Login

उसवले धागे कसे कधी? ( भाग ९)

प्रेम हे आंधळ असत पण ते डोळे उघडे ठेवून करावं नाहीतर ते जीवघेणं ठरतं.
राज पटकन बोलला,....
"कसला व्हिडीओ रोमा? काय होतं रोमा त्या व्हिडिओ मध्ये?"

रोमाने तिचा चेहरा दोन्ही हाताने झाकला." मी नाही सांगू शकत राज.. खरचं नाही सांगू शकत."

" अगं, तुला हे सर्व विसरायचं असेल तर एकदा सांग आणि मनातून  काढून टाक."

राजने तिला हिंमत दिली.." राज.…. अरे त्या दुधाच्या ग्लास मध्ये तो काहीतरी टाकायचा  आणि ते पिल्यावर माझी शुद्ध हरपायाची. तेव्हा कुणीतरी माझ्यासोबत रात्रभर संभोग करायचं..ते मला कधी कळलचं नाही. आणि मी त्यामुळेच गरोदर राहिले."

" छी!!!!एवढा घाणेरडा माणूस रोहित असेल असं कधी वाटलं नाही."

" ते सर्व व्हिडिओ मध्ये बघितल्यावर मी चक्कर येऊन खाली पडले आणि जेव्हा शुध्दीवर आले तेव्हा मी दवाखान्यात होते. तिथेही त्यांनी सगळं मॅनेज करून ठेवलं होतं.माझं  कुणी काहीचं नाही ऐकलं आणि मला सही करायला भाग पाडलं आणि माझा गर्भपात केला. कारण ते बाळ कुणाचं होतं हे कुणालाच माहीत नव्हतं. महिनाभरात माझे वेगवेगळ्या लोकांशी संबंध आले होते आणि रोहित हे तोंड वरून सांगत होता. मला तर काहीचं सुचत नव्हतं."

" काही तासानंतर मला घरी आणले. मी माझ्या रूममधे आराम करायला गेले आणि हे दोघं निर्लज्ज  बाहेर बसून माझ्या शरीराचा सौदा करत होते."

" गर्भपात केल्यामुळे माझ्याशी कुणाला शारीरिक सबंध ठेवता येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितले होते.पण रोहितला धीर निघत नव्हता."

"मला अजूनही आठवत आहे त्यांच बोलणं.... ते आठवलं ना की अंगावर काटा उभा राहतो माझ्या.रोहित मावशीला म्हणाला,." मावशी मी पंधरा दिवस नाही वाट पाहू शकत.अगं पैसा कुठून आणायचा? आठ दिवस  झाले."

" अरे तिचा रक्तस्त्राव  तर थांबायला हवं ना!..तिच्या जीवाला धोका आहे.काही दिवस शांत बस."

" हे सगळं एकून मला असं वाटलं आताच पळून जाऊन जीव द्यावा कुठेतरी. मी लग्न झाल्यापासून पासून बाहेर कुठेच गेले नव्हते. आपण कुठे आहोत? हे सुध्दा मला माहीत नव्हते आणि मग माझ्या लक्षात आले की मला रोहितने का हात लावला नव्हता. राज तुला माहीत आहे त्याला माझे जास्त पैसे मिळाले होते."

"त्यानंतर मला सगळं माहीत झालं होतं म्हणून माझ्यासमोर एकच ऑप्शन उरला की, तो जो कुणी घरी आणेल त्याच्यासोबत झोपायचे...आणि त्यांना पैसे कमवून द्यायचे. मला तर घराबाहेर जायची परवानगी नव्हती. मग मावशी सुद्धा तिथेच रहायला लागली. काही  दिवसांनी मला कळलं ही रोहितने अजून दुसरं कुणाशी तरी लग्न केले होते."

"मला स्वतःचा  खूप राग आला,घृणा येऊ लागली होती.पण याशिवाय मला दुसरा पर्याय नव्हता. मी कशाला नकार दिला तर तो व्हिडिओ मी जगासमोर आणेल ही धमकी तो द्यायचा."

"त्यावर  मावशी बोलायची की, "अगं तुला तर काहीच करायची गरज नाही, सगळं आरामात मिळतं मग का उगाच मला सोडा, मला जाऊ द्या म्हणून विनवणी करते.आता तुला बाहेरच्या जगात काहीच किंमत नाही. तू विकल आहेस स्वतःला आणि अश्या बायकांना काय म्हणतात?.... तुला ते वेगळं सांगायची गरज नाही.चल पटकन आवर कस्टमर यायची वेळ झाली."

"राज असं रोज व्हायचं माझ्यासोबत. आतून मी खूप खचून गेले.ना कुणी माझ्या सोबत बोलायचे,ना मला माझे दुःख कुणाला सांगता यायचे. जो कुणी आला माझ्याजवळ , तो फक्त लचके तोडायला. त्यांच्या नजरेत फक्त शरीराची भूक असायची.... एवढं मला दिसत होतं. त्यांच्या स्पर्शात हवस, वासना हे जाणवत होतं. कुणी माझ्या जवळ आलं की जणू माझा शरीर मृत होऊन माझा आत्मा निघून जायचा."

" रोमा बस...बस...नको सांगू आता पुढे, किळस यायला लागली आता मला या माणसांची."

" विचार कर राज, मग माझं काय झालं असेल? अरे आपला शत्रू जरी असेल ना... त्याला नकोत अशा वेदना... खूप भयानक होतं ते सगळं."

" अगं रोमा मी फक्त ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला ,माझ्या हृदयाचा ठोका चुकला असं वाटलं  मला  क्षणभर. मग तुझी काय अवस्था झाली असेल ते मी अनुभवलं. खरचं तू खूप हिंमतीने लढा दिला याचं मला खरचं कौतुक आहे. पण तू बाहेर कशी पडली गं या मधून."

" माहीत नाही हे बळ माझ्यात कुठून आलं. काही महिने असेच गेले. एक दिवस माझी तब्बेत खराब आहे असं मी नाटक केलं. चक्कर , मळमळ, थकवा खूप जाणवतोय म्हणून  सागितलं. म्हणून दोन दिवस माझ्या कडे कुणीही फिरकलं  नाही."

" दोन दिवसानंतर.... मावशी आजारी होती म्हणून ती दवाखान्यात गेली. रोहित घरी एकटाच होता.तो कुणाशी तरी पैशांबद्दल बोलत होता. मी त्याला आवाज दिला.
" रोहित अरे रोहित मला चहा देतो का प्लिज मला खूप त्रास होतोय रे. तो जरा नशेत होता.मला हे कळून चुकलं होतं. त्याने नकार दिला आणि  मला करायला सांगितला. मी गेले किचनमध्ये तो माझ्या बाजूला उभा राहिला.मी चहा केला. चहा करता करता मी बोलले त्याला.

"रोहित खरचं तुझं माझ्यावर प्रेम नाही का रे? तू असा कसा वागला माझ्याशी.तुला मी जबरदस्ती केली होती का?..की लग्न कर माझ्याशी."

" तो माझ्यावर जोरात ओरडला, " ऐ शांत बैस उगाच डोक नको खाऊ माझं. हे प्रेम बिम काही नसतं,जेव्हा पैसा नसतो, तेव्हा काय प्रेमाचं लोणचं घालणार? मी केलं तुझ्यावर प्रेम पण ...अगं मला पैसा हवा होता आणि त्याचा सोपा मार्ग तुझ्या सौंदर्यात दडलेला दिसला. मग मी तो अवलंबला त्यात मला नाही वाटत की, माझं काही चुकलं. तशीही तुझ्या शरीराची भूक मी मिटवली काय किंवा दुसऱ्याने  सारखेच आहे.\"

" तो हे सर्व  बोलला... याचा मला खूप राग आला मी ही बोलून गेले या ठिकाणी तुझी आई बहीण असती तर सौदा केला असता ना तू? मग त्याला खूप राग आला. तो मला मारायला येणार तोच मी चहा त्याच्या अंगावर फेकला .तरीही तो  माझ्या  दिशेने आला आणि माझं डोक चालू गॅस वर दाबलं. मी ओरडत राहिले...मला त्रास होतोय ,मला खूप जळत आहे,आग होत आहे... सोड मला. पण त्याने काहीच ऐकलं नाही. मी पूर्ण ताकद एकटवली आणि बाजूची सुरी उचलली आणि त्याच्या मंडीवर सपासप वार केले. तो खाली पडला."

"माझ्या चेहऱ्याची खूप आग झाली..पण मी कपडा पाण्याने ओला केला, जळलेल्या भागावर ठेवला आणि तिथून पळ काढला. मी मागे वळून पाहिलेच नाही.जे पळत सुटले ते एका झोपडपट्टीत आले...आणि तिथे मला चक्कर आली. मग मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मावशीच्या घरात होते."

" मावशीने डॉक्टरांना बोलावून चेहऱ्यावर उपचार करून घेतले होते. मी उठले तोच मावशी मला म्हणाल्या की,
"अगं पड जरा, चेहऱ्याला किती भाजले, कुठे धडपडली होती गं? किती खराब झालाय चेहरा.खूप आग होत असेल ना ?" मला खूप वेदना होत होत्या, माझा चेहरा कुरूप झाला याच्याशी मला काहीच घेणं देणं नव्हतं.  मी त्याचा विचारही केला नाही. फक्त एकच गोष्टीचे समाधान होते की मी त्या नरकातून सुटले. बसं एवढाचं विचार माझ्या डोक्यात होता."

" अच्छा मग तू जरा बरी होऊन इकडे कामाला आलीस?"

" नाही मी खरं तर घरी शिकवायचे मुलांना. मात्र मावशीला दोन दिवस काम होते म्हणून मीच म्हंटलं त्यांना.... मी जाते कामाला तेवढेच तुम्हाला पैसे मिळतील."

" बरं...मग तू आलीस आणि आपली भेट झाली. पण खूप भयानक आहे गं हे सगळं. आपल्या आयुष्यात  काय घडेल याचा खरच नेम नसतो.खूप दुःख येतात, संकट येतात पण जेव्हा आपण दुसऱ्याकडे बघतो तेव्हा आपलं दुःख खूप कमी आहे असं वाटायला लागतं. मी आई बाबा गेले.... तेव्हा खचून गेलो होतो, आपण एकटे पडलो ही भावना मला सहन होत नव्हती. पण तू जे सहन केलं त्याची ...मी कल्पनाही करू शकत नाही. पण तू खरचं खूप हिमंतवाली आहेस. बरं पण रोहितचा काही अतापता आहे का नाही? त्याला ह्याची शिक्षा मिळायलाच हवी."


" राज, अरे ....मी वाचली बातमी पेपरला साधारण एक महिन्यापूर्वीच की, रोहित आता तुरुंगात आहे. त्याने मलाच नाही तर इतर बऱ्याच मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि असेच अश्लील व्हिडिओ काढले. मी खूप मोठी चूक केली.... राज मी खरचं खुप मोठी चूक केली....तू मला म्हटला होतास पण मी नाही लक्ष दिले तुझ्याकडे. रोहित खरचं वाईट मुलगा आहे....खूप वाईट मुलगा आहे."

राज उठला, रोमाच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि तिला धीर देत बोलला." अगं वेळ आणि काळ सगळं बदलतात आणि वेळेनुसार आपणही आपल्यात बदलाव करणं आवश्यक आहे. चल विसर सगळं आता ते,असं समज ते एक वाईट स्वप्न होतं.पूर्ण आयुष्य पडलय तुझ्यापुढे अजून."