वाफेवरचे साबुदाणा पापड
साहित्य - पावकीलो साबुदाणा, पाव चमचा मीठ, तेल गरजेनुसार.
कृती - साबुदाणा चांगला दोनदा पाण्याने धुवून घ्यायचा आणि नंतर थोड पाणी घालून नेहेमीप्रमाणे भिजत घालून ठेवायचा जसे आपण खिचडी करायला भिजवतो तसा. शक्यतो रात्रीच साबुदाणा भिजवावा म्हणजे छान मऊ भिजतो. आता सकाळी साबुदाणा चांगला भिजल्यावर त्यात चवीप्रमाणे मीठ घालून एकत्र करून घ्यायचं. आता इडली पात्रात अगदी थोडे तेल लावून घ्यायचे आणि मग बरोबर त्या गोलात साबुदाणा पसरवून घालायचा. जास्त घालायचा नाही अगदी एकेरी लेयर घालायची म्हणजे साबुदाणा चांगला वाफवून निघतो आणि कच्चा राहत नाही. आता इडली पात्रात खाली पाणी घालून मग त्यात एक एक स्टँड ठेवायचे आणि चार ते पाच मिनिटे वाफवून घ्यायचे. साबुदाणा पापड वाफवून झाल्यावर सिलिकॉन स्प्याचुला किंवा मग स्टीलच्या गोलाकार चमच्याला तेल लावून पापड अगदी अलगद काढून घ्यायचा. नंतर एक एक पापड प्लास्टिक कागदावर वाळत घालायचे. दोन दिवस चांगले उन्हात वाळल्यावर डब्यात साठवून ठेवायचे. उपवासाला खायला हे साबुदाणा पापड खूप छान लागतात.
आहे की नाही अगदी सोपी रेसिपी. रेसिपी माझी आणि किचन तुमचे. आवडल्यास कमेंट आणि लाईक नक्की करा.
धन्यवाद.
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा