#उशीर
" आदित्य कसा आहेस? "
फोनवर विनायकराव आपल्या मुलाला विचारत होते.
फोनवर विनायकराव आपल्या मुलाला विचारत होते.
" मी ठीक आहे बाबा.तुम्ही तुमची आणि आईची काळजी घ्या.आत्ता बोलायला वेळ नाही, मी तुम्हाला रात्री कॉल करतो."
"अरे थांब आईला तुझ्याशी बोलायचे आहे."
बाबा असे म्हणेपर्यंत आदित्यने कॉल कट केला होता.
हताश होऊन विनायकराव मालती ताई जवळ येऊन बसले.
बाबा असे म्हणेपर्यंत आदित्यने कॉल कट केला होता.
हताश होऊन विनायकराव मालती ताई जवळ येऊन बसले.
"काय म्हणाला आदित्य?कधी येतोय?"
मालती ताईंनी कापऱ्या आवाजात विचारलं.
मालती ताईंनी कापऱ्या आवाजात विचारलं.
आपल्या डोळ्यातले अश्रू लपवत
"अगं आता त्याला खूप घाई होती रात्री बोलू निवांत."
विनायक राव मालती ताईंना म्हणाले.
"अगं आता त्याला खूप घाई होती रात्री बोलू निवांत."
विनायक राव मालती ताईंना म्हणाले.
हे ऐकून मालती ताई हळू आवाजात म्हणाल्या,
" कदाचित देवाच्याच मनात नाही माझी आणि त्याची शेवटची भेट व्हावी."
" कदाचित देवाच्याच मनात नाही माझी आणि त्याची शेवटची भेट व्हावी."
यावर विनायकराव चिडून म्हणाले,
" काहीतरीच काय बोलते,रात्री बोलतो त्याच्याशी आणि उद्या लगेच त्याला यायला सांगतो. तू झोप बघू आता."
विनायक रावांनी मालती ताईंना समजावले.
रात्री उशिरा पर्यंत विनायक रावांनी आदित्यच्या फोनची वाट पाहिली पण त्याचा फोन आला नाही. शेवटी कंटाळून त्यांनीच त्याला फोन लावला. रिंग वाजत होती पण आदित्यने फोन उचलला नाही.
त्या रात्री आदित्यचा फोन आलाच नाही. सकाळी लवकरच विनायकरावांनी पुन्हा एकदा आदित्यला फोन लावला.

फोनच्या पलीकडून आदित्यचा आवाज आला, "बोला बाबा, काय झालं?"
विनायकराव शांतपणे म्हणाले, "आदित्य, तुझ्या आईची तब्येत खूप खराब आहे. ती तुला एकदा बघण्यासाठी तळमळतेय. लगेच निघून ये."
आदित्यचा आवाज थोडा गंभीर झाला, "बाबा, माझी इथं खूप महत्त्वाची मीटिंग आहे. मी मीटिंग संपल्यावर लगेच निघतो. संध्याकाळपर्यंत पोहोचेल."
हे ऐकून विनायकरावांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. "ठीक आहे बाळा, पण लवकर ये." ते एवढेच म्हणाले.
पण दुर्दैवाने, आदित्य संध्याकाळपर्यंत पोहोचला नाही. तो रात्री उशिरा घरी आला, तेव्हा त्याला त्याच्या घराबाहेर बऱ्याच लोकांची गर्दी दिसली.त्यामध्ये काही नातेवाईक होते तर काही विनायकरावांचे मित्रमंडळी. एवढी लोकांची गर्दी असूनही एक प्रकारची भयाण शांतता आदित्यला जाणवली.घरात त्याला काहीतरी वाईट घडले आहे याची जाणीव झाली. कोणाशीही न बोलता तो धावतच आत गेला.
मालतीताईंचा निष्प्राण देह अंथरूणावर पडलेला होता.विनायकराव त्यांच्या शेजारी बसून एकटक मालती ताईंच्या देहाकडे बघत होते.
मालतीताईंचा निष्प्राण देह अंथरूणावर पडलेला होता.विनायकराव त्यांच्या शेजारी बसून एकटक मालती ताईंच्या देहाकडे बघत होते.
आदित्यने मोठ्याने आई म्हणत त्यांच्या निष्प्राण देहाला मिठी मारली पण त्याला मिठीत घ्यायला आता आई या जगात नव्हती.
त्यांचे डोळे त्यांच्या मुलाला पाहण्यासाठी तळमळत होते पण शेवटी त्याला न पहाताच ते मिटले होते.
त्यांचे डोळे त्यांच्या मुलाला पाहण्यासाठी तळमळत होते पण शेवटी त्याला न पहाताच ते मिटले होते.
आदित्यला आपल्या चुकांची जाणीव झाली. वेळेचे कारणे आणि कामाच्या धावपळीत त्याने आपल्या सर्वात प्रिय व्यक्तीला गमावले होते.
आज त्याला समजले, की आयुष्यात काही गोष्टी वेळेवर कराव्या लागतात, नाहीतर त्या कायमच्या हातातून निसटून जातात. आई-वडिलांच्या प्रेमापेक्षा मोठी दुसरी कोणतीही गोष्ट नाही पण आता खूप उशीर झाला होता.
आज त्याला समजले, की आयुष्यात काही गोष्टी वेळेवर कराव्या लागतात, नाहीतर त्या कायमच्या हातातून निसटून जातात. आई-वडिलांच्या प्रेमापेक्षा मोठी दुसरी कोणतीही गोष्ट नाही पण आता खूप उशीर झाला होता.
त्याने उठून विनायक रावांना गच्च मिठी मारली. विनायक रावांनी काही न बोलता हळुवारपणे त्याच्या पाठीवर हात फिरवला. आदित्यच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या मात्र विनायकरावांच्या डोळ्यातील अश्रू कायमचे आटले होते.
समाप्त.
सुजाता इथापे
समाप्त.
सुजाता इथापे
जीवनात काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. काही वेळा आपल्याला वेळेवर निर्णय घेणे गरजेचे असते. कधी कधी आपण काही गोष्टी दुर्लक्षित करतो, पण नंतर आपल्याला त्याचा खूप पश्चात्ताप होतो. एकदा गेलेली व्यक्ती परत भेटत नाही म्हणून आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी वेळ काढला पाहिजे.
हीच गोष्ट या कथेतून सांगण्याचा एक प्रयत्न....
हीच गोष्ट या कथेतून सांगण्याचा एक प्रयत्न....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा