Login

वड्याचा तेल वांग्यावर(पनिशमेंट) भाग तीन

संतापाच्या भरात तिने सोन्याच्या गालावर एक थापड मारली

पनिशमेंट भाग तीन

आपल्या सांगण्याचा पियुष च्या आई वर काहीच परिणाम झाला नाही उलट सुट्टी झाल्यावर दिप्ती ला चार गोष्टी प्रिन्सिपल मॅडमनी सुनावल्या.
“ पण मॅम अशाने त्याची मस्ती अजून वाढेल तो इतर मुलंच काय मुलीं ना त्रास देईल वर्गाचं डिसिप्लिन बिघडेल.”

“पाहू आपण नंतर! तो ट्रस्टिंच्या नात्यातल्या आहे.”

हे सर्व ऐकून दीप्ती खूप अपसेट होती. एकदा मनात आलं नौकरी सोडून द्यावी.पण मनाला तिने आवर घातला.


घरी आली तेव्हा सोना कपडे बदलून टीव्ही पाहत बसली होती.
“सोना होमवर्क पूर्ण झालंय, ?” जरा ओरडूनच दिप्ती ने विचारले.

‘झोपायच्या आधी करेन’.

दीप्तीने कपडे बदलले व किचनमध्ये गेली सोनाच्या टिफिन मध्ये सकाळची भाजी पोळी तशीच होती.
" सोना टिफिन फिनिश का नाही केला ?
भाजी का नाही खाल्ली ?"
‘मम्मा मला नाही आवडली,’ सोना टीव्ही समोरूनच बोलली.

दिप्ती ला सरदेसाई मैडम च बोलणे आठवले "एक एकच मुल म्हणून लाडावलेले असतात आणि तिचा संताप झाला, त्या संतापाच्या भरात तिने सोनाला गालावर एक थप्पड मारली व म्हणाली आवडली नाही म्हणजे काय ?
तुझे नखरे फारच वाढत चालले आहे.

सोना म्हणाली आई त्यात मीठ खूप जास्त होतं ग माझ्या ने नाही खाववली असे म्हणत ती रडू लागली.
दीप्तीचा आज उपास होता म्हणून सकाळी भाजी चाखलीही नव्हती. बापरे डबल मीठ होते.
शाळेत झालेल्या प्रकाराचा परिणाम म्हणून तिने आपला सगळा राग सोना वर काढला

खर तर सोना ला तिने खूप छान शिस्त लावली होती. अजीत बाहेर असल्याने सोना ला तिच्या बाबां ची कमतरता जाणवते हे तिला समजत‌होते म्हणून च ती दोघांच्या वाटचे प्रेम व शिस्त लावायचा प्रयत्न करत असे. पियूष च् वर्तन पाहून ती जरा जास्तच काळजीत पडली. त्याला प्रिसीपल मॅडम ही काही न बोलता आपल्याला चुप केले तो अपमान आणि स्टाफ रूम मधल्या चर्चेचा परिणाम, आपल डोकं सटकल आणि तो सगळा राग आपण सोना वर काढला.आपण “वड्याचे तेल वांग्यावर काढले “
असे जाणवतात तिने सोनाला “ साॅरी बेटा “म्हणून जवळ घेत तिच्या गालावर फुंकर घातली.
सोना अर्धवट झोपेत होती ती सर्व विसरून दिप्ती च्या गालावर किस देत तिच्या गळ्यात हात टाकून झोपली….
—----------------------------------------------
संपूर्ण