उसासा असा का‌‌ - गझल

Always Think Both Side Of Coin...you got answer.
भुजंगप्रयात वृत्त
लगावली :- लगागा ×४

उसासा असा का गळ्याशी अडावा
अभागी मनाचा भरोसा उडावा

तुझे वागणे ते दिसावे जगाला
तया कारणे मग तमाशा घडावा

किती भोगले या जिवाला कळेना
सुखाच्या धनाला घसारा पडावा

हताशा उराची विरावी उरातच
शहाण्या कुडीचा मुलामा झडावा

अगा माउली ती दिसावी अखेरी
असा जीव अंती तुझ्यावर जडावा

©® संजय स गुरव (सदासन)
कोल्हापुर