उपवासाचे डोसे
आता नवरात्र आहे, त्यामुळे रोज रोज फराळाचे काय बरं करावे असा प्रश्न निर्माण होतो. सारखं सारख तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर हे उपवासाचे डोसे नक्की करून पहा. खायलाही खूप मस्त लागतात आणि पोट पण भरते. चला तर मग वळूया रेसिपी कडे,
साहित्य : एक वाटी साबुदाणा, दोन वाटी भगर, दोन चार बटाटे वाफवलेले, चार ते पाच हिरव्या मिरचीचे बारीक काप किंवा मग जिरे घालून दळून घेणे. शेंगदाणा कूट दोन चमचे, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार आणि भाजण्यासाठी तेल.
कृती: प्रथम साबुदाणा आणि भगर सकाळीच वेगवेगळे भिजवून ठेवणे. संध्याकाळी मिक्सरमध्ये दोन्ही दळून घ्यायचे, आपण जसे इडलीचे पीठ दळतो अगदी तसेच बारीक दळायचे. आता त्यात वाफवलेले बटाटे अगदी बारीक कुस्करून त्यात घालायचे. मीठ, कोथिंबीर, शेंगदाणा कूट, कुटलेली हिरवी मिरची हे सगळे साहित्य त्यात घालून चांगले एकत्र करून घ्यायचे.
जास्त घट्ट वाटत असेल तर त्यात पाणी घालून पातळ करायचे. आपण जसं डोश्याच पीठ करतो अगदी तितकंच पातळ करून घ्यायच. आता ह्या तयार पिठाचे तव्यावर तेल घालून डोसे करून घ्यायचे, मस्त खरपूस भाजून घ्यायचे दोन्ही बाजूने.
आपले हे तयार डोसे नारळाची चटणी किंवा शेंगदाणा चटणी किंवा दह्याबरोबर खूप छान लागतात. सोबत उपवासाची जिरे घालून केलेली बटाटा भाजी असेल तर ती पण मस्त लागते.
कशी वाटली रेसिपी, आवडली असल्यास लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.
किचन तुमचे आणि रेसिपी माझी.
खात रहा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला वाचत रहा.
धन्यवाद
सौं तृप्ती कोष्टी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा