तो तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला.
"मावशी, जरा चहा करता का प्लिज...!
म्हणजे तशी आता काही चहाची वेळ नाही, पण आज मी जरा उशिरा आलो ऑफिसला आणि फार डोकं दुखतय, म्हणून थोडा हवा होता."
"मावशी, जरा चहा करता का प्लिज...!
म्हणजे तशी आता काही चहाची वेळ नाही, पण आज मी जरा उशिरा आलो ऑफिसला आणि फार डोकं दुखतय, म्हणून थोडा हवा होता."
मावशीने त्याच्याकडे अजिबात बघितले नाही,
मात्र डोक्यावरची ओढणी सरकवत ती बोलली,
मात्र डोक्यावरची ओढणी सरकवत ती बोलली,
"बसा सर तुम्ही, मी आणते करून चहा."
राजला तिचा आवाज ओळखीचा वाटला...
तो जरा विचार करत तिथेच थांबला.
तेवढ्यात मावशी परत बोलली,
तो जरा विचार करत तिथेच थांबला.
तेवढ्यात मावशी परत बोलली,
"अहो , साहेब... मी देते करून चहा जा तुम्ही."
"हो..हो...अहो मावशी...."
"सर...? अजून काही हवंय का...?"
"नाही, नाही...काही नको...द्या तुम्ही चहा...."
राज त्याच्या जागेवर गेला आणि बाजूला खुर्चीवर बसलेल्या शिवाला विचारले,
"अरे ही मावशी नवीन आहे का?"
"हो...रे...! शांता मावशी दोन दिवसां करीता सुट्टीवर गेली आहे. तिनेच पाठवलं हिला, सकाळी आली तेव्हापासून ती ओढणी काही डोक्यावरची सरकू दिली नाही तिने."
"अरे, मला ना तिचा आवाज जरा ओळखीचा वाटला."
"काय तू पण...? तुझ्या ना डोक्यावर परिणाम झाला आहे, तिला शोधून शोधून....."
"काहीही नको बोलू रे...!"
"मग काय तर, अमेरिकेहून आला तेव्हा पासून शोधतोय तिला...आणि ती मस्त मज्जा मारत असेल तिकडे....
अरे सोड ना तिचा नाद...."
अरे सोड ना तिचा नाद...."
"माझ्या आईवडिलांची शेवटची इच्छा होती....तिला भेट आणि आईच्या बांगड्या दे....म्हणून शोधत आहे तिला, बाकी काही नाही....."
"कुणाला बोलत आहेस राज तू हे....? तुझ्या जिवलग मित्राला? अरे, एवढा शिकलास पण अश्या छोट्याश्या कंपनीत काम करतोस...मस्त कॉर्पोरेट कंपनीत काम मिळू शकतं तुला...पण नाही...."
"शिवा तस नाही रे, आई बाबांना काळजी वाटत होती.... दोन वर्षे झाली आता त्यांना जाऊन.... तेव्हापासून मी शोधत आहे तिला....मोठ्या कंपनीत वेळ नाही मिळणार मला...!"
तेवढयात मावशी आली आणि तिने चहा ठेवला टेबलवर आणि निघून गेली.
राजने कप उचलला आणि एक घोट चहाचा घेतला....
त्यांच्या डोक्यात परत विचारचक्र चालू झाले....
राजने कप उचलला आणि एक घोट चहाचा घेतला....
त्यांच्या डोक्यात परत विचारचक्र चालू झाले....
\"ह्या चहाची चव मी आधी सुद्धा घेतली आहे....पण कुठे....?\" हे त्याच्या लक्षात येत नव्हते.
तो तिथूनच ओरडला , "मावशी....अहो मावशी...."
"काय झालं साहेब, साखर जास्त पडली का...?"
"नाही....चहा एकदम कडक झाला, पण एक सांगा या आधी तुम्ही कुठे काम करत होता..?"
हे ऐकल्यावर मावशी काहीही न बोलता किचन मध्ये गेली.
"काय राज, काहीही काय प्रश्न विचारतोस तू....अरे मावशी आहे ती, तिचं काम हेच असेल....या आधी एखाद्या ठिकाणी प्यायला असशील असा चहा..."
"नाही...नाही...ही चव फार वेगळी वाटत आहे...!" तो विचारमग्न होतं म्हणाला.
त्यावर शिवा हसतच म्हणाला,
"आज तू काही ठिकाणावर नाहीयेस...जा तू घरी....आज सुट्टी घे भावा....!"
त्यावर शिवा हसतच म्हणाला,
"आज तू काही ठिकाणावर नाहीयेस...जा तू घरी....आज सुट्टी घे भावा....!"
"नको...नको...आज काम नाही केलं..तर मागच्या ठिकाणी माझी हकालपट्टी केली तशी इथेही करतील....!"
"कळतंय ना...? मग लाग कामाला....!"
राज हसला आणि कामाला लागला.
राज हसला आणि कामाला लागला.
संध्याकाळचे सहा वाजले, तो कामावरून घरी निघाला. तो आवरत होता तेव्हा त्याच्या समोरून मावशी लगबगीने निघून गेली. राज आणि शिवा दोघे बोलत बोलत ऑफिसच्या बाहेर आले आणि आपापल्या घरी निघून गेले.
राज रात्री घरी आला..तो खूप दमून गेला म्हणून त्याने बाहेरूनच जेवण ऑर्डर केले. आराम करता करता त्याचा डोळा लागला..आणि त्याला एक स्वप्नं पडलं,
\"की, ती मावशी म्हणजे तिच आहे....जिला , तो शोधतो आहे... ती तिच....तिच्या डोक्यावरची ओढणी खाली पडते आणि राज बघतो तर काय....समोर तिच उभी....?\"
\"की, ती मावशी म्हणजे तिच आहे....जिला , तो शोधतो आहे... ती तिच....तिच्या डोक्यावरची ओढणी खाली पडते आणि राज बघतो तर काय....समोर तिच उभी....?\"
राज एकदम घाबरुन उठला.... राजने समोर बघितले तर... जेवणाचे पार्सल तसेच पडलेले दिसले.... तो उठला आणि तोंडावर पाणी मारले.... जेवण केलं आणि ऑफिसचे थोडे राहिलेले काम त्याने पूर्ण केले.
रात्री त्याला उशिरापर्यंत झोप आली नाही.
रात्री त्याला उशिरापर्यंत झोप आली नाही.
सकाळी तो उठला, घाईघाईत त्याने ब्रश वर पेस्ट लावली, तोंडात ब्रश घालून दरवाजा उघडला आणि दारावर लटकवलेल्या पिशवीतून दूध काढून घरात घेतले.
ब्रश करून चहा ठेवला, चहा पिऊन झाल्यावर आंघोळ करून तो तयार होऊन ऑफिसला निघाला.
ब्रश करून चहा ठेवला, चहा पिऊन झाल्यावर आंघोळ करून तो तयार होऊन ऑफिसला निघाला.
राज, ऑफिसला आज जरा लवकरच पोहचला.
"अरे वा ! आज तू लवकर आलास राज...?"
"अरे हो, ते.... तुझा चहा झाला का शिवा...?"
"नाही रे...का ? बाहेरून मागवयचा आहे."
"का...? मावशी कुठे गेली आज....?"चमकून त्याने विचारले.
"अरे ती काही येणार नाही...ह्या बायकांचं काय खरं असतं...दुसरीकडे मिळालं असेल काम तिला, म्हणून दिलं सोडून....!" शिवा व्यंगाने बोलला, पण राजला विचारात हरवलेले बघून तो म्हणाला,
"राज...अरे , मी तुझ्याशी बोलतोय...."
"राज...अरे , मी तुझ्याशी बोलतोय...."
"हो...हो.."
"हो..हो काय...? तू कोणत्या दुनियेत असतो काय माहीत...?"
"अरे मग....जाऊ दे, आपली शांता मावशी कधी येणार आहे..?"
"ती येईल दोन दिवसांनी."
"बरं तिचा काही नंबर आहे का ?"
"बरं तिचा काही नंबर आहे का ?"
"हो असेल ना ऑफिस मध्ये...का रे काय झालं?"
"नाही असेचं...." राज गेला आणि रजिस्टर मधून मावशीचा फोन नंबर घेतला.
