वहिनीचे प्रेम
शुभदा येताच निर्मिती लगेच उठली आणि शुभदाला म्हणाली ,"काय घेणार ,मी चहा घेते ,तुम्हाला काय ठेवू चहा की कॉफी ठेवू ."
निर्मिती त्यांची वाट बघत होती ,सकाळपासून ती अगदी जीवओतून घरातील पसारा आवरत होती ,घर साफ करत होती..तिला सगळे कसे सुटसुटीत हवे असते..तिला जरा ही पसारा नको असतो..म्हणते मी अगदी आळशीपणा करते..ह्या विचारात ती धावतपळत सगळे नीट नेटके करत होती.. छोट्या रिद्धीला मस्त छान वहिणीनेच दिलेला फ्रॉक घातला होता.. आणि तिने वहिनीने दिलेला ड्रेस घातला होता.
"आज किती भारी दिसत आहेस ग निर्मिती अगदी नजर नको लागायला माझीच तुला ,आणि पिल्लू तर किती गोड दिसत आहे ह्या फ्रॉक मध्ये..अगदी परी..आईवर गेली आहे..फक्त आईच्या रागाचा गुण घेऊ नये म्हणजे मिळवले.." शुभदा म्हणाली
ती समोर बसली होती ,थोडे अंतर मुद्दाम ठेवून लांब बसूनच गप्पा मारू उगाच कश्याला जवळीक हवी ,म्हणून निर्मिती अगदी अंतर ठेवून बसली ,होती आणि शुभदा तिचे अंतर कमी न करता ती ही लांब सोफ्यावर दुसऱ्या कडेला बसली होती..
सगळे औपचारिक नाते निभवावे ,फार काही हुरळून जाऊ नये म्हणत निर्मिती तितकेच बोलत जितके शुभदा प्रश्न विचारत ,निर्मितीने आपल्या रिद्धीला शुभदाच्या हातात ठेवले...
"घ्या पहा जरा जवळ घेऊन तुमची रिद्धी ,तिला कळायला हवे ना आपले कोण ते.."
"अशी लगेच कशी ओळखेल ती मी कोण ?? माझ्याशी तिचे नाते काय.? तिच्या आईशी माझे नाते काय..? किती जवळचे ऋणानुबंध आहेत हे कळेल हळूहळू इतकी घाई काय..? आईलाच अजून कळले नाही आपले नाते काय ते..? मग ती तर लहानच आहे..! ह्या गाठी उलगडायला शिकेल आणि कश्याला असतात नात्यांच्या गाठी हे ही कळेल ,नाहीतर काही लोकांना उगाच वाटत असते नात्यात गाठ निर्माण झाली म्हणून..? आणि किती वर्षे होऊ दे ते तसेच अंतर ठेवूनच रहातात बघ निर्मिती..तर मी छोट्या रिद्धीकडून काय अपेक्षा करू.."
आता निर्मिती हळूहळू हळूहळू शुभदाचा जवळ येत होती ,आणि तितक्यात ती म्हणाली ,"असे बरे समजणार नाही तिला तुझे नाते ,तिला नाही समजले तर मी आहे ना तिला सांगायला ,ही तुझी मामी आहे..तिने तुझ्यासाठी किती कष्ट घेतले आहे.. तू व्हावी म्हणून किती मंदिराचे उंबरे झिजवले आहेत..तिची आई वेडी होती म्हणून बऱ्याचदा तिला आपल्या ह्या महत्वाच्या प्रेमळ नात्याची किंमत नाही कळली..पण आज कळली ती किंमत..वहिनी मी चुकत गेले तेव्हा तू समजवत गेली, पण तेव्हा वाटले की तू मुद्दामच माझ्या मध्ये आणि दादा मध्ये भांडण लावत आहेस...तुला मी कधीच आमच्या घरातली समजले नाही..तुझी स्तुती केली गेली तर मी आईला ही भांडायचे...तिला म्हणायचे तू माझी आई नाहीस तू वहिनीची आई शोभतेस... आणि आता वाटते आई तर आई होतीच पण तूच माझी खरी आई शोभतेस... किती करतेस माझ्या साठी..आयुष्य कमी पडेल तुझे ऋण फेडायचे ठरवले तर..."
आता कुठे हळूहळू दोघींमधले अंतर कमी केले होते निर्मितीने ..राग होता अगदी आजपर्यंत पण जेव्हा तिला दादाचा फोन आला ,तेव्हा त्याने सांगितले होते ,वहिनीला बोलून जाशील आणि सत्य कळल्यावर तूच कोसळून पडशील..म्हणून तुला तिचे काही सत्य सांगवावे वाटत आहे...ती म्हंटली होती निर्मितीला ह्यातले काही सांगायचे नाही..कारण मी काही उपकार केले नाहीत... तरी मी सांगून ठेवतो..मला वारंवार तुझ्याकडून तिचा झालेला अपमान सहन होता होत नाही..आता तुलाच बाजुन सांभाळून घ्यायची आहे, त्यात तिची आई गेल्यानंतर ती अजूनच पोरकी झाली आहे.. आता तिला तू थोडी तरी माया द्यायची आहेस.
भावाचा फोन आल्यावर निर्मिती खरंच सत्य ऐकल्यावर कोसळली होती..तिने अगदी स्वतःच्या तोंडात ही मारून घेतले होते ,रडत होती पण आता ही वेळ आपल्याला सांभाळून घ्यायची आहे म्हणून ती सावरली होती..आपली वहिनी येणार म्हणून तिच्या साठी तयार झाली होती.. तिला आईची थोडी तरी माया द्यायची होती ..
"निर्मिती काय हे ,अग तू मला तशीच हवी आहेस अगदी रागवणारी रुसणारी..माझी अल्लड ननंद हवी आहे.."
"नाही वहिनी मला आता तुझी आई व्हायचे आहे..हे अल्लड पण आता बाजूला ठेवून होईल तितकी तुझी आई व्हायचे आहे.."
इकडे शुभदा तिच्या रिद्धीला हातात जोजवत म्हणाली ,मला आता हिचा सगळा लाड पुरवायचा आहे..आता हिचा रुसवा फुगवा काढायचा आहे... हिचे बाल हट्ट पुरवायचे आहे ..हो ना निर्मिती मम्मी.!!
निर्मितीला वहिनीच्या चेहऱ्यावर आलेले हसू आणि आंनद पाहून भरून पावल्या सारखे वाटत होते.. निदान थोडे दुःख कमी करेल माझी रिद्धी मामीचे..
©®अनुराधा आंधळे पालवे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा