वाचावं असं समर्थांची लेक

वाचाव अस पुस्तक समर्थांची लेक
वाचाव अस
समर्थांची लेक
लेखीका सारीका कंदलगांवकर

मी काही मोठा लेखक किंवा समीक्षक नाही. त्यामुळे काही चुक झालीच तर क्षमा असावी.

ऑनलाईन वाचन तर सुरु असतेच. पण बऱ्याच वर्षांनी एक पुस्तक हातात आलं होत. मग काय? हातात मिळाल्यावर लगेच परतीच्या प्रवासात वाचायला सुरवात केली. घरी पोहोचेपर्यंत निम्म्यापेक्षा जास्त पुस्तक वाचुन मोकळा झालो होतो आणि घरी पोहोचल्यावर ते संपवुनच उठलो होतो.

या पुस्तकाचे कथानकच असे आहे की एकदा वाचायला सुरवात केली की ते ठेवावसं वाटतचं नाही.

कथेतल्या प्रत्येक भागात एक गुढ रहस्य दडलेल दिसत. त्या प्रत्येकाची सांगड पुढच्या भागात दिसते. अगदी शेवटपर्यंत नवीन नवीन रहस्य बाहेर पडताना आश्चर्यचा धक्काच बसल्यासारख वाटतं.

या कथेत टिपीकल कथेसारखं नायक, नायिका, खलनायक अस काही दिसत नाही. तरीही कथेमधले नायिका अगदी जवळची वाटते.

आधुनीक मुलगी असुनही तिच काम संभाळुन तिच्या घराचा पारंपरीक वसा कसा चालवला याची उत्तम अशी मांडणी या कथेत दिसते.

इतिहासापासून ते आत्तापर्यंतच्या घटनांची उत्तम अशी मांडणी केलेली आहे.

शेवटचं पान वाचताना लवकर संपली कथा अस वाटुन जात. पण कथा म्हटली की शेवटं हा असतोच.

पण खरचं बऱ्याच वर्षातुन चांगल पुस्तक हातात वाचायला मिळाल. याच समाधान मिळाल.