राजने मावशीला फोन केला मात्र मावशीने उचलला नाही.
परत एकदा राजने मावशीला फोन केला तरीही मावशीने उचलला नाही.
"शिट...."
परत एकदा राजने मावशीला फोन केला तरीही मावशीने उचलला नाही.
"शिट...."
"राज, अरे काय झाल...?" शिवाने त्याला विचारले.
"काही नाही रे, मावशी पण ना...."
"काही नाही रे, मावशी पण ना...."
तेव्हड्यात राजचा मोबाईल वाजला. राजने क्षणाचाही विलंब न करता फोन उचलला.
"कोण आहे....? जरा धीर धरायचा ना..? एवढा जीव कशापायी चालला होता....."
"शांता मावशी मी राज ऑफिस मधून बोलतोय...."
"सॉरी सर..सॉरी सर..चुकलं माझं माफ करा मला..मला वाटलं...."
"मावशी ते सोडा हो..तुम्ही ज्या मावशीला कामाला लावलं ती आता कुठे भेटेल..?"
"का..? काय झालं..?"
"काही झालं नाही, सांगा मला थोडं काम होतं...."
"माझ्याच घरी आहे बघा"
"तुमचा पत्ता...बरं बरं मी घेतो ऑफिसमधून..."
"पण साहेब..."
तेवढ्यात त्याने फोन कट केला..पत्ता शोधला आणि सरांची परमिशन घेऊन ऑफिसच्या बाहेर पडला.
इकडे शांता मावशीला टेन्शन आलं म्हणून तिने घरी असलेल्या मावशीला फोन केला.
"अगं भवाने, तू काय केलंस गं ऑफिस मध्ये...?"
"काही नाही ताई..का..? काय झालं..?"
"मग ते आमचे सर तुझ्याबद्दल का विचारत होते?"
"आता मला कसं माहीत असणार?"
"तू पण मला काल सागितलं तू जाणार नाहीस म्हणून..आणि ते ही तुझी चौकशी करत होते...."
"बाई, मला तिथे काही लफडं नको आहे..तुला माहीत आहे माझा संसार सांभाळते या नोकरीच्या भरवशावर...सगळी चांगली माणसं आहे..वाटलं तेव्हा सुट्टी देतात मला ते..."
"नाही ताई काहीच झालं नाही.."
"बरं... ठेव फोन"
"हो ताई"
"अगं थांब...थांब...ते येणार आहेत घरी..
काही विचारलं तर बोल तू..आणि लक्षात ठेवं..माझ्या नोकरीचा प्रश्न आहे..."
काही विचारलं तर बोल तू..आणि लक्षात ठेवं..माझ्या नोकरीचा प्रश्न आहे..."
"हो...ताई"
ती विचार करायला लागली, \"त्याने मला ओळखलं असेल काय...?नाही...नाही...तो कशाला ओळखेल मला..?त्याला माहीत आहे माझं लग्न झालं आणि मी सुखी आहे माझ्या घरी....\"
तेवढ्यात दारावरची बेल वाजली, तिने दरवाजाच्या भिंगातून बघितले, तर बाहेर राज दिसला..तिला थोडी भिती वाटली..तिने दरवाजा उघडला नाही....
त्याने दरवाजा वाजवला..सोबतच बेलही वाजवली..पण कुणीच दार उघडत नाही..म्हणून त्याला वाटलं घरात कुणी नसेल..निराशेने तो बाईकवर बसला आणि बाईकची किक मारून निघून गेला.
तिने सुटकेचा श्वास घेतला.
त्याने दरवाजा वाजवला..सोबतच बेलही वाजवली..पण कुणीच दार उघडत नाही..म्हणून त्याला वाटलं घरात कुणी नसेल..निराशेने तो बाईकवर बसला आणि बाईकची किक मारून निघून गेला.
तिने सुटकेचा श्वास घेतला.
काही वेळातच परत दारावर थाप पडली. यावेळी मात्र ती खूपच घाबरली..तिला दरदरून घाम फुटला..तिने परत दारातून बघितले तर कुणीच दिसलं नाही, म्हणून तिने दरवाजा उघडून बाहेर बघितले.....
तर समोर राज होता...तिने क्षणात डोक्यावर ओढणी घेतली...तो काही बोलण्याच्या आत.
तर समोर राज होता...तिने क्षणात डोक्यावर ओढणी घेतली...तो काही बोलण्याच्या आत.
"राज सर, अहो मला ना जरा बरं नव्हतं..जरा तब्येत बिघडली आणि डॉक्टरकडे गेले..तर त्यांनी चार पाच दिवस आराम करा म्हणून सागितले..म्हणून मी नाही आले ऑफिसला...." ती चाचरतच म्हणाली.
"घरात येऊ का मी?"
"घरात येऊ का मी?"
"हो या ना...मी विसरले आत बोलवायला तुम्हाला..बसा,
मी चहा करू का तुमच्यासाठी..की कॉफी...?"
मी चहा करू का तुमच्यासाठी..की कॉफी...?"
तिची तारांबळ बघून राजला पूर्णपणे खात्री पटली की, ती त्याच्याशी खोटं बोलत होती.
"नको चहा..कॉफी, घेवून आलोय..जरा डॉक्टरांची चिठ्ठी दाखवता का मला म्हणजे मला नेमकं कळेल तुम्हाला काय झालं आहे ते...."
"हो...हो..देते..."
तिने चिठ्ठी शोधण्याचं नाटक केलं. सगळीकडे शोधत बसली..आणि राज मात्र तिच्याकडे एकटक बघत बसला.
"सर, अहो लक्षात नाही, कुठे ठेवली काय माहीत...?"
"अरे वा..! काल संध्याकाळी आणलेली औषधांची चिठ्ठी तुम्हाला सापडत नाही..मी तुम्हाला माझे नाव सांगितले नाही... मग ते कसे लक्षात ठेवले तुम्ही एवढ्या वर्षा नंतरही....?"
तिने ओढणी अजून चेहऱ्यावर सरकवली आणि म्हणाली....
"नाही...नाही...मला तुमचे नाव कुठे माहीत आहे...म्हणजे कसं माहीत असणार ना....?"
"नाही...नाही...मला तुमचे नाव कुठे माहीत आहे...म्हणजे कसं माहीत असणार ना....?"
राज तडकन उठला आणि तिच्या समोर जावून उभा राहिला. तशी ती जरा मागे सरकली आणि तोंडावरचा घाम ओढणीने पुसू लागली.
"आता जा तुम्ही सर आणि ताई आली की या परत...."
"आता जा तुम्ही सर आणि ताई आली की या परत...."
"पण मला तुझ्याशी काम आहे...आणि तू पण हे काय लावलस सर..सर....."
तिची अजूनच मान खाली गेली. तो तिच्याजवळ आला...त्याने तिची ओढणी तिला कळायच्या आत खाली सरकवली....आणि बघतो तर काय...... तिच्या नाजूक चेहऱ्यावर एका बाजूला जळल्याचे निशान दिसत होते..फार भयंकर होते ते निशान...
तो घाबरुन दोन पावले मागे सरकला...पण लगेच तिच्या जवळ येत ओरडून म्हणाला....." हे कधी झालं....कसं काय...?
अगं आता तरी सांगशिल की नाही...? काय झालं....?"
तो घाबरुन दोन पावले मागे सरकला...पण लगेच तिच्या जवळ येत ओरडून म्हणाला....." हे कधी झालं....कसं काय...?
अगं आता तरी सांगशिल की नाही...? काय झालं....?"
तीने एक नजर वर करुन त्याच्या कडे बघितले...तिच्या डोळ्यांत अश्रूच अश्रू गोळा झाले...तिच्या डोळ्यातं असंख्य वेदना सामावल्या होत्या....तिच्या डोळ्यांत खूप भीती दाटलेली होती....
आणि त्याच्याही डोळ्यांत तिला....खूप सारे प्रश्न दिसलेत.....
आणि त्याच्याही डोळ्यांत तिला....खूप सारे प्रश्न दिसलेत.....
असेल का ती हीच...जिला राज शोधत होता...की दुसरी कुणी असेल.....?
क्रमशः...
क्रमशः...
©®कल्पना सावळे,पुणे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा