आरती नी आवाज दिला तेव्हा अनुज तंद्रीतून बाहेर आला....
अनुज उठ लवकर.... तयार हो रे...
आपल्याला निघायचं आहे..
आज जतिन (अंजलि चा नवरा) टुर वरून परत येणार होता...
अंजलि नी अनुज आणि आरती ला जेवायला बोलावले होते...
दोघेही छान तयार होऊन निघाले....
वाटेत पुर्ण वेळ अनुज च्या डोक्यात जुन्या गोष्टीचा काहुर माजला होता....
पुर्ण वेळ तो विचारच करत राहिला...
अंजलि कडे पोहोचताच....
हाय..
हलो.... पासून सुरूवात झाली...
चौघांच्या गप्पा सुरू झाल्या..
जतिन कविता लिहायचा...
तो निसर्गवेडा होता....
निसर्ग, पहाडी, नद्या.. हे त्याला खुप आवडायचे...
त्यात तो रममाण होऊन कविता लिहायचा...
आरतीला ही कविता ची आवड आहे हे जतिन ला कळलं तो खुश झाला.. अरे व्वा आपल्या सोबत कुणीतरी आहे.....
गप्पा गोष्टी करत करत जेवानाचा कार्यक्रम निपटला... आणि मग सुरु झाली कवितेची मैफिल...
मग, आरती मॅडम एकवा तुमची एखादी कविता...
जतिन मिश्किलपणे बोलला...
अहो..नाही..नाही .. मी तर आपलं सहजच थोडपार लिहीते..
जतिन नी खुप आग्रह केला म्हणून आरती नी आपली कविता ऐकवली ....
जतिन ने आरती च्या कविताची खुप तारीफ केली....
अंजलि कडे आरती नी काही डिशेस केल्या होत्या....
आधी जतिन तिच्या खाण्याची तारीफ केली आणि आता कवितेची..
त्या तिघांच हसणं, खिदळण सुरू होतं...
पण अनुज मात्र विचारात गठला होता...
जतिन ने आरती ची केलेली तारीफ , तिच्या कवितेच केलेलं कौतुक अनुज च्या डोळ्यांनी कदाचित पाहावत नव्हत...
एकाद तासांनी दोघेही घराकडे परतले.... आरती खुश होती....पण अनुज च्या चेहरयावर मात्र बारा वाजले होते .... माथ्यावर आठया उमटल्या होत्या....
दुस-या दिवशी आरतीच्या आई बाबांचा फोन आला...
त्यानी सहजच फोन केलेला.......
बोलता बोलता ट्रांसफर चा विषय निघाला.... बाबांनी सहज म्हटलं आता दोन वर्ष तर तुम्हच येण होणार नाही....
त्यावर अनुज पटकन उत्तरला... नाही नाही बाबा.... मी पुढल्या दोन-तीन महिन्यात ट्रांसफर करुन घेतोय....
मी आता माझा विचार बदलला आहे....
आणि अनुज फोन ठेवतो....
त्याच्या बाजुला उभी असलेली आरती मात्र स्तब्ध होते....
जो अनुज दोन वर्ष आपण कुठेही जायचं नाही अस म्हणत होता..... तो अचानक बदली का करून घेतोय....
अनुज अस का करतोय हेच तिला कळल नाही....
ती अनुज ला विचारते, अनुज आपण दोन वर्ष इथेच राहणार होतो ना मग अचानक काय झालं ....
अनुज..उत्तर दे
अनुज जवळ मात्र या प्रश्नाचं उत्तर नव्हत.....
समाप्त:::
अनुज आणि अंजलि हे एकाच कॉलेज मध्ये होते.... दोघांच प्रेम प्रकरण ही होत..( लग्ना आधी). हे आरती ला माहीत असूनही तिला काहीच प्रॉब्लेम नव्हता... ते एका ऑफिस मध्ये होते, एकमेकांशी बोलत होते.
.. यात आरती नी नाही वाईट वाटून घेतलं नाही...
मोकळ्या मनाने तीनी त्याच्या मैत्रीला स्विकारलं....
मग एखाद्या व्यक्तीने जर त्याच्या बायकोच कौतुक केलं... तर त्याला एवढा राग का आला....
हे आरती वरचं प्रेम होत, त्याची जेलसी होती की त्याचा इगो होता....
हे मात्र आरतीला अजूनही कळलेल नाही....
तिला याचं उत्तरच मिळाल नाही...
बघा तुम्हाला उत्तर मिळते का...
आणि मिळाल्यास मला नक्की कळवा..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा