Login

वड्याचा तेल वांग्यावर(पनिशमेंट) भाग दोन

स्टाफ मध्ये मुलं आणि पालक यावर जोरात चर्चा चालली होती


पनिशमेंट भाग दोन

दिप्ती ने असे म्हणताच जरा नाराजीने पियूष ची आई बसली. मधे मधे फोन वर कोणाशी तरी जोरात बोलत होती.
‘मॅडम ,प्लीज थोड बाहेर जाऊन बोला ना तशी ती बडबडत बाहेर गेली
.पाच मिनिटांनी पियूष ची आई आत आली तो पर्यंत साने बाई गेल्या होत्या व दिप्ती रिकामीच बसली होती..

‘या मॅम ‘

‘हां काय तक्रार आहे? पटकन सांगा मला जास्त वेळ नाही.’
दिप्ती ने पियूष कसा वागतो ते सांगितले व प्रगती पुस्तक दाखवलं. बर्याच विषयात कमी मार्क आहे खरं तर मुळात हुषार –दिप्ती ला पूर्ण बोलू न देता पियुष ची आई म्हणाली” मग तुम्ही लक्ष देत जा जरा त्याच्याकडे.”

“आम्ही लक्ष देतो पण घरी थोडा अभ्यास—”

“घरी वेळ कोणाला आहे ?मी त्याला ट्युशन लावूनच देते आजपासून, तुम्ही शाळेमध्ये बोलावून उगाचच आम्हा पेरेंट्स न त्रास देता.

प्रिन्सिपल मॅडम समोर मग त्यांच्याशी बोलणं करत दिप्ती ने व्यवस्थित तक्रार केली पण त्या बाईंना त्याच्या वागण्याविषयी काहीच वाटलं नव्हतं . त्या त्याला पाठीशी घालत होत्या.

_मीटिंग नंतर स्टाफ रुममध्ये दिप्ती पोहोचली तेव्हा स्टाफ मध्ये मुलं आणि पालक यावर जोरात चर्चा चालली होती.
वयस्क असलेल्या शर्मा सरांना आयतच फावलं "अरे आजकालचे आई बाप मुलांना फारच डोक्यावर बसवतात. आमच्या काळात मुलांना शाळेत फटके मारत , शाळेतून तक्रार आली की घरी आई वडील ही कुटुन काढत. पण आजकाल टिचर्स नी हात लावलेला चालत नाही, काल पेपर मध्ये न्युज होती एका टिचर नी केस कापून यायला सांगितले मुलांनी चाकूने हल्ला केला त्यांच्या वर”,.वगैरे वगैरे .

त्यांचे बोलणे ऐकून सरदेसाई मॅडम पण म्हणाल्या ‘अहो आजकाल एक एकच अपत्य असतं त्यामुळे अति लाडाने ही मुले बिघडतात अशा मुलांना आधीपासूनच वळण लावायला हवे.
गप्पा चा ओघ वेगळे च वळण घेऊ लागला.

काही जणांना पालक कसे बिघडलेले आहेत विशेषतः आई, आई ही कशी बिघडलेली असते ती मुलांकडे लक्ष देत नाही वगैरे, आणि काही जणांना मुलं आजकाल किती बिघडली आहे टीव्ही मोबाईल मुळे यावर वादविवाद चर्चा सुरू झाल्या.
ह्या सगळ्या चर्चा सत्रात चा परिणाम दिप्ती ला उगाचच आपण ही कुठेतरी चुकत नाही न असं वाटू लागलं….
क्रमशः