गप्पा झाल्या असतील तर सुरवात करुया का?

जय: (अखिलेशचा खांद्यावरचा हात बाजूला करत) हो हो करुया सुरवात.... असं म्हणत तो संजोतच्या बाजूला जाऊन उभा राहिला. तसा अखिलेशही अमिषाच्या बाजूला जाऊन उभा राहिला.

संजोत: तर आपण dance competition मध्ये जिंकायचं आहे हाच विचार डोक्यात ठेवून प्रॅक्टिस करणार आहोत.

सगळे: हो..

संजोत: गुड... अशीच एकजुट मला डान्स प्रॅक्टिसमध्ये ही हवी आहे.

अमिषा: पण नक्की आपण काय करायचं आहे competition मध्ये....?

संजोत: see as per my knowledge, पहिल्यांदा तुम्हां दोघा दोघांचा असा वेगळा डान्स होईल आणि जर तुम्ही सिलेक्ट झालात आपल्या कॉलेजमधून तर दुसऱ्या कॉलेजमध्ये जे पार्टीसिपंट असतील त्यांच्याशी तुमचं competition असेल. कारण हे ग्रुप competition आहे.

खुशी: पण मग आम्ही दोघा दोघांनी असा कोणता डान्स करायचा आहे.

जय: येस सांगतो, आपल्याला कॉलेजमध्ये डान्ससाठी थीम सांगितल्या आहेत. फर्स्ट आहे वेस्टर्न आणि ग्रुपमध्ये आहे ट्रॅडिशनल.

विवेक: (घाबरून) अरे बापरे, हे कधी कळलं... मला नाव नाही का कमी करता येणार... अशक्य आहे सगळं...

खुशी: (अमिषाच्या कानात) म्हणजे याला नाचता येतंच नाही असं दिसतंय...

अमिषा: (हळूच) हं, मला ही असंच वाटतंय.

संजोत: Hey Viki

विवेकने चमकून तिच्याकडे पाहिलं.

संजोत: सॉरी मी विकी बोललं तर चालेल ना?

जय: त्याला न चालायला काय झालं... बोल तू पुढे...

संजोत: (तिने जयकडे रागात बघून मग दुर्लक्ष करत विवेककडे पाहिलं) हे बघ विकी, मी आणि जय तुला आणि तुम्हा सगळ्यांना शिकवणार आहोत ना... मग तू घाबरला कशाला? माझ्यावर नको ठेवू विश्वास हवं तर... पण तू तुझ्या मित्रावर जयवर तर ठेवू शकतो ना?

विवेकने मानेनेच होकार दिला.

संजोत: सो करुया ना प्रॅक्टिस?

विवेक: हो.

संजोत: so take your position.

विवेक खुशीच्या बाजूला जाऊन उभा राहिला.

संजोत: पहिल्यांदा मी आणि जय काही स्टेप्स करुन दाखवतो मग तुम्ही चौघांनी करुन दाखवा म्हणजे आमच्या लक्षात येईल तुमची तयारी कुठुन सुरु करावी लागेल ते...

चौघे: ओके चालेल.

संजोत: ग्रेट. (जयकडे पाहून हात पुढे करुन) सुरु करायचं का?

जयने तिचा हात हातात घेतला जय आणि संजोतने चौघांना साल्साच्या काही सोप्या स्टेप्स करुन दाखवल्या.

संजोत: चला आता तुम्ही करुन दाखवा. अखिलेश, अमिषा आधी तुम्ही करा.

दोघे: ओके चालेल.

जय: टेक युअर पोझीशन.

दोघांनी जय-संजोतने दाखवलेल्या स्टेप्स न चुकता करुन दाखवल्या. शेवटच्या स्टेपला ते दोघे थोडे गोंधळले.

संजोत: येस, गुड. जमेल तुम्हाला. आता खुशी आणि विवेक तुम्ही करुन दाखवा.

दोघे: हो... म्हणत खुशीचा विवेकने स्टेप्स प्रमाणे हात धरला. पण नेमका जेव्हा खुशीचा डावा पाय मागे असताना विवेकचा उजवा पाय पुढे होत होता. खुशीने गोल फेरी घेताना तर नेमकं विवेककडून तिचा हात ओढला गेला.

संजोत: अरे देवा, सोड तिचा हात... अरे विकी, किती सिंपल आहे हे... "जेव्हा खुशीचा डावा पाय मागे जाईल तेव्हा तुझा डावा पाय पुढे यायला हवा....!" आणि हे असं गोल फेरी घेताना कोणी असा हात ओढतं का?

विवेक: सॉरी, मला खरंच काही जमत नाही आहे.

संजोत: तुला जमत नाही आहे असं नाही आहे... तुला प्रयत्नच करायचा नाही आहे... That's the truth.... एक काम कर... तुला करायचं आहे ना तुझं नाव कॅन्सल तर करुन ये.

जय: अरे विवेक, प्रयत्न केल्याशिवाय काही जमणार आहे का...? तू ट्राय तर कर... जमेल तुला...

संजोत: एक काम करुया, "तू आणि खुशी ठरवा काय ते... तोपर्यंत मी आणि जय अखिलेश-अमिषाला शिकवायला घेतो. तसंही तुमचा वेस्टर्न डान्स वेगवेगळाच बसवावा लागणार आहे....!" सो लेट्स थिंक अँड डीसाईड.. आत एक अजून एक प्रॅक्टिस साठी रुम आहे, तुम्ही तिकडे हवं तर थांबू शकता.

संजोतने त्या दोघांना हाताने आतल्या रुममध्ये जायचा इशारा केला. खुशीने विवेककडे पाहिलं आणि दोघेही आतल्या प्रॅक्टिस रुममध्ये गेले. ते दोघे गेल्यावर संजोत-जयने अखिलेश-अमिषाला शिकवायला घेतलं.

***

विवेक आतल्या रुममध्ये जाऊन खालीच बसला. 

खुशी: (त्याच्या बाजूला बसत) काय झालं आहे विवेक? कशामुळे तू एवढा डिस्टर्ब आहेस?

विवेक: खुशी कसं सांगू तुला, " अग, मला बिलकुल नाचता येत नाही..."

खुशी: (जोरजोरात हसून) अरे, नाचता येत नाही असं सतत म्हणत राहिलास तर येणारच नाही. तुला थोडे तरी प्रयत्न केले पाहिजे ना... तुझ्या मनाने ही गोष्ट ठरवूनच टाकली आहे की, मला डान्स जमणारच नाही म्हणून. 

विवेक: अग मग तेच खरं आहे ना...!

खुशी: नाही... आय नो तुला नाचता येत नाही पण कधी येणारच नाही असं थोडी ना आहे. आणि अशाने तू ज्यांनी कोणी तुझं नाव त्या डान्स लिस्ट मध्ये दिलं आहे त्याला जिंकू देणार.

विवेक: जिंकू देणार म्हणजे...

खुशी: अरे म्हणजे तुला जर डान्सचं करता नाही आला तर ज्याने तुझं नाव दिलं आहे त्याच्या मनासारखंचं झाल्या सारखं होतं ना!

विवेक: हं, हे तर माझ्या लक्षातचं नाही आलं. पण मग मी आता काय करु की मला नाचता येईल.

खुशी: थांब थोडा विचार करुया... (थोडा वेळ विचार केल्यावर तिला काहीतरी सुचतं) ऐक ना विवेक, मी सांगितलं तसं जर केलं तर तुला जमेल बघ...

विवेक: म्हणजे नक्की काय करु?

खुशी: उठून उभा रहा आधी. (तिचं बोलणं ऐकून विवेक उभा राहिला. )

खुशी: आता तुला इतकंच करायचं आहे मी सांगेन तसं ऐकायचं आहे आणि माझ्याकडे नीट लक्ष द्यायचं आहे.

विवेक: ओके

खुशीने विवेकला ज्या स्टेप्स संजू आणि जयने शिकवल्या होत्या त्या दाखवत त्याच्याकडून करुन घ्यायला सुरुवात केली. 

खुशी: (तिचा डावा पाय मागे घेऊन) आता बघ, मी माझा डावा पाय मागे घेतला ना... मग तू तुझा डावा पायच पुढे घ्यायचा. म्हणजे तुझं माझ्या हालचालींवर लक्ष हवं. असं म्हटल्यावर विवेकने त्याचा डाव पाय पुढे घेतला.

विवेक: बरोबर केलं ना मी?

खुशी: हो... आता मी मागे होऊन राउंड मारेन तेव्हा मला राऊंड मारताना मदत कर ही अशी... असं म्हणत तिने त्याला राउंड मारायला लावला आणि दोघे पुन्हा मूळ स्थितीत आले. आलं ना लक्षात?

विवेक: हो आलं.

खुशी: ठीक आहे तर मग आता मी राउंड मारते... असं म्हणत त्या दोघांनी त्यांना शिकवलेल्या स्टेप्स न चुकता 3-4 वेळा केल्या.

विवेक: (बऱ्याच वेळानंतर) आता बस झाली ना प्रॅक्टिस?

खुशी: हो मी पण थकले.... तेवढ्यात त्या दोघांना टाळ्यांचा आवाज आला. दोघांनी दाराकडे पाहिलं तर संजू-जय, अखिलेश-अमिषा चौघेही टाळ्या वाजवत होते.

संजू: (त्यांच्याजवळ येऊन) मस्तच... खूप छान स्टेप्स कव्हर केल्या.

तिघे: हो हो.

विवेक: (खुशीकडे पाहून) हे सगळं खुशीमुळे शक्य झालं. तिने मला समजावलं की मी प्रयत्न केला तर नक्की डान्स करु शकतो.

संजू: मग तर मला खुशीला शाबासकी द्यावी लागेल.

खुशी: (हसून) मी फार काही वेगळं नाही केलं. तुम्ही जे सांगितलं तेच मी सांगितलं.

संजू: अग तू मला तुम्ही न बोलता तू बोलू शकते. संजू बोललीस तर जास्त आवडेल. आणि हे बोलणं तुम्हां तिघांना पण लागू आहे. 

सगळे: ओके संजू.

खुशी: मग आता आमची पुढची प्रॅक्टिस कधी करुया? 

संजू: (घड्याळात बघून) तुझं घड्याळाकडे लक्ष नाही का गेलं. बघ किती वाजले...! आता बाकीची प्रॅक्टिस उद्या. 

खुशी: (घड्याळात पाहून) अरे देवा, साडेसात वाजले...!

संजू: येस... चला आता निघुया. उद्या फर्स्ट प्रॅक्टिस तुमची.

विवेक-खुशी: चालेल

जय: वाह... चालेल पण दोघांनी मिळून म्हटलं म्हणजे विकीला आता नक्की जमेल साल्सा...!!

संजू: वेट अ मिनिट... हे दोघे साल्सा नाही करणार आता....

विवेक: पण मला जमतंय आता...

संजू: आता साल्सा फक्त अखिलेश- अमिषा करतील.

खुशी: मग आम्ही काय परफॉर्म करायचं वेस्टर्न डान्स मध्ये?

संजू: (गालातल्या गालात हसून) उद्या कळेलच तुम्हाला...

विवेक घाबरुन जय- संजूकडे पाहू लागला. आता तर खुशीच्या चेहऱ्यावर पण प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं.

संजू: अरे घाबरलात की काय?

विवेक: ते.... (त्याचे प्रश्न घशातून बाहेर पडेनासे झाले)

जय: (त्याच्या खांद्यावर हात ठेवून) अरे डोन्ट वरी, हे जमलं ना तुला... मग ते पण जमेल की...

खुशी: पण मग नक्की कोणता डान्स?

संजू: खुशी उद्या भेटतो आहोत ना आपण... तेव्हा समजेल. चला आता निघू... 7.45 होत आले.

अखिलेश: हो मला अमिषाला पण सोडावं लागेल.

जय: चला तर मग... म्हणत सगळेजण त्या प्रॅक्टिसरुममधून बाहेर पडले. संजूने रुमच्या दरवाजाला कुलूप लावलं.

अखिलेश-अमिषा: ओके बाय बाय उद्या भेटू.

जय: हो बाय बाय.

संजू: खुशी तू कशी जाणार आहेस आता?

जय: (खुशी काही बोलणार इतक्यात) विकी तू सोडशील का तिला...?

विवेक: हो चालेल.

जय- संजू: ओके बाय, उद्या भेटू मग... म्हणत संजू जय बरोबर निघून गेली.

विवेक: चल आपण पण निघूया.

खुशी: हो. दोघेही तिथून चालत मुख्य रस्त्यावर आले.

विवेक: थँक यू खुशी.

खुशी: कशासाठी?

विवेक: ते मघाशी तू समजावलं आणि कसा डान्स करायचा ते ही दाखवलं म्हणून. त्याचं बोलणं ऐकून खुशी हसली.

विवेक: तू कुठे राहतेस? म्हणजे तुला सोडेन तिथपर्यंत.

खुशी: अरे तू मला आपल्या कॉलेजच्या जवळच एक अपार्टमेंट आहे तिथे सोड.

विवेक: तू तिकडे राहते का?

खुशी: नाही रे, माझी बहीण भेटेल तिथे. मग आम्ही एकत्र जाऊ.

विवेक: ओके चालेल. तुम्ही घरी पोहचलात की मेसेज करशील का मग?

खुशी: (हसून) का बरं?

विवेक: नाही ते आपण उशीरा घरी जातो आहोत ना आणि तू कुठे राहते हे ही मला माहित नाही म्हणून..

खुशी: (हसणं लपवत) बरं बाबा... करते मी मेसेज... पण तुझा नंबर लागेल ना मला?

विवेक: अरे हो... असं म्हणत त्याने तिला नंबर सांगितला आणि खुशीने ही त्याला नंबर दिला.

खुशी: निघूया मग आता.

विवेक: हो... म्हणत विवेकने खुशीला तिच्या सांगितलेल्या अपार्टमेंटपाशी सोडलं आणि तिला बाय बोलून तो त्याच्या घरी जायला निघाला.

क्रमशः

(गेले काही महिने तब्येतीच्या कुरबुरीमुळे आणि डिप्रेशनमुळे मला ठरवून ही पुढचे भाग लिहायला जमले नाही. त्यासाठी मी तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागत आहे. हा भाग जर तुम्हाला आवडला असेल किंवा काही सुचवायचं असेल तर तुमच्या प्रतिक्रिया मला जाणून घ्यायला नक्की आवडेल)

🎭 Series Post

View all