वडे किंवा सांडगे
साहित्य- मुगाची डाळ पावकिलो, चवळीची डाळ पावकिलो, मठाची डाळ पावकिलो, उडदाची डाळ अर्धापाव, हरभरा डाळ अर्धापाव, जिरे दोन चमचे, लसुन एक वाटी, हिंग अर्धा चमचा, लाल मिरची दोन चमचे, हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, कोथिंबीर बारीक चिरलेली.
कृती-
१) सर्व डाळी रात्री पाण्यात वेगवेगळ्या भांड्यात भिजवून ठेवणे.
१) सर्व डाळी रात्री पाण्यात वेगवेगळ्या भांड्यात भिजवून ठेवणे.
२) सकाळी पण सगळ्या मिक्सरमध्ये अगदी कमी पाण्यात वेगवेगळ्या बारीक दळून घेणे.
३) त्यातच लसूण जिरे बारीक करून घेणे.
४) नंतर त्यात मीठ मिरची हळद हिंग कोथिंबीर घालून चांगले एकत्र करून घेणे.
५) हाताने किंवा मोठ्या झाऱ्याने वडे पाडणे आणि ते चांगले कडकडीत उन्हात वाळवून डब्यात भरून ठेवणे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा