उत्साहाचा खळखळता झरा.. मीनाक्षी ताई
यंदाच्या वर्षी, ईरा चॅम्पियन ट्रॉफी ह्या स्पर्धेची ईराच्या साईटवर घोषणा झाली आणि मला त्यात सहभागी व्हायची उत्सुकता लागली. संजना मॅडमने सर्व सहभागी होऊ इच्छित लेखकांची नावे ड्रॉ काढून वेगवेगळ्या टीममध्ये विभाजित केली. माझ्या मनात हुरहूर वाढत होती. कोणता ग्रुप मिळेल ? कोण कोण ग्रुप मेंबर असतील?
एक एक नावाच्या चिठ्ठी निघत होती तसे तसे ग्रुप तयार होत होते.ग्रुप नंबर दोन मध्ये दुसरेच नाव माझे आले होते त्यानंतर एक एक करत सगळ्यांची नावे ऐकली. ग्रुपमधील मेंबर पाहता, लेखिका शिल्पा सुतार आणि लेखक पार्थ धवन सोडता कोणतीच नावे ओळखीची नव्हती.त्यातून पण फक्त शिल्पा ताईला मी ओळखत होते. हळूहळू सगळ्यांची ओळख देणे ग्रुपमध्ये सुरू झाले. त्यात सगळ्यात पहिला नंबर होता तो मीनाक्षी वैद्य ताईंचा. त्यांचा लेखन प्रवास,प्रकाशित साहित्य पाहून मी क्षणभर थक्क झाले. नक्कीच आपल्याला ह्यांच्याकडून बरेच लिखाणातील बारकावे शिकायला मिळणार ह्यासाठी आनंद झाला. काही पटले नाही की कान पकडुन चुका दाखवणाऱ्या मीनाक्षी ताई माझ्यासाठी मोठ्या बहिणीच्या जागी आहेत. तर कधी मी केलेल्या लिखाणाची किंवा स्टँड अप कॉमेडीची कौतुक करणारी आणि प्रेम देणारी अशी माझी गोड मैत्रीण देखील झाली आहे.

"ताई तुम्ही मला प्रत्येक फेरीत हव्या आहात" असे सर्वेश सरांनी म्हणावे. त्यावर "मी आहे सर नवीन नवीन सगळे प्रयत्न करणार" असे म्हणणाऱ्या आमच्या टिम मधील वयाने आणि अनुभवाने मोठ्या पण तरुणांनाही लाजवेल असा उत्साह बाळगणाऱ्या मीनाक्षी ताई. आमच्या ह्या टीम दोन मधील भक्कम योद्धा आहेत.
सध्या,मीनाक्षी ताई स्नेहमंगल क्रिएशन तर्फे कंटेंट रायटिंगचं काम करतात. त्या एक उत्तम लेखिका असून त्यांची सात पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्याबरोबर त्या नागपूर आकाशवाणीवर आर्टिस्ट म्हणून कार्यरत आहेत. एवढेच नाही तर त्या व्हाॅईस ओव्हर देखील करतात. त्यांनी लग्नानंतर शिक्षणाची आवड जपत, एम ए बी एड पर्यंत शिक्षण पूर्ण केले. घर,संसार,शिक्षण,मुलांचे संगोपन आणि सोबत लिखाण ह्याचा मेळ त्यांनी त्यांच्या जीवनात छान जमवला आहे. भरपूर लिखाणाचा अनुभव आणि उत्तम साहित्यिक प्रवास असूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. अश्या ह्या हुशार मीनाक्षी ताईंबद्दल किती लिहावे तितके कमीच आहे.
आपल्याला कधीही काही मदत हवी असेल तर ताईंना सांगायची देरी असते.
लगेच"बोल काय करू मी? " असा ताईंचा त्यावर रिप्लाय आलाच म्हणून समजा. ग्रुपमधील कोणालाही चारोळी करून हवी असेल तर ताई लगेच करून देतात. त्या कधीही कोणत्याही विषयावर पटकन चारोळी किंवा छान टॅग लाईन लिहून देण्यात अगदी तरबेज आहेत ह्याचा अनुभव आम्ही सगळे घेत असतो.

तसे पाहिले तर,चॅम्पियन ट्रॉफी २०२३ मधील सगळ्याच फेऱ्या ह्या आव्हानात्मक आणि खूप काही शिकवून जाणाऱ्या होत्या. जलद कथा फेरीत त्यांनी सद्य परिस्थितीवर लिहिलेली आणि सकारात्मकतेचा संदेश देणारी 'सूर्योदय' हि कथामालिका वाचकांना खूप आवडली. दीर्घकथा लिहिण्यात देखील त्यांनी हिरहीरीने 'श्शू! आवाज कोणाचा?' हि रहस्यमय कथा लिहिली आणि वाचकांचे त्यावर खूप प्रेम मिळविले. त्यांनतर जेव्हा वेळ आली ती स्टँड अप कॉमेडी करायची तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या गमतीशीर किस्से सांगत त्यांची विनोदबुद्धी आणि योग्य वेळी पंचेस टाकत खूप मज्जा आणली. चॅट संवाद फेरीमध्ये त्यांनी लिहिलेला ' सासूबाईंचे काम भारी देवा !' हा दोन मैत्रिणींमधील संवाद नकळत वाचकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात यशस्वी झाला.
"सुप्रिया काळजी घेत जा तब्येतीची पासून ते सुप्रिया हे कधीपर्यंत लिहून देशील तुझे राहिले आहे बघ" असे हक्काने आणि प्रेमाने विचारपूस करणारे आणि वेळीच चूक सुधारण्यासाठी चूक दाखविणारे आमचे गोड नाते हे ह्या चॅम्पियन ट्रॉफीच्या निमित्ताने जुळले. हे बंध आता दिवसागणिक घट्ट होत आहेत. ताईंचा स्वभाव म्हणजे प्रत्येक क्षण भरभरून जगणाऱ्या लहान मुलांसारखा आणि कुणी नियम मोडत आहे पाहून क्षणात रागवणाऱ्या अनुभवी मोठ्या व्यक्ती सारखा आहे.
"एज इज जस्ट ए नंबर" हे ज्यांच्याकडे पाहून नेहमी जाणवते अश्या आमच्या ईरा परिवारातील लाडक्या अनुभवी लेखिका मिनाक्षी ताई. आपल्या दोघींचे हे गोड रेशमी बंध असेच बहरत जावे हिच सदिच्छा व्यक्त करते.ताई सगळे काही करा पण हो त्या सोबत तब्येत देखील सांभाळा. कधीकधी खूप ताण घेता तुम्ही तेव्हा आम्हाला तुमची काळजी वाटते. असेच विविध विषयावर लिहीत रहा. मला आणि सगळ्या वाचकांना वाचायला नक्की आवडेल. तुझ्यात लपलेला अवलिया कलाकार सगळे काही लिलया पेलू शकतो हे लक्षात ठेव.आपले जे हे सुंदर कुटुंब तयार झाले आहे ते कायम सोबत राहावे हि इच्छा नक्कीच आहे. लव्ह यू मीनाक्षी ताई.
शेवटी इतकेच म्हणावेसे वाटते...

उत्साहाचा खळाखळता झरा तुम्ही
वेगवेगळ्या विषयावर लिहिण्यात सरस तुम्ही
आमच्यावर आईची माया करणाऱ्या तुम्ही
टीम दोनच्या हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहात तुम्ही...

-सुप्रिया महादेवकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा