वैखरी एक प्रेमकथा भाग-१४
विषय - प्रेमकथा
उपविषय - राज्यस्तरिय करंडक कथामालिका
टीम - अमरावती .
पूर्वांध : आपण भाग -१३ मध्ये बघीतलय की, वैखरी वसंत आतूचा मुलगा आहे की नाही हे कसे कळेल ? या विचारात असते . वसंत आतूचा मुलगा असावा असे बरेच परिस्थितीजन्य पुरावे तिला सांगतात पण तो अंदाज खरा की नाही ह्या विचारात ती वसंतचे स्वप्न बघते . कॉलेजमध्येही तिचं बेचैन मन लागत नाही पण सेमीस्टर तोंडावर असतं त्यामुळं स्वराकडून तातडीने नोट्स घेवून येते…
आई : " हो . ये, थोड्या वेळानी हॉलमध्ये ."
वैखरी : "हो .आई पण काय गं एवढं
महत्वाचं . माझं काही चुकलं का गं ? बाबा रागात तर नाहीत ना ? ".
आई : "नाही गं . छान खूश दिसत आहेत तुझे बाबा . आमचं शहाणं बाळ तू. आजवर तुझा काही त्रास झाला का कुणाला ?. एवढं समजदार बाळ कसं चुकेल ? ".
तरी तर म्हटलं वसंत बाबत मी कुणाकडेच बोलले नाही . तर बाबांना कसं कळालं ? "चोराच्या मनात चांदणं " म्हणतात ते खरंच
आहे …. ," वैखरी मनाशीच पुटपुटली .
वैखरी : "बाबा छान सुरु आहे."
बाबा : "तो तर छानच असणार कॉलेज टॉपर आहे आमची मुलगी . आमचा अभिमान आहेस बेटा तू ".
आई : "अहो, वैखरीशी तुम्हाला काही महत्त्वाचं बोलायचं होतं ना ?".
बाबा : " हो तेही बोलणारच . कामाच्या व्यस्ततेमुळे आम्ही आमच्या एकुलत्या एक लाडक्या मुलीशीही दररोज मनमोकळ्या गप्पा मारू शकत नाही . आज वेळ मिळाला तर बोलू दया थोडं . "
वैखरी : "तसं नाही बाबा . तुम्हाला बिजिनेस मध्ये चांगला हेल्पिंग हॅड असता तर वेळ मिळाला
असता .तुम्ही पण एकटेच सांभाळता ना बिजिनेस . कसं शक्य आहे घरी वेळ देणं . जो वेळ देता तो क्वालीटी टाईम असतो यातच आम्हाला आनंद आहे . माझं सेमीस्टर संपलं की मी तुमच्या सोबतीला बिजिनेस जॉईन करते . तुम्हाला थोडा आराम
मिळेल . चालेल ना बाबा ? ".
बाबा : "चालेल . का नाही . पण तुला तुझ्याही घरचा बिझिनेस सांभाळवा लागेल ना ." .
वैखरी : "असं काय बोलताय बाबा ? हेच माझं घर आणि आपला बिझिनेस माझा बिझिनेस ."
बाबा : " हो बाळा . हे घर आणि बिजिनेस तुझेच आहेत . मुली भाग्यवान असतात मुलींना
दोन -दोन घरं असतात . एक सासरचं आणि एक माहेरचं अशी दोन घरे".
वैखरी : "आई बघ गं बाबा कसे बोलतात ."
आई : " अगदी बरोबर बोललेत तुझे बाबा ."
वैखरी : "आई तू पण…. ?"
आई : "हो बाळ . जगाची रीतचं ती. लाडाकोडात आईबाबांकडे लेक लहानाची मोठी करायची . समजदार झाली की तिनी सासरची जबाबदारी सांभाळायची ."
वैखरी : "वाईटच आहे ही रीत ".
बाबा : असं बोलून कसं चालेल बेटा . बघ पाटील काकांची खूप इच्छा आहे गं . मला सतत
म्हणतात ,"तुमची वैखरी खूप समजदार आणि हुशार मुलगी आहे . तुमची हरकत नसेल तर आम्हाला सुन म्हणून हवी . आम्हाला मुलगी नाही तिच आमची सून अन् तिच आमची . मुलगी ."
आई : "आशय बाबत बोलताय का तुम्ही ? " .
बाबा : हो .आशय, पाटील साहेबांचा एकुलता एक मुलगा . खूप हुशार आहे. कुठलही व्यसन नाही . संपत्तीचा गर्व नाही . असा मुलगा मिळणे कठीणच . शांत आणि सयंमी मुलगा आहे आशय . पाटील साहेबांचा बिजिनेस कमी वेळात उंचीवर नेवून ठेवलाय आशयनी . मुंबईतल्या मुंबईत राहिल आपली वैखरी . आपल्या डोळ्यासमोर . आठवण आली की जायचं भेटायला ."
आई : "काय गं वैखरी . तुझं काय मत आहे बोल न काहीतरी ." तू ओळखतेस ना आशयला ".
वैखरी : " हो . हो म्हणजे मी ओळखते आशयला . बाबांसोबत एकदा गेलेली आहे मी आशयच्या ऑफिसला ."
आई : " कसा वाटला ?"
वैखरी : " मी त्या दृष्टीने त्याच्याकडे बघीतले नाही . तसंही सध्या मला माझ्या परिक्षेचा अभ्यास महत्त्वाचा आहे . एक एक दिवस महत्त्वाचा आहे
अभ्यासासाठी ."
" आशय " नावाचं . कसं हाकलून लावायचं या संकटाला ?
वैखरी विचारात असतांना आतू वैखरीला आवाज देते….
आतू : " वैखरी, चल मला तुझ्यासोबत काम आहे . दादा येवू का आम्ही ?".
बाबा : हो, हो मलासुद्धा एक मिटींग आहे.
मी सुद्धा निघतो . आज रात्रीच्या जेवणाला वाट बघू नका . डिनर बाहेरच होईल माझं .
वैखरी : "आई तू ? अगं समजावणं तू बाबांना नाहीतर माझं लग्न लावून टाकतील ते ".
आई : का ? तुझे बाबा जे करतील ते तुझ्या भल्यासाठीच करतील हे लक्षात असू दे वैखरी .
लग्न आज ना उद्या करावचं लागणार . तुझी डिग्री होईपर्यत थांबणार आहेत. आणखी काय समजावायचं बाबांना . तुझ्या बाबांनी योग्यच विचार केला . मुलगाही अतिउत्तम शोधला . आणखी काय हवं . वैखरी एक गोष्ट तू समजून घे.विवाहसंस्था ही कुटुंब संस्थेचा पाया आहे . आणि कुटुंबसंस्था समाजाचा पाया . समाज मिळून देश बनतो म्हणजेच काय राष्ट्राची बांधणी कुटुंबातून होत असते . कुटुंबसंस्था विविध सामाजिक संस्थास्तरावर काम करत असते .
सामाजीकरणाचे कुटुंबसंस्था ही केंद्रबिंदू आहे . देशाचा सुजाण, संस्कारी नागरीक कुंटुंब संस्थेत
घडतो . विवाहसंस्थेवर समाजाची संरचना अवलंबून आहे. आदर्श विवाहसंस्थेमुळे आज आपली भारतीय संस्कृती टिकून आहे. विवाह म्हणजे काही चूकीची बाब नाही . योग्य वेळ साधूनच बाबा तुझा विवाह करण्याचं ठरवत आहेत त्यामुळे बाबांना समजावून सांगण्या सारखं काही नाही वैखरी ."
आई वैखरीला विवाहसंस्थेचं महत्त्व सांगून किचनमध्ये निघून जाते….
एखादयानी नाही केल तर ? एखाद्या व्यक्तीची इच्छा नसेल तर जबरदस्तीनी मर्जीविरुद्ध लग्न लावून द्यायचं का?
झालयं . मी केवळ समाजाच्या नजरेत बिनालग्नाची आहे हे तुलाही चांगलं ठावूक आहे."
वैखरी एक प्रेमकथा भाग-१५
करा . न आवडल्यास माफ करा .
टीम - अमरावती .