राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा.
विषय : प्रेम
जिल्हा : मुंबई.
मागील भागात आपण पाहिले की ऋजुता सोहमचे रॅगिंग करायला जाते आणि सोहम तिचे पिस्तुल तिच्याच हातात ठेवून निघून जातो. आता पाहू पुढे काय होते ते.
" ऋजुता तू चिडू नकोस. शांत हो बाई." ईशा ऋजुताची समजूत काढत होती.
" त्याला याचे परिणाम भोगावेच लागणार." ऋजुता हाताच्या मुठी वळत म्हणाली. ती तशीच धावत सोहमच्या पाठी गेली. पाठमोर्या सोहमला तिने आपल्या दिशेने वळवले.
" जग इकडचे तिकडे जरी झाले तरी आपले लग्न तुझ्याशीच होणार.. समजले?" ऋजुता सोहमची कॉलर पकडून बोलली.
" ओ बाई.."
" बाई कोणाला म्हणतोस रे?" पळत आलेली ईशा म्हणाली.
" माफ करा ताई. मी इथे शिकायला आलो आहे. रॅगिंग, पिस्तुल आणि तुमचे लग्न यात मला काडीचाही रस नाही. त्यामुळे तुम्ही मला माफ करा. मला जाऊ दे." सोहम हात जोडत बोलला.
" आता जाऊ देते आहे. पण लग्न तर आपलेच होणार. समझा क्या.." ऋजुता त्याची कॉलर सोडत म्हणाली. सोहम पुढे काही बोलणार तोच शशांकने त्याचा हात धरला आणि त्याला घेऊन पुढे निघाला.
" ऋजा, तू बरी आहेस ना? त्याच्याशी लग्न करणार काय म्हणते आहेस?"
" ईशा.. मी पूर्ण बरी आहे, ताळ्यावर आहे. हा पहिला कोणीतरी आहे ज्याने मला उलटून बोलायची हिंमत केली. लग्न तर होणारच, तू बघत रहा." ऋजुता ईशाला डोळा मारत म्हणाली. हे सगळं पाठीमागे असलेला पक्यादादा बघत होता.
" सोहम, तुझे ना बॅड लकच खराब आहे.." शशांक डोक्यावर हात मारत म्हणाला.
" हे बघ भाऊ, नशीब खराब असणे म्हणजेच बॅड लक. आता ते ही खराब म्हणजे?"
" ते ही खराब म्हणजे, तुझी वाट लागली. तुला माहित आहे का तू कोणाशी पंगा घेतला आहेस ते?"
" अरे बाबा मी कोणाचे काही घेतले नाही. पंगा तर मुळीच नाही."
" सोहम मस्करी बंद कर. ती मुलगी कोण होती माहिती आहे का? ती इकडच्या डॉनची मुलगी आहे. आणि तू पण खऱ्या पिस्तुलाने पक्षी मारले आहेत, हे म्हणजे.. तुझे बाबा पण भाई आहेत का?"
" ते पिस्तुल खरे होते? अरे मी रॅगिंग बद्दल खूप ऐकले होते. मला वाटले ती मस्करी करते आहे माझी.. माझे बाबा कसले भाई? ते म्हणजे आईचा आवाज वाढला तरी घाबरतात. आता मी काय करू रे? ते मारणार नाहीत ना मला?" सोहम आवंढा गिळत म्हणाला.
" मला काय विचारतोस? मी तुला खुणावत होतो तर तुझे लक्ष नव्हते. आता भोग आपल्या कर्माची फळे. चला आता वर्गात जाऊ. नाहीतर सरांची बोलणी बसायची." हे एवढे सगळे ऐकल्यावर सोहमचे अभ्यासात लक्ष लागणे शक्यच नव्हते. पण आता जे केले आहे ते निस्तरायला तर हवेच होते. त्याने ठरवले, हा जो शूरपणाचा आव आणला आहे तो निभवायचा. एकदा मनाशी निश्चय झाल्यावर परत त्याच्या चेहर्यावरचे तेज परत आले. लेक्चर संपल्यावर तो बाहेर आला. ऋजुता त्याची तिथे वाटच बघत होती. सोहमने तिच्याकडे दुर्लक्ष केले. नाकासमोर बघून चालायला लागला.
" अरे ऐकना.." तिने सोहमला हाक मारली.
" हे बघा ताई, मला माफ करा. मी इथे फक्त अभ्यासासाठी आलो आहे. माझ्या आईवडिलांची काही स्वप्ने आहेत , ती मला पूर्ण करायची आहेत. आणि अजून एक मी माझ्या आईबाबांचा एकुलता एक मुलगा आहे. मला जर काही झाले ना तर ते जगू शकणार नाहीत. एका वेळेस तीन जिवांच्या हत्येचे पातक लागेल तुम्हाला." सोहम बोलत होता आणि ऋजुता त्याच्याकडे बघत होती.
" बस. हो गया तेरा? तुला काय वाटले फक्त तुझ्याच आईवडिलांची स्वप्ने आहेत? माझ्या पण मॉमडॅडला वाटतेच ना आपण पण शिकावं, आपलं पण लग्न व्हावं. भेंडी तू तर आयटमच आहेस. बघ. मी काय म्हणते दोघे मिळून रापचिक अभ्यास करू. खाऊ पिऊ. मज्जानी लाईफ. काय पटतय का?"
" आम्ही खूप साधी माणसे आहोत हो. मला नाही जमणार हे सगळे. मी अभ्यास सोडून बाकी काहीच नाही केले कधी."
" जिंदगीमें बहुतसी चीजे पहलीबार होती है मामू.. ठीक है. तुला हे नाही जमत ना. मग मी तुझ्यासारखे होते. पर शादी होगी तो अपनीच.. समझा क्या? चल मी तुला घरी सोडते. कुठे राहतोस तू?"
" मी इथेच वस्तीगृहात राहतो."
" कोणते गृह?"
" हॉस्टेलवर राहतो." सोहम डोक्यावर हात मारत म्हणाला.
" मग हे असे सरळ मराठीत बोलायचे सोडून संस्कृत कशाला फाडायचे? तू पण ना अँटिक आहेस हा."
" माझ्या आईला बघून मग काय म्हणशील?" सोहम मनातल्यामनात बडबडला.
" तू काय बोललास का रे?" ऋजुताने संशयाने विचारले.
" नाही. मी कसा काही बोलीन? माझी हिंमत?"
"बरं चल मी निघते. तुला नाय ना कुठे सोडायचे? मग उद्या भेटू." ऋजुता सोहमला फ्लाईंग किस देऊन निघाली.
सोहम शशांकला घेऊन पटापट रूमवर आला. अख्ख्या कॉलेजची नजर त्याचा पाठलाग करत होती.
" भयानक आहे रे हे सगळे. कोण कोणाची कोण ही मुलगी. सरळ गळ्यात येऊन काय पडते? माझी आई तर मारेल मला." सोहम रडकुंडीला आला होता.
" मी काय बोलू यावर. तू थोडे दिवस हो ला हो कर तिच्या. नंतर कंटाळून तिच निघून जाईल तुझ्या आयुष्यातून. बरोबर ना?" शशांक त्याला सुचवत म्हणाला.
" हो रे.. मी ना मुद्दाम तिच्या मनाविरुद्ध वागतो. म्हणजे ती माझा नाद सोडेल."

" भाई, आज ऋजाताईने एका मुलाच्या डोक्यावर घोडा ठेवला. त्याने तो तिच्याच हातात ठेवून दिला." पक्यादादा रोजचा रिपोर्ट देत होता.
" काय?"
" हो ना भाय. आणि ऋजाताई..."
" काय केले मग तिने?"
" ती.. ती त्याला म्हणाली लग्न करेन तर तुझ्याशीच."
" काय?" भाई एवढ्या जोरात ओरडला की पक्यादादापण घाबरला.
" हळू ना भाय.. भिती वाटते तुमची."
" मग तो मुलगा काय बोलला?"
" भाय तो साधा दिसतो. गावावरून आलय पाखरू बहुतेक."
" हो का? मग लक्ष ठेव दोघांवरही. हर हर भोले.." भाईने हात जोडले.
सोहम आणि ऋजुताचे काय होईल ते बघू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा