वड्याच तेल वांग्यावर.#
पनिशमेंट भाग एक
पनिशमेंट भाग एक
दिप्तीने सोनाचा टिफिन भरला ,तिला तयार केलं ,मग स्वतःची तयारी करू लागली, तोपर्यंत सोनाची स्कूल बस पण आली." बाय मम्मा" म्हणत सोना पळाली.
सोना जाताच दिप्ती आपल्या तयारी ला लागली, आज तिचा उपवास होता तिने पटकन साबुदाण्याची खिचडी तयार केली डबा भरला थोडी खिचडी सोना साठी काढून ठेवली शाळेतून आल्यावर खायला.
दिप्ती एका शाळेत नौकरी करत होती. तिचा नवरा अजीत, त्यांच्या कंपनी च्या एका प्रोजेक्ट साठी एकवर्ष यूएस ला गेला होता .

दिप्ती ने घाईघाईने स्कूटी स्टँड ला लावलीआज दीप्तीच्या शाळेत शिक्षक-पालक मिटिंग होती. आज बरेच पालक शाळेत येतात म्हणून लेडी टिचर्स नी साडी नेसून यायचं ठरवलं होतं. रोज पेक्षा आज दिप्ती वेगळी नी सुंदर दिसत होती. काही मुली मुली तिला साडीमध्ये पाहून मॅडम आज छान दिसतात असं आपसात बोलत होती.तर काही लेडी टिचर्स नी कौतुकाने अंगठा वर करुन छान दिसते असे सांगितले.
दीप्तीने क्लासमध्ये आलेल्या पालका शी मुलांच्या रिझल्ट विषयी गोष्टी केल्या .तेवढ्यात 9th c सेक्शन चापियुष व त्याची आई पण हजर झाले.
मागच्या दोन-तीन आठवड्यापासून पियुष बद्दल बऱ्याच तक्रारी होत्या. पियुष ने वर्गात कागदाचे बाण मारून फेकणे, टीचर्स वर काहीतरी मीम्स बनवून खिदळणे , होमवर्क पूर्ण न करणे, मुलांना त्रास देणे,अश्या एक ना दोन अनेक तक्रारी होत्या.
दिप्ती 9th क्लास ची क्लास टीचर होती..सुरवातिला तिने दुर्लक्ष केले मग त्याला गोड शब्दांत समज दिली पण पियूष खूपच बेरड मुलगा होता. त्यामुळे नाईलाजास्तव तिनेपियुष च्या आई-बाबांना फोन करून येण्याविषयी विनंती केली होती.

मीटिंगमध्ये पियुष ची फक्त आई. आली ,ते पण उशिरा.
दिप्ती इतर पालकांशी बोलत होती
मधेच येऊन “मॅडम मी प्रियांका’, आपल्या केसांना झटका देत ती बाई म्हणाली.मी जरा घाईत आहे.
दिप्ती ने नजर वर केली अतिशय भडक मेकअप शरीराला न शोभणारा ड्रेस हातात ली किल्ली नाचवत तीम्हणाली.. ‘काय केलं माझ्या पियुष ने?’
‘एक मिनिट मॅडम ह्या समोर बसलेल्या सानेंशी बोलते आहे आपण प्लीज बसा’बाजूच्या खुर्ची कडे इशारा करत दिप्ती म्हणाली.
जरा नाराजीने ती बसली. मधे मधे फोन वर कोणाशी तरी जोरात बोलत होती.
—----------------------------------------------क्रमश:

______________________________
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा