कथेचे शीर्षक - वैखरी एक प्रेमकथा भाग-७
कथेचा विषय- प्रेमकथा
कथेचा उपविषय- राज्यस्तरिय करंडक कथामालिका
टीम - अमरावती .
पूर्वाध : भाग ६ मध्ये आपण बघीतलं की सुहित आणि वसंतला लठ्ठ पगाराची बंगलोरला नोकरी
मिळाली . नोकरीला रुजू होण्याआधी दोघेही सुहितच्या घरी आलेत . नोकरीचा आनंद म्हणून आईबाबा स्वरानी छानशी छोटीशी अभिनंदन पार्टी अरेंज केली होती……..
सुहितचे आईवडिल दोघांवरही खुश असतात .
"घे काय म्हणतात काकाजी बघ ", वसंत म्हणतो
बाबा: "हॅलो बेटा ."
सुहित: " हॅलो बाबा ".
बाबा : "कसे आहात तुम्ही दोघ " .
सुहित : "मजेत आहोत बाबा ; पण तुम्हा सगळ्यांची आठवण येते . आई कशी आहे बाबा ? ".
बाबा : "मजेत आहे . वसंत कुठे आहे."
सुहित : "बाजुलाच बसलाय माझ्या ".
बाबा : "फोन स्पीकरवर ठेव . मला तुम्हा दोघांशीही बोलायचं आहे ."
वसंत : "नमस्कार काका ".
बाबा : "वसंत बेटा कसा सुरु आहे जॉब ".
वसंत : " मस्त सुरु आहे काका . कार्पोरेट सेक्टरचा बराच अनुभव मिळत आहे . नवनवीन ज्ञान मिळत आहे आणखी दोन पेटेंटची तयारी सुरु आहे ".
बाबा : "गुड व्हेरी गुड . मला विश्वास आहे तुम्ही दोघेही या क्षेत्रात खूप मोठे होणार आहात .माझं असं म्हणणं होतं की दोन वर्षात दोघांनीही कार्पोरेट क्षेत्राचा बराच अनुभव घेतला . आता वेळ आहे तुम्ही दोघांनी आपला बिझिनेस सांभाळायची . काय मत आहे तुम्हा दोघांचं याबाबत ? ."
सुहित : बाबा कंपनीकडून दोघांनाही अमेरिकेला जाण्याची संधी आहे. काहीकाळ तिथलाही अनुभव घ्यावा अशी आम्हा दोघांचीही इच्छा आहे. अर्थातच तुमची परवाणगी असेल तरच आम्ही तसं करू नाहीतर तुम्ही म्हणाल तसं करू .
बाबा : " अरे वा! छानच विचार आहे . काही हरकत नाही . मी अजून टनाटन आहे. सांभाळू शकतो बिझिनेस . सहा सात वर्षानंतर ही धूरा तुम्हालाच सांभाळायची आहे . नाहीतर अमेरीकेहून यायची इच्छाच होणार नाही . असं नको व्हायला ".
वसंत : "नाही नाही काका . असं होणार नाही . आपला बिजीनेस सर्व देशात चालेल तोपर्यंत तुम्ही म्हणत असाल तर आताच आम्ही अमेरिकेला जाणार नाही . तुमच्या शब्दांबाहेर आम्ही दोघेही नाही ."
वसंत : " हो की नाही रे सुहित ".
सुहित : " हो बाबा . तुम्ही म्हणाल तसं ."
बाबा : "नाही नाही . तुम्ही दोघेही जबाबदार आहात योग्यच विचार करता . अनुभवानी समृद्ध झालात तर आपला बिझीनेस कमी वेळात वेग पकडेल मला खात्री आहे ."
वसंत : "काका आमच्यावर विश्वास टाकून तुम्ही आमचा आत्मविश्वास वाढवला . धन्यवाद काका ."
सुहित : " हो बाबा वसंत बरोबर बोलतोय ".
बाबा : "बरं ऑल दी बेस्ट . चला शुभरात्री ".
सुहित व वसंत : "शुभरात्री !"
कशासाठी ?", सुहित म्हणाला .
वैखरीवर ", सुहित म्हणाला .
"अरे वा! प्यार का इजहार . माझ्याजवळ केल्यापेक्षा हे वैखरीला सांग ", सुहित म्हणाला .
"अचानक असं विचारलं तर ती सुद्धा प्रतिप्रश्न करेल ना की का विचारतोस ?", सुहित म्हणाला
स्वरा : "मजेत आहे . तू आणि वसंतदादा कसे
आहात ?".
सुहित : "मजेत आहोत .स्वरा तुझा अभ्यास कसा सुरु आहे ."
स्वरा : " छान सुरु आहे दादा . मी आणि वैखरी सोबत अभ्यास करतो . वैखरी अभ्यासात खूप हुशार आहे . अगदी वसंत दादासारखी .मदत करते वैखरी मला अभ्यासात अडचण आली तर ."
सुहित : " अरे वा! छानच . तू वैखरीकडे जातेस का गं कधी कधी अभ्यासाला . "
स्वरा : "नाही दादा . मी अजूनही वैखरीकडे गेलेले नाही . तिनी कधी बोलवलाही नाही ."
सुहित : असं कसं ? एवढ्या पक्क्या मैत्रीणी तुम्ही. तरी तू वैखरीचं घरही बघीतलं नाहीस .
स्वरा :" हो नं ती कधी घरी ये वगैरे म्हणनाही . ती घरी न्यायचं टाळते . तिच्या घरी खूप स्ट्रीक्ट वातावरण असावं असा माझा अंदाज आहे ."
सुहित :" हो गं . जरा वेगळीच आहे वैखरी . इंजिनिअरिंगची मुलगी अन् मुलांशी मैत्री करायला आवडत नाही . कॉलेजमध्येही मुलांशी बोलत नाही का ?"
स्वरा : "नाही फारशी नाही बोलत . कामाशी काम ठेवते. मैत्री वगैरे नाही . तशी स्वभावानी बोलकी आहे पण मुलांशी वागतांना एक लक्षणरेषा आखून घेतल्यासारखं तिचं वागणं आहे ."
सुहित : "घरी कोणकोण असते वैखरीच्या ".
स्वरा : "आईबाबा, आत्या व वैखरी ".
सुहित : "बाबा काय करतात वैखरीचे?"
स्वरा : " मोठे बिझीनेसमॅन आहेत . खेड्यावर भरपूर शेती आहे तिच्याकडे ."
सुहित : "आडनाव काय गं वैखरीचं ?".
स्वरा : "देशमूख ."
सुहित : "अच्छा !"
स्वरा : "तू का विचारतोस ?"
सुहित : "अगं तिचं वागणं वेगळचं आहे म्हणून काय सस्पेंन्स पर्सनालिटी आहे म्हणून उत्सुकतेनी विचारलं त्यात तुझी खास मैत्रीण . माझी लाडकी बहिण कुणासोबत राहते माहिती नको का ठेवायला ."
सुहित : "ओके . चल बाय . टेक केअर . आम्ही दोघं येणार आहोतच घरी एवढ्यात ."
स्वरा : "ओके बाय दादा . या वाट बघतोय आम्ही सर्वजण तुमची ."
क्रमशः
वैखरी एक प्रेमकथा भाग-८
न आवडल्यास माफ करा .
टीम- अमरावती .