आई लागल्या आम्हाला सुट्ट्या दिवाळीच्या..
अरे वा छान! आता मज्जाच मज्जा आहे बुवा एका माणसाची ?? भाऊबीजेला आत्या घरी येणार, कपडे आणि चॉकलेट मिळणार एका लबाडाला..मग आपण मामा कडे जाऊ तिथे पण कपडे चॉकलेट, मिठाई आणि शेतात फिरायला मिळेल. झाडावर चढून संत्री तोडून खाता येईल.. मज्जा आहे बुवा तुझी ?
आई... दिवाळीला किती छान असत ना ग. आत्या -मामाजी, तन्मय दादा, मृण्मयी ताई येतात घरी. रजत काका, काकू, रेणू, चिकू सगळे येतात. आपण एकत्र सण साजरा करतो. काकू किती छान रांगोळी काढतात, आपला वाडा पणत्यानी उजळून निघतो. खूप छान वाटत.
आत्या येऊन गेल्यावर मग आपण मामा कडे जातो, तिथे आजी, आजोबा, मामी , रेवा, वैष्णवी, मोठी मावशी, लहान मावशी,पूर्वा ताई, भावेश, साहिल दादा, प्रतीक दादा, प्रणाली ताई सगळे एकत्र येतात. किती मज्जा येते नाही.
हो रे बाळा दिवाळी म्हंटल की खाण्यापिण्याची मज्जा असते आणि नातेवाईकांना भेटण्याची सुवर्णं संधी. दिवाळी हा आनंदाची उधळण करणारा सण आहे आणि यातच नात्याचा उत्सव साजरा केला जातो. एकमेकांशी भेटून, एकमेकांना भेटवस्तू देऊन.
हो ग आई
दिवाळी
"उत्सव आनंदाचा,आपुलकी आणि आपलेपणाचा,
उत्सव नात्यांचा, एकमेकांच्या गाठीभेटी घेण्याचा."
©जयश्री कन्हेरे -सातपुते.
#गोष्ट छोटी डोंगराएव्हडी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा