सुनेचा उपकार नसतो
भाग 1
भाग 1
इथे सगळ्या सुनांचे प्रतिनिधित्व करणारी निशा
आणि तिची सासू...सासू असते तशी ही ती सासू
नवरा पेचात सापडलेला..तरी बायकोची साथ निभावणारा..
कथा लेक सून ह्या पैकी आपली कोण...
सून लोकाची लेक
मुलगी आपली लेक
सून लोकाची लेक
मुलगी आपली लेक
बघू आपली लेक की लोकाची लेक...
सुनेची गरज पडतेच ,तिची मदत घेतल्याशिवाय घरातील एक ही काम आणि मोठे कार्य पूर्ण होत नाही...
" आणि तरी सुनेची उपकार मानले जात नाही बरंका योगिनी.."
निशा काम करत करत मैत्रिणी सोबत बोलत होती...तिला जे आत्ता पर्यंत जे समजले त्यातून ती म्हणत होती, "सुनेने करावेच लागते हक्काने, तिचे कर्तव्यच ते...पण जर तिचे कर्तव्य नसून ती कामाला हातभार लावत असेल तर तिने काही उपकार केले असे म्हणत नाही...सरळ तोंडावर कोणी चप्पल फेकून मारावी तसे लागतात ते शब्द" उगाच मी एकत्र राहण्याचा हट्ट केला..
"काय आता घनघोर पछतावा होतोय का तुला तुझ्या निर्णयाचा ...? " योगिनी
"मलाच हौस एकत्र कुटुंबाची मोठी मग घेते भोग भोगून..." निशा
जरा कधी निवांत असेल तर ती आधी योगिणीला फोन करत ,ती सांत्वन करत ..
मैत्रीण म्हणजे दुखण्यावरचे मलम होती जणू..
म्हणून निशा आई वडिलांना जे सांगू शकत नव्हती ते मैत्रिणीला सांगत...
म्हणून निशा आई वडिलांना जे सांगू शकत नव्हती ते मैत्रिणीला सांगत...
"नवऱ्याला गुंढाळ आणि म्हण आता वेगळे राहू, निदान काही वर्षे तरी ...!! " योगिनी मुद्दाम तिला बरं वाटावं म्हणून म्हणाली..तिला ही माहीत होते निशा घर तोडणार नाही..
"तुला माहीत आहे चांगलेच, मी हे करू शकत नाही योगे...तरी मन ठेवण्यासाठी हे बोलतेस का तू ?"
"जमले तर जमले ,होशील तणाव मुक्त तू त्यातून..मग नो सासू नो कटकट...मग तुम्ही दोघे राजा राणी....मस्त गुलगुल करत संसार करा..."
योगिनी ही सासू सासरे यांच्या पासून आत्ता दूर रहात होती ,पण जे भरले पण घराला हवे होते ते वाटत नव्हते... पण आपण आपल्या मर्जीने राहू शकतो ,लांबून नाते टिकवू शकतो आता कटकट नाही होत...हे लक्षात येत होते. तिचे निशाला ही तेच सांगणे होते... जितकी जबाबदारी घेशील ,मन धरणी करशील तितका त्रास तुलाच...त्यात तू करतेस त्याची जाणीव ही नाही होणार..पण लांब जाताच ती किंमत कळते..
------सासू म्हणजे नुसती टेन्शन देणारी व्यक्ती ,सूचना आणि ताकीद हेच ते काय त्यांना द्यायला जमायचे..
"माझे काचेचे भांडे आहे जपून उचल...ते नवीन कप काढू नकोस...चमचे वाकवू नकोस, धूळ जमली आहे तिकडे ती झटकून टाकू नकोस हाताने पुसून घे...पडदे बदलू नकोस ,महिनाच झाला आहे लावलेले..!! "
"मग म्हणा तू काहीच करू नकोस ,आराम कर..पांघरून घेऊन झोप.." ती तणतणत म्हणत नवऱ्या ला तक्रार करत होती.
घरात शांती नांदावी पण शांत फक्त सुनेने रहावे.. नमते फक्त तिने घ्यावे... काही बदल परस्पर तिने घडवून आणू नये...घरात असलेल्या सासूबाईला विचारात घेऊन करावे...सासूला पटले तर हो म्हणणे नाहीतर ती म्हणेन तसे करावे...
निशा जबरदस्त बदलत होती ,आता सासूचे नियम अवजड होत चालले होते, नवस करायचे आणि फेडण्यासाठी इतरांनी राबायचे हा मोठा नियम तिला आता आवडत नव्हता...तिला असहकार पुकारावा वाटत होता..
तुमच्या घरी ही असतील असे काही न पटणारे नियम पण फक्त सासूबाई मुळे पाळावे लागतात तेव्हा मन मारून पाळतात का तुम्ही..? की तुम्ही काही बदल घडवला आहे...
©®अनुराधा आंधळे पालवे
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा