Login

सुनेचा उपकार नसतो भाग 2

Upkar
भाग 2
सुनेचा उपकार नसतो


सुनेची एकच इच्छा सून धावून मदतीला येते, तर तिचे उपकार नसतात...उलट ती परकी कशी आणि आपली ती आपली कशी ह्याची चढाओढ लागली होती..

ती म्हणाली ,"सगळे ह्यांच्या मनावर असते, काम तर करून घ्यायचे सगळे...पण तिने केले ,ती करते ,तिला छान जमते..ती हुशार आहे हे कबूल करायचे नसते... मी मेली करत रहाते आणि एक गोड द्वाड शब्द ही महाग का इतक्या कामाच्या बदल्यात..." ती त्रागा करत म्हणाली आणि नवऱ्या कडे उशी फेकून मारली

तो ही वैतागून, "तुला जमतंय तितकेच कर, वाद घालू नकोस..."

सगळ्यांनी जणू ठरवून घेतले ,तिला ऐकवायचे पण तिचे काहीच ऐकून नाही घ्यायचे..

आता तर तिला बोलायला मन मोकळे करायला फक्त घरातील निर्जीव वस्तू होत्या असे वाटू लागले होते..

तितक्यात पुन्हा योगिणीला फोन येतो,"वैतागून काही होत नसते ,अश्याने ठार वेडी होशील.."

"मग काय करू ,सरळ उलट उत्तर दे..मग कोणी नादाला लागणार नाही.."

"नकोच त्यापेक्षा तू आहेस तुला बोलून खळखळ मोकळी करत राहीन.." निशा


स्वतःला जेव्हा स्वयंपाक येत नव्हता तेव्हा सासूने कधी ही हात लावू दिला नव्हता... त्या म्हणायच्या आम्ही कधी कच्चे अन्न पचवले नाही हो...तू राहू दे...मी करेन स्वयंपाक... तुमच्या घरात मुलींना स्वयंपाक करायचा नाही शिकवला..म्हणत असतील सासू शिकवेल त्यांना हवा तसा...मग मी तेच करू का..? उभी राहत जा माझ्या बाजूला आणि शिक ,स्वतःहून प्रश्न विचार...जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तू तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा स्वयंपाक करत जा...ट्रायल त्याच्या वर कर, तो सहज पचवू शकतो..

आज तीन वर्षे झाली आहेत ,आणि निशा छान तरबेज झाली आहे ,पण तिला स्वयंपाक करायला आवडत नाही...ती तरी ही थोड्या फार रेसिपी करते...जास्त खोलात घुसायचे नाही नाहीतर तुलाच भोगावे लागेल...हा सल्ला योगिनी ने दिला होता.. तसेच करत निशा ही..

आज पूजेसाठी नैवेद्य तयार करत होती ,थोडा फार हातभार कामवाली सखू लावत होती..तसे करून कामाला उरक येत , छोटे मोठे काम नवरा करत..."बॉस थकनेका नही रे...हम है ना.."

"झोप येते नुसती डोळ्यावर.." ती

"झोप म्हणू शकत तर नाही पण चहा घेऊ हाप हाप...फ्रेश होशील..."

"ती येऊ नकोस बाबा ,पाप लागेल तुला.." ती


"पाप लागू दे, देवी कोपू दे...पण देवीला ही वाटत असेल आपल्याला ही देवाने अशीच मदत करायला हवी होती, शेवटी स्त्री सुलभ असेल काही नियम तर कोणाला नको असतात..आईला ही आवडायचे बाबांनी मदत केलेले कधी कधी.." तो

निशा आता तर सासूबाईंच्या दुटप्पी वागण्याचे नवल करत होती, "माझ्या नवऱ्याला नियम वेगळे आणि त्यांच्या नवऱ्याला नियम वेगळे का ?" ती

झाले होते काम पूर्ण तशी ती त्याला म्हणाली बायका येणार आहेत ,घरात तुला जागा नाही..त्यांना तुला बघितल्यावर कसनुसे होईल बाबा...आई पण कोपतील..जा तू बाहेर..

"नाही ग ती वाईट इतकी ही, जरा वेगळा स्वभाव आहे तिचा समजून घेऊ आपणच..वय होत आले की तिची बुद्धी तापट होत जाते..."

"माझ्या आजीचे वय 80 होते तरी तिची बुद्धी शाबूत होती ,कटकट कधी केलीच नाही.." ती

"माझी आई वेगळी आहे म्हंटले ना मी..तर आता विषय थांबव..माझी खात्री आहे ती बदलेल..पण तुमच्या दोघीत माझी कात्री करू नकोस"

"वाद होतात फक्त त्यांच्या मुळेच ,त्यावर इलाज शोध... नाहीतर आपण घर सोडूया .." ती

वाद वाढत होते आज त्यांच्या मध्ये...सासूबाई बाहेरून हळूच ऐकत होत्या..त्यांना मनोमन बरं वाटत होते...

ती ,"मी थकून भागून आले होते तुझ्या कडे..वाटले तू म्हणशील थकली आहे बस जरा फॅन खाली..मग कर काम..."

"मग काय तुला गोंजारत बसू का..." तो

तिला नाही पटले बोलणे त्याचे ,नेहमी आई वेगळी आहे वेगळी आहे म्हणत तिला सोयीस्कर रित्या safe करत राहणे आता निशाला आवडत नव्हते..

"ठामपणे तेव्हाच म्हणाली असतीस तर गेलो असतो वेगळे रहायला, तूच म्हणाली आई बाबाची सावली असू दे...किती मोठ्या गप्पा त्या तुझ्या त्यावर मी भाळलो...आणि थांबू म्हंटलो.."

सगळे दोष तिच्यावर येतांना दिसत होते ,तर तिने आता पळ काढणे योग्य समजून ती बाहेर पडली

"मदत नकोय मला तुझी मदत ,बस तसाच डाफरत..."

"निशा तुला तर प्रसंग काय ,बोलायचे काय कळत नाही...भांडण उद्या ही होऊ शकले असते ना.."

पुन्हा ती हक्काच्या स्वयंपाक घरात उभी होती...तिने सगळे जिथल्या तिथे ठेवून बाहेर बघत उभी राहिली...

तो आला मागून तिला खांद्यावर त्याने तोंड पुसलेला नॅपकीन ठेवत म्हणाला.."मी उरलेले काम उरकतो..."

तिने सगळीकडे नजर फिरून पाहायला इशाऱ्याने सांगितले, तसे त्याने पाहिले

इशाऱ्याने विचारले ,दिसते का कुठे शिल्लक काम तुला इथे...

त्याने तिची बट मागे सारत इशाऱ्याने दाखवले ,हे आहे ना शिल्लक काम...मग जुडा सोडत म्हणाला हे आहे ना शिल्लक काम....मग खोचलेला पदर काढून म्हणाला, "किती काम करतेस...तरी तक्रार नाही..."

तिने लगेच पळ काढला आणि हाताच्या नखांना लागलेली कणिक नीट धूवून काढली..आणि हसत त्याच्या कडे बघितले आणि त्याच्या अंगावर पाणी उडवले..