वैर भाग १५ ( अंतिम)

सख्खा भाऊ पक्का वैरी
वैर भाग १५ (अंतिम)


अमर ऋषी यांच्या रूमचा दरवाजा वाजवणार तोच वर्षांचे बोलणे त्याच्या कानावर पडले.

“ऋषी!तू अगदी योग्य निर्णय घेतला. खरच आपला मुलगा कधीच सुधारणार नाही.आता तर त्याने त्या मुलीशी लग्न करून कहरच केला आहे. ”

“ हो, मी खूप दिवसापासून त्याच्यावर लक्ष ठेऊन होतो.ती मुलगी आपल्या अमरवर अजिबात प्रेम करत नाही.तिचं खरे प्रेम आपल्या प्रॉपर्टी वर आहे. अमरशी लग्न झालं की ही सगळी प्रॉपर्टी तिला सहज मिळू शकते अस वाटलं असेल तिला पण नाही.”

आई बाबांचे बोलणे अमरला काही अंशी पटत होते. खरच कृतिका आपल्या वर नाही आपल्या पैशावर प्रेम करत असेल का? नाहीतर काय आज लग्नाची पहिली रात्र असतानाही तिने प्रॉपर्टी पेपर वर सही करायला मला पाठवलं त्यावरून तर हेच सिद्ध होतं. तो मनाशीच बोलत होता.तोच पुन्हा आई बाबाचे शब्द कानावर पडले.

“ऋषी बरं झालं आपण अनिच्या नावावर सर्व प्रॉपर्टी आधीच करून टाकली आहे.आता कोणीही आपले काहीच बिघडवणार नाही”

आईच बोलणं ऐकताच अमर रागाने लाल झाला. आपण या सगळ्या प्रॉपर्टीचे वारस आहोत.आणि तरीही जाणून बुजून आपल्या आई वडिलांनी या सगळ्या प्रॉपर्टी मधून आपल्याला बेदखल करावं हे त्याला अजिबात मान्य नव्हतं. आपणच आहोत या सर्व संपत्तीचे मालक आणि आपलाच कब्जा असणार..त्याने मनाशी निश्चय केला अन् हातात असलेले कागद हाताने चुर्गळून टाकले.

अमर अतिशय रागात होता.तो वर आपल्या रूम मध्ये न जाता घराबाहेर पडला.त्याने रागाच्या भरात ऋषी यांच्या गाडीचा ब्रेक फेल केला.कारण आपलेच जन्मदाते आपल्याच माघारी आपल्याविरुद्ध इतके मोठे षडयंत्र रचून आहेत ह्या गोष्टीने त्याच्या मेंदूला आरपार भेदल होतं. आता या गोष्टीचा पुरेपूर सुड उगवणार होता तो.

दुसरा दिवस उजाडला. रोजचा दिनक्रम चालू झाला. नाष्टा करण्यासाठी अनन्या, कृतिका,अमर तिघेही हजर होते. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. अनन्या तिच्या दादूवर नाराज होती.तर कृतिका मुद्दाम बोलणे टाळत होती. आणि अमर तो तर आपला बाप कधी येतोय आणि गाडी घेऊन ढगात जातोय याच विचारत मग्न होऊन गेला होता.

वर्षां आणि ऋषी सोबतच खाली आले. शामु त्यांची बॅग घेऊन खाली येत होता. तिघांनाही आश्चर्य वाटलं.कारण आई बाबा बाहेर का आहेत? आणि त्यांनी मला कसं काय सांगितलं नाही? अनन्या विचार करू लागलेली. तर अमर एकदम खुश झालेला.कारण आज एका दगडात दोन पक्षी अलगद सापडले होते. नंतर काय अनन्या एकटी राहील.आणि तिला आपल्या वाटेतून बाजूला करायला कितीसा वेळ लागणार होता. अमर सुडाणे पेटला होता. जन्मदाते आई बाप यांना पूर्णपणे विसरला होता तो.

“ अनि! आम्ही दोघेही तुझ्या मामाकडे जात आहोत.रात्रीच मामाचा फोन आला होता त्यांची तब्बेत बिघडली आहे.” अनन्याला वर्षां बोलल्या. त्यांनी अमरशी बोलणे आताही टाळले. त्यामुळे आधीच रागाने भडकलेला अमरच्या मनात आग धुमसत होती.

“आई मला सांगायचं ना. मीही आले असते मामाला भेटायला.”

“ अनि! तुझ्या दादाचं नुकताच लग्न झालंय. त्यामुळे काही दिवस ऑफिस तुझ्या खांद्यावर देत आहे.दादा हनिमून ट्रीप करून आल्यावर तू निवांत हो,” ऋषी बोलले तसे अमरला थोड वाईट वाटलं आपले बाबा आपला इतका विचार करतात.आणि आपण त्यांच्या जीवावर उठलो आहोत याचा त्याला पश्चातप होऊ लागला.


“हो बाबा सांभाळते कंपनी. तुम्ही सुखरूप जाऊन या.

“ऋषी काळजी घे स्वतः ची आणि माझ्या लेकीचीही.” पण ते आज कधी नव्हे ते अस का बोलत होते ते त्यांनाही समजत नव्हतं.

“हो बाबा तुम्ही निर्धास्त रहा” अमर खुनशी हसत बोलला.

“चला येतो आम्ही” ऋषी आणि वर्षां बाहेर जायला निघाले. ते दरवाजापर्यंत गेलेच असतील.की ऋषी नी अनन्याला हाक मारली.

“अनि बेटा!जरा इकडे ये ”

ऋषी अनन्याला घेऊन कार जवळ गेले. अन् त्यांनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला.

“बेटा आम्ही थोडे दिवस बाहेर आहोत.आता घराकडे कंपनीकडे जातीने पहायची जबाबदारी तुझी आहे. आमचा दोघांचाही तुझ्या दादूवर विश्वास नाहीय.आणि आम्ही परत येईस्तोवर काळजी घे स्वतः ची. अजून एक कोणतीही फाईल जाणीवपूर्वक वाचल्याशिवाय स्वाक्षरी करायची नाही. आणि तुझ्या वहिनींनी किंवा तुझ्या दादू ने कोणतेही पेपर साईन करायला दिले तर अजिबात त्यावर स्वाक्षरी करू नकोस ही माझी अगदी कळकळीची विनंती आहे अस समज..” ऋषी भरल्या डोळ्यांनी बोलत होते.

“काय बाबा थोड्या दिवसाचा तर प्रश्न आहे नका काळजी करू मी तुमच्या प्रत्येक शब्द पाळणार आहे..”

“गूड!”

“चल येतो आम्ही.”

दोघांनीही अनन्याचा निरोप घेतला अन् ते त्यांच्या प्रवासाला निघाले.


तीनच्या सुमारास अनन्याचा फोन वाजला. पलीकडून काहीतरी सांगितलं गेलं.अन् शॉक झाली. ऋषींच्या गाडीचा अपघात झाला होता.आणि दोघांची बॉडी घरी आणली जाणार होती.


असेच दुःखात तेराव झालं.अन् वकील घरी आले. मिस्टर कारखानीस यांनी आपले मृत्युपत्र तयार केलं होतं. सगळी प्रॉपर्टी त्यांनी अनन्याच्या ना केली होती. अमरला त्यांनी काहीच दिलं नव्हतं. त्यामुळे अनन्या शॉक झाली होती. जेंव्हा अनन्या प्रॉपर्टी स्वतः च्या सहीने अमरच्या नावावर करत नाही तोवर ती प्रॉपर्टी अमरला मिळू शकत नाही. आणि जात मिस अनन्या यानी भविष्यात स्वाक्षरी केलीच नाही तर सगळी प्रॉपर्टी धर्मादाय संस्थाना दिली जाऊ शकते. अस वकिलांनी सांगताच अमर भयंकर संतापला. अन् त्याने अनन्याला सही करून प्रॉपर्टी आपल्या नावे करायची विनंती केली पण अनन्या ने त्याला साफ नकार दिला.

आज पाच वर्ष होत आलेली. ती त्या एका खोलीतच बंदिस्त होती. रोज पोटासाठी याचना करत होती. एका तुकड्याची भीक ती रोज मागत होती.पण तिच्या घरची माणसं इतकी निर्दयी की, तिला त्या खोलीतून बाहेर काढणे सोडाच पण तिला एक भाकरी देणं ही त्यांना मान्य नव्हतं.

एखाद्या माणसाला अन्न,पाणी, निवारा या गोष्टीची आवश्यकता असते. पण, इथे तर सगळ उलट होतं.तिला निवारा होता.पण तो एक बंद खोलीचा कोंडमारा असलेला पिंजराच होता. या पिंजऱ्यात ती गेली पाच वर्ष दिवस कंठत होती. महत प्रयासाने एक एक क्षण ती सारत होती.

सुखाचे क्षण किती लवकर दुःखात लोटले जातात नाही का? एक क्षणाच्या सुखा पेक्षा आलेलं दुःख शत: पटीने अधिक असतं. त्या दुःखात माणूस इतका भरडला जातो की, त्याला जीवन जगणे मुश्कील होऊन जाते.

त्या बीचारीचा इतका काय अपराध होता.की तब्बल पाच वर्ष ती एका खोलीत बंदिस्त होती.का एका तुकड्याची भीक ती रोज मागत होती.


पोटासाठी भीक मागावी लागणं, तेही आपल्या सख्ख्या भावाकडून ज्याने कधीकाळी आपल्यावर जीवापाड माया केली होती. जरा जरी खरचटलं तरी ज्याच्या डोळ्यात पाणी यायचं.जरा हाताला भाजलं तरी गॅस बंद करून तो तिला बाजूला घेऊन जायचा.अन् आज एका खुर्चीला तिला रोज दोरखंडाने बांधताना त्याला जराही वाईट वाटलं नसेल का?


“दादा का असा वागतो आहेस तू? काय गुन्हा झाला रे..की त्या गुन्ह्याची शिक्षा तू माझा अतोनात छळ करून पूर्ण करून घेत आहेस? दादा तुझ्याच मनाने मी
आजपर्यंत जगत आले. भावाचा शब्द मी कधी मोडला नाही रे..तरीही तू तू तुझ्या लाडक्या बहिणीला का बंदिस्त केलं आहेस?”

रोज ती रडत रडत तिच्या दादावर अशा प्रश्नांची सरबत्ती करायची. तिच्या या वेदनादायी शब्दाचा त्याच्यावर काही एक परिणाम अजिबात व्हायचा नाही. उलट तिच्यावर हात उगारून तिला तो गप्प बसवायचा.अन् बंधू प्रेमाच्या हव्यासापायी ती मात्र त्याच्याकडून हवा तितका छळ सहन करायची.

कधी कधी हे असह्य व्हायचं अन् या कचाट्यातून मुक्त व्हायला ती देवाकडे मरण मागायची. अस म्हणतात देवाचं सगळीकडे बारीक लक्ष असतं मग या बिचाऱ्या माऊलीकडे तो दुर्लक्ष का करत होता.?


आणि व्हायचं तेच झालं आज तिची प्राणज्योत कायमची मालवली पण वडिलांच्या शब्दाचा तिनेअखेरच्या क्षणापर्यंत मान ठेवला.शेवटी अनन्याच्या मरणानंतर कारखानीसाची अख्खी प्रॉपर्टी धर्मादाय संस्थाच्या हाती गेली.

दुसऱ्या दिवशी टीव्हीवर एका बातमीने अख्ख्या मुंबईचे लक्ष वेधले होते.

“ उद्द्योगपती ऋषी कारखानीस यांच्या मोठ्या मुलाची नैराश्यातून आत्महत्या”


एका हॉटेलमध्ये कृतिका आणि विक्रांत एकमेकांना ड्रिंकचा ग्लास देत चिअर करत होते…एका स्रीच्या लोभांपाई एक सुखी कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं होतं..!

ही बातमी नेमकी खरी की खोटी याचे रहस्य अखेर गुलदस्त्यातच राहिले…!!!

समाप्त…