" डॉक्टरांनी काकांना विचारलं तुम्ही कोण आहात? आणि तुम्ही त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या घरच्यांना बोलवून घ्या... इमेर्जन्सी आहे, त्यांच्या जीवाला धोका आहे. तेव्हा काकांनी माझ्याकडे बघितलं आणि त्यांच्या घरी कुणीच नाही म्हणजे एक मुलगी आहे मात्र ती लहान आहे. असे सांगून जे काही आहे ते मला सांगा. मी करतो मॅनेज असं म्हणून पैशाची जमवा जमाव सुरू केली."
" डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच बाबांना ऑपरेशन करण्याकरिता हलविले. कारण बाबांकडे वेळ फार कमी होता. त्यांचा सतत रक्तस्त्राव सुरु होता म्हणून हे डिसिजन घेतले .काकांनी आश्वासन दिले की, तुम्ही ऑपरेशन करा मी देतो पैसे. पण डॉक्टरांनी याची काही खात्रीही दिली नाही की ते वाचतील म्हणून.पण आम्ही प्रयत्न करायचे नाही थांबलो. "
" बाबांना ऑपरेशन थिएटर मध्ये नेतांना डॉक्टरांनी काकांच्या खांद्यावर हात ठेवून काकांना दिलासा दिला...."प्रयत्न करणे आमच्या हातात आहे बाकी सगळं परमेश्वराच्या हातात आहे, त्याच्या मर्जी शिवाय आपण काहीच करू शकत नाही. असे बोलून ते ऑपरेशन करायला गेले."
"काकांना खूप टेन्शन होतं पैशाचं, काकांनी पन्नास हजार भरले. पण बाकी पैसे कुठून येणार या चिंतेत असताना त्यांचा फोन वाजला. पण त्यांना ते ऐकुही आले नाही. एक वेळा... दोन वेळा...रिंग वाजत होती. शेवटी मी काकांना सांगितलं की त्यांचा फोन वाजत आहे. आणि तो तुझाच फोन होता."
"हो.... मी कसा विसरेन ते सगळं? अजूनही ते शब्द अन् शब्द मला आठवत आहे"...
"हॅलो बाबा कसे आहात? आणि हे काय घरी कुणीच नाही का? मला तुम्हाला सरप्राइज द्यायचं होतं आणि मी घरी आलो तर घरी कुणीच नाही. मग रोमा कडे गेलो तर तिकडे सुद्धा कुणीच नाही.मला अजिबात आवडलं नाही मी आलो आणि घरी कुणी नाही."
"बाळा आपल्या घराजवळ संजीवनी हॉस्पिटल आहे तिकडे ये."
"का ? बाबा काय झालं सांगा ना? काय झालं?"
"तू ये इकडे मग कळेल तुला."
"तेव्हा खरच रोमा मला काहीही सुचेनास झालं मी पटकन घराबाहेर लावलेली गाडी काढली ,नशीब त्याची एक चाबी माझ्याकडे होती आणि वेगाने हॉस्पिटल मध्ये पोहचलो. तू आईच्या मांडीवर डोक ठेवून रडत होती. बाबा आणि आईच्याही चेहऱ्यावर खूप प्रश्न दिसत होते, काळजी दिसत होती. मी दिसल्याबरोबर मला बाबांनी सागितलं काकांचा अपघात झाला आणि...तू माझा आवाज ऐकताच माझ्याकडे धावत आली आणि माझ्या गळ्यात पडून रडायला लागली.तुझे ते शब्द अजूनही आठवत आहे."
"राज.. बघ ना रे, बाबांना काय झालं? तू आला त्यांना कर नारे लवकर नीट.मला काहीही अडचण आली की तू चुटकीसरशी सोडवतो का नाही, मग ही पण सोडवं ना."
"मी तुला खाली बसवलं. माझं डोक अगदी सुन्न झालं होतं, काय करावे काहीच सुचत नव्हतं..ऑपरेशन झाले आणि डॉक्टर बाहेर आले. त्यांनी जेव्हा सागितलं ऑपरेशन सक्सेसफुल झालं... बारा तासानंतर येतील शुध्दीवर. हे एकून सगळ्यांना फारच आनंद झाला. तुम्ही रात्रभरापासून काहीच खाल्ले नव्हते. म्हणून मी जवळच्या हॉटेलमध्ये गेलो आणि थोडं खायला घेवून आलो. पण त्या दिवशी कुणीच पोटभर जेवलं नाही.
सगळे एकमेकांकडे बघत होते, एकमेकांना जणू विचारात होते, पुढे काय होईल? मात्र उत्तर कुणाकडेच नव्हत."
"हो आणि राज तू मला म्हटला की रोहितला सांगितलं का? त्यानंतर मी रोहितला फोन केला. मात्र त्याने नाही उचलला. त्याने दोन तीन तासाने मला कॉल बॅक केला. तो मस्करीच्या मूड मध्ये होता...तो मला अगदी सहज बोलून गेला.
"हॅलो रोमा.. अगं किती फोन केले तू रात्री. तुला झोप येत नव्हती का माझ्याशिवाय?"
" मी त्याला सांगितलं बाबांचा अपघात झाला आहे. त्यांचे ऑपरेशन झाले आहे. त्यांना बराच खर्च आला तसं काकांनी भरलेत पैसे पण अजून काही द्यायचे बाकी आहे. पण त्याने काहीच विचार केला नाही आणि एकदम बोलला,....
"अगं पण मी कुठून आणू पैसे? मी जॉब करतो पण तर मलाच कमी पडतात. तरीही बघतो नको टेन्शन घेऊ."
तो पर्यंत राज तू पैशांची व्यवस्था केली होती हे मला नंतर कळलं. थोड्या वेळाने बाबा शुध्दीवर आले .मी त्यांना भेटायला गेली. मी बाबा.... बाबा... म्हणत रडायला लागले, त्यांना काहीच करता येत नव्हतं पण
त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले.
त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले.
"तेवढ्यात मी घाबरून तुला बोलवलं राज.....राज ..आणि तुला ओरडले, "अरे बोल ना बाबांना तू प्लिज काहीतरी, ते ठीक आहेत, रडू नका म्हणून."
तू माझ्याकडे बघितलं बाबांचा हात हातात घेतला आणि म्हणाला " काका नका काळजी करू तुम्ही लवकर बरे व्हाल आणि तुम्हाला माझ्यासोबत यायचं ना परदेशात?"
" राज ..त्यानंतर बाबांनी सुद्धा एक हलकीशी स्माइल दिली. तुला त्यांनी काहीतरी इशारा केला आणि तू समजलास सुद्धा, तेव्हा तू म्हणाला, " काका तुम्ही रोमाची अजिबात काळजी करू नका. आणि मग अजून बाबांनी इशारा केला तो मात्र मला समजला. तो विषय माझ्या लग्नाचा होता तेव्हा तू म्हणालास त्यांना,आधी बरे व्हा मग बोलू. आधी घरी तर या."
तोपर्यंत बाहेर खिडकीजवळ रोहित येऊन उभा राहिलेला दिसला. आणि तू सरळ सांगून मोकळा झालास की जो खिडकी जवळ आहे तो माझी चॉईस आहे.मग मी रोहितला आत बोलावलं.पण एका क्षणात त्यांना त्रास व्हायला लागला. तू घाईघाईत उठून डॉक्टरांना बोलवलं, त्यांनी त्यांना चेक करायच्या आतच बाबांनी प्राण सोडला."
"हो...रोमा अगं तेव्हा रूममध्ये सगळीकडे शांतता पसरली आणि तू दोन चार मिनिट काहीच बोलली नाही. तुला मी तिथून उठवलं आणि तू बडबड करायला लागली." अरे राज थांब नारे, बाबांना भेटायचं आहे रोहितला, तू ना जराही ऐकत नाही माझं. कधीही, कोठेही तुझचं खर करतो."
मी तुला खूप समजावलं की काका आपल्याला सोडून गेले. तू माझ्याकडे बघितलं आणि बऱ्याच वेळानंतर तू जोरजोरात रडायला लागली. मग आईने तुला घरी नेलं. नंतर काकांचा अंत्यसंस्कार केला. तू मात्र एक जिवंत लाश सारखी रूम मध्ये बसली. ना कुणाशी बोलली नाहीस ,ना काही खाल्लं."
"मी तुझ्या रूममध्ये आलो आणि समजावलं तुला, "रोमा अगं तू स्वतःला सावर.अगं बाबा गेल्याचं दुःख आम्हाला पण आहे . खानं पिनं सोडून काय भेटणार आहे तुला?बाबा बघत असतील तर त्यांना वाईट नाही का वाटणार की, माझी लेक काहीच खात नाही, एकटी पडली,त्यांना नाही का दुःख होणार,चल उठ थोडं खावून घे."
"तरीही तू शांत, काहीच बोलली नाहीस, मग आईने ताट वाढून आणलं आणि तिची शपथ दिली ,तिच्या हाताने तिने तुला भरवलं, तू तिच्या कुशीत शिरलीस आणि ढसाढसा रडायला लागली."
" रोमा तुला ऐकायला फारसे चागलं वाटणार नाही पण जेव्हा पंधरा दिवसानंतर मी परत निघालो होतो तेव्हा आई मला तुझ्या बद्दल बोलली की, रोमाला अशी आपण किती दिवस आपल्या घरी ठेवणार म्हणजे तिचं मन साफ होतं, पण समाज काय म्हणेल ही भीती तिच्या मनात होती. तुझी बदनामी होवू नये, तुला कुणी नाव ठेवू नये हेच फक्त तिच्या डोक्यात होतं.जर समाजाचं तोंड बंद करायचं असेल तर तू तिच्याशी लग्न कर असं तिने ठाम सागितले. मात्र मी तिला खाली बसवलं आणि तुझ्याबद्दल आणि रोहित बदल सगळं सागितलं."
" पण तिचा काही त्याच्यावर विश्वास बसेना! तो कुठला, त्याच्या घरी कोण आहे? त्याचे आईवडील काय करतात? ह्या अश्या प्रश्नांचा भडिमार तिने माझ्या वर केला. मी तिला रोहित अनाथ आहे सांगितले आणि हे ऐकल्यावर तिला फारच वाईट वाटलं आणि रोहितबद्दल आपोआप तिच्या मनात प्रेम निर्माण झालं."
" तेवढ्यात बाबा आले आणि ते ही म्हणाले," आता करून टाकू मग लग्न तिचे. एक चांगला मुलगा शोधून. तेव्हा मी सागितलं बाबांना की,तुझं प्रेम आहे एका मुलावर, आधी तिला विचारा पण बाबांनी कुणाचाच काहीं चालू दिलं नाही उलट आम्हाला बोलले,
"अरे तिला काय विचारायचे.आता सगळे निर्णय आपल्यालाच घ्यावे लागतील. ती लहान आहे अजून. तिला काही कळत नाही. कुणाच्या चुकीच्या घरात लग्न करून दिलं, पुढे काही झालं तर आपण जबाबदार राहू त्याला."
क्रमशः....
©®कल्पना सावळे, पुणे
©®कल्पना सावळे, पुणे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा