विनय काॅलेजपेक्षा मित्रांच्या टोळीत जास्त राहायचा. वाईट वळणालाही लागला. ही गोष्ट घरातील लोकांच्या लक्षात येताच त्यावर काहीतरी निर्णय घेण्याचे त्यांनी ठरवले. तेव्हा ताईने विनयला आपल्या दुकानात काम करण्यास पुण्याला बोलावून घेतले.
ताईच्या मिस्टरांचे स्टेशनरी व झेरॉक्सचे दुकान होते.
ताईच्या दुकानात विनय मन लावून काम करू लागला. आयुष्य चांगल्या वळणावर येऊ लागले.
विनयच्या हुशारीमुळे, मेहनतीमुळे दुकान छान चालत होते. ताईलाही फायदा होऊ लागला.
त्यांनी अजून एका ठिकाणी मोठे दुकान सुरू केले.
विनयच्या हुशारीमुळे, मेहनतीमुळे दुकान छान चालत होते. ताईलाही फायदा होऊ लागला.
त्यांनी अजून एका ठिकाणी मोठे दुकान सुरू केले.
काही वर्षांनी, जेव्हा विनयचे लग्न करायचे ठरवले, तेव्हा एका दुकानाचा मालक विनयला दाखवले.
जाऊबाईंकडून हे सर्व कळाल्यावर, मला वाटले की,
'माझ्या माहेरच्यांना या गोष्टी लग्न जमवताना कोणी का सांगितल्या नाही? आणि त्यांनीही जास्त चौकशी का केली नाही?'
'माझ्या माहेरच्यांना या गोष्टी लग्न जमवताना कोणी का सांगितल्या नाही? आणि त्यांनीही जास्त चौकशी का केली नाही?'
विनयचा भूतकाळ चांगला नव्हता. पण वर्तमानात त्याचे सर्व व्यवस्थित सुरू होते.
'आपल्या जीवनाला चांगला मार्ग दाखवण्याचे काम ताईने केले व त्यामुळेच आज आपण चांगले जीवन जगतो आहे. ताईचे आपल्यावर खूप उपकार आहेत. ते मी कधीही विसरणार नाही. तिला काही त्रास होईल असे वागणार नाही. तिच्या उपकाराची जाणीव ठेवून, वागत राहणार.'
असे विनयने ठरवले होते व त्याप्रमाणेच तो वागत होता आणि मी पण त्याच्या म्हणण्यानुसार वागावे. असे त्याला वाटायचे.
आपला भाऊ विनय आपल्याला खूप मानतो. त्याला मी मदत केली म्हणून त्याचे चांगले झाले. त्याला उपकाराची जाणीव आहे. हे पाहून ताईंना आनंद वाटायचा आणि विनयची बायको म्हणून मी पण तसेच वागावे. अशी त्यांची इच्छा होती.
नणंद म्हणून त्या जशा माझ्याशी वागत होत्या. ते तर मला पटतच नव्हते. पण विनयची बहिण म्हणून त्यांनी त्याच्यासाठी जे केले त्यासाठी त्यांच्याबद्दल नेहमीच आदर वाटला. त्यांनी केलेल्या मदतीची, उपकाराची जाणीव आयुष्यभर मनात राहील. ही भावना त्यांच्याबद्दल होती.
आपण एखाद्या व्यक्तीला मदत केली आणि त्या व्यक्तीला त्या गोष्टीची सारखी सारखी जाणीव करून दिली...तर त्या मदतीला काही अर्थ असतो का? मदत घेणाऱ्यालाही वाटत असते.. कुठून यांच्याकडून मदत घेतली आणि आपल्याला हे कायम ऐकावे लागते आहे. त्यापेक्षा नसती मदत घेतली तर चालले असते. उपकाराच्या ओझ्याखाली असे नेहमी ऐकावे लागले नसते..
जगात सर्व सारख्याच प्रकाराची लोक असतात,असे नाही.
काही खरंच खूप कृतघ्नही असतात, जे आपल्याला ज्यांनी मदत केली आहे ..त्या लोकांनाही विसरतात व त्यांनी केलेली मदतही विसरतात.
पण असेही कृतज्ञ लोक असतात, जे आपल्याला मदत करणार्या लोकांना लक्षात ठेवतात,त्यांनी केलेल्या मदतीची जाणीव ठेवतात व शक्य झाले तर त्या लोकांना कधी मदत करण्याची वेळ आली तर मदतही करतात.
क्रमश:
नलिनी बहाळकर
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा