विषय - प्रेमकथा
उपविषय - राज्यस्तरिय करंडक कथामालिका
टीम - अमरावती .
वैखरी : " आतू , बाबा गेलेत ना ऑफीसला ?".
आतू : " हो गं . का विचारतेस ?"
वैखरी : " आतू आईच्या रुममध्ये चल नं . मला तुला व आईला काही महत्त्वाचं सांगायचं आहे."
आतू : " आता काय आणखी नवीन ,की वसंत बाबत सांगतेस आईला ."
वैखरी : " वसंत बाबतच आहे पण आजवर मी तुझ्याही पासून लपवलय ते सांगायचं आहे ."
आतू : " म्हणजे ? तू मला तुझी व वसंतची अर्धवट कहाणी सांगीतली की काय ?".
वैखरी : "आतू चल नं आईच्या रुममध्ये इथेच विचारशील का सर्व ."
वैखरी व आतू आईच्या रुममध्ये जातात .
आई : " अरे आतोभाचीची स्वारी आज इकडे . काय विशेष ?."
वैखरी : " हो आई विशेषच आहे . खूप महत्त्वाचं बोलायचं आहे मला तुम्हा दोघींशी . आतू तू धिरानी घेशील तर सांगते . तसंही मला आजवर सांगू की नको होत होतं . मला वाटतं माझ्या मनातील शंका मी सांगीतलेली योग्य राहिल म्हणून तुम्हा दोघींना सांगते . त्यानंतर तुम्ही दोघी योग्य वेळ पाहून बाबांना ".
आतू : " वैखरी सांग पटकन असं ताणून का
धरतेस ?."
वैखरी : " आई तुला एकूण थोडा धक्का बसेल पण मला सांगणं जरूरी आहे . बाबा माझ्या लग्नाची घाई करत आहेत . उगीच लग्न जुळवून तुटल्यावर पाटील कुटुबियांशी सबंध बिघडतील . समाजात माहिती होईल त्याआधी मी काय म्हणते, ते समजून घे प्लीज . हे बघ आई मला आशयशी लग्न करायचे नाही . मला वसंत नावाचा मुलगा आवडतो. जो अमेरिकेला मोठ्या कंपनीत जनरल मॅनेजर या पदावर आहे. खूप हुशार आहे . कवी आहे लेखक आहे. त्याचे पुस्तकेही प्रकाशित झालीत. आयआयटी टॉपर असलेल्या वसंतला मी पहिल्यांदा एकसारखं बघीतलं कारण तो हुबेहुब आतूच्या चेहर्यावर दिसला . …
आतू : "काय ? तो माझा मुलगा तर नाही ?"
वैखरी : "आतू तू भावनांना आवर . त्याकारणानी मी आजवर सांगीतलं नाही . माझं पूर्ण बोलणं झाल्यावर तू तुझ्या शंका व्यक्त करणं प्लीज ."
आई : " खरंच तो आतूसारखा दिसतो ?" तू जे सांगतेस ते माझ्यासाठी धक्कादायक आहे
वैखरी . तू आणि प्रेम मला विश्वासच बसत
नाही . बाबांना कळलं तर कसे रिअॅक्ट होतील ह्या कल्पनेनं मला आजच टेन्शन आलयं ."
आई : " काय ? वसंत अनाथ आहे "
आतू : " झालं का तुझं बोलून ? वैखरी तू मला इतके दिवस का नाही सांगीतलं . वसंत माझा मुलगा असेल का गं ? माझ्यासारखा हुबेहुब दिसतो का? बघ त्याच्या नाकावर तिळ आहे..आठवतं मला… माझ्याजवळून बाबांनी त्याला अनाथालयात नेले त्याआधी मी त्याला नजर भरून बघीतले व त्याचे ते बालरूप माझ्या
हदयात आजही तसेच जपले… त्याच्या उजव्या गालावर खळी आहे अगं… त्याला जन्मतःच खूप काळेभोर कुरळे केस होते म्हणजे आजही त्याचे केस कुरळे असणार… आहेत का गं वसंतचे केस कुरळे…. आणि हो त्याच्या उजव्या खांदयावर एक काळा डाग आहे…. त्यावरून आपण त्याला ओळखू शकू की तो माझा मुलगा आहे की नाही ? सांग नं वैखरी…..
वैखरी : "हो आतू तू जसं वर्णन करतेस तसाच आहे वसंत .तू ज्या दिवशी मला तुझ्या बाळाचं वर्णन सांगीतलं त्यावेळीच वसंतला पाहून मला जी शंका होती ती खात्रीत परिवर्तीत झाली तरीही एका चेहर्याचे सात व्यक्ती असतात जगात तूच बोलली होती म्हणून मला शंका होती . आता सर्व गोष्टी ऐकूण मलाही वाटायला लागलं की वसंत तुझा मुलगा असू शकतो . त्यासाठी तुझ्या मुलाला कोणत्या अनाथालयात ठेवले होते हे माहिती हवं . तरच वसंत तुझा मुलगा आहे की नाही कळेल."
आतू : " वैखरी मला वसंतला भेटायचं आहे भेटल्यावर मी ओळखू शकते तो माझा मुलगा आहे की नाही . आईचं हदय मुलाला ओळखण्यात चुकणार नाही गं ."
वैखरी एक प्रेमकथा भाग -२६
धन्यवाद !
©® ऍड. नीता प्रफुल्ल कचवे .
टीम - अमरावती .