वैर भाग ५

सख्खा भाऊ पक्का वैरी
वैर भाग ५


पत्नीने दिलेल्या भक्कम आधार यामुळे ऋषी मनोमन आनंदी झाले.

आपल्या लेकीच्या नावावर सारी संपत्ती करून ते अमरला सुधरवणार होते.जेंव्हा अमर पूर्णपणे सुधारेल तेंव्हा अनन्या त्याला ती संपत्ती देऊ शकणार होती.जर अमर सुधारला नाही आणि अनन्याने स्वतःच्या सहमतीने स्वाक्षरी नाही केली तर ती सगळी संपत्ती सरकारजमा होणार होती.त्यावर अमरचा कोणताच हक्क असणार नव्हता.

सकाळी सकाळी अमरच्या फोनची रिंग वाजू लागली. रात्रभर प्रणय क्रीडा करून दमून भागून तो नुकताच झोपला होता. दोनदा त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.पण जेंव्हा तिसऱ्यांदा फोन वाजला तेंव्हा त्याने रागात फोन उचलला.


“ समोरचा व्यक्ती फोन उचलत नाही म्हणजे तो बिझी असू शकतो एवढं देखील कळत नाही का?” अमर रागातच नाव न पाहताच कडाडला.


“सर ss मी मी कृतिका सॉरी सर डिस्टर्ब केलं त्याबद्दल.” ती मुद्दाम आपण चुकल्याची अक्टिंग करत बोलली.

तिचा तो रडवेला आवाज ऐकून अमरला कसतरीच झालं.उगाचच आपण नाव न बघताच तिच्यावर ओरडलो.म्हणून तो स्वतः ला दोष देऊ लागला.

“मिसेस कृतिका तुम्ही ठीक आहात ना?आणि तुम्ही रडत का आहात?” ती इतकं सफाईदार ॲक्टीग करत होती की अमरला वाईट वाटणं अगदी साहजिक होतं.


“हो सर, माझे मिस्टर राजेश यांनी मला डिव्होर्स पेपर पाठवलेत. काय करू माझी काहीच चूक नाहीय सर.तरीही ते मला आपल्या आयुष्यातून काढून टाकणार बोलतात. मला ना मला ना काहीच सुचत नाही आहे. प्लीज तुम्ही इथे याल का. भीती वाटू लागली आहे मला प्लीज या ना!”

“मिसेस कृतिका, मी येतोय फक्त अर्धा तास वेट करा.”

“हो सर,मी तुमची वाट पाहतेय..” ती रडवेल्या चेहऱ्याने बोलली. अन् मोठं मोठ्याने हसायला लागली.


तिची ती झालेली अवस्था बघून आणि ती खूप घाबरली आहे हे ऐकून अमर लागलीच तयार व्हायला निघून गेला.त्याने अवघ्या पंधरा मिनिटात त्याची अंघोळ उकरून घेतली. अन् कपडे चढवून हॉटेलमधून बाहेर पडला. वेटर ब्रेकफास्ट करण्यासाठी त्याला बोलवत होता.पण कृतिकाच्या काळजीपुढे तो त्याच्या पोटाची भूकही विसरून गेला. अमर बाहेर जाताच हॉटेल मॅनेजरने ऋषींना कळवले.


किती बेजबाबदार आहे हा मुलगा. स्वतः च्या पोटाचीही भूक विसरू लागला आहे.मनातल्या मनात ऋषींनी डोक्यावर हात मारून घेतला.

दुपारचे दोन वाजले तरी अमर ऑफिस मध्ये आला नव्हता. त्यामुळे महत्त्वाच्या मीटिंग ऋषी यांनाच घ्याव्या लागल्या. कृतिकाने नुकतेच ऑफिस जॉईन केल्यामुळे तिला कंपन्याच्या नियमानुसार सहा महिने ऑफिस मधून बेदखल करता येणार नव्हते. त्यामुळे ऋषी चांगलेच संतापले होते. एकीकडे अमर फोन उचलत नव्हता.आणि दुसरीकडे कृतिका ऑफिस मध्ये काहीही न कळवता रजेवर गेली होती. त्यामुळे ऋषी काय समजायचं ते समजून गेले.

अमर कृतिकाच्या घरी होता.आणि कृतिका त्याच्या मिठीत रडण्याचे नाटक करत होती. आणि अमर तिला सावरत होता.

“सर.. माझं काहीच चुकलं नाही तरीही नेहमी अस माझ्या सोबतच का होत असतं?”

“मिसेस कृतिका, नेमकं काय झालंय मला समजेल का?”

कृतिका सांगू लागली..

“माझे मिस्टर सध्या कॅनडा येथे आहेत.आणि मला इथे सगळ्याच्या देखभालीसाठी त्यांनी ठेवलं आहे. माझे सासर खेडेगावात आहे.आणि माझं माहेर दिल्ली. आमची पहिली भेट सोशल मीडियावर झाली.आणि भेटीचं रूपांतर मैत्रीत झालं. हळूहळू दोघेही एकमेकांना आवडायला लागलो.यातच आमचं प्रेम जुळले. आम्ही आमच्या घरी ही गोष्ट सांगितली पण घरातल्यांनी लग्नाला साफ नकार दिला. एकमेकाच्या प्रेमाप्रती आम्ही पळून जाऊन घरच्यांच्या मनाविरुद्ध लग्न केले.अन् आम्ही राजेशच्या गावी गेलो.तिथं त्याच्या घरच्यांच्या कडून खूप त्रास सहन केला.माझी होणारी फरफट डोळ्यांनी बघवेना म्हणून राजेशने मला मुंबईत आणले. राजेश मुंबईत जॉबला असल्याने त्यांच इथ स्वतः च घर होतच.

आमचा संसार नव्या जोमात सुरू झाला.आणि एक दिवस राजेशना कंपनीचा फोन आला. तातडीने कॅनडाला जावं लागणार होतं. मला एकटीला त्यांना सोडून जायचं नव्हतं.पण कंपनीचे काम इतके महत्वाचे होते की,त्यांना तातडीने जण्यावाचून पर्याय नव्हता.

त्यांच्या मनाची समजूत घालून मी त्यांना कॅनडाला जायला लावले.मला एकटीला इथे करमनार नाही म्हणून माझ्या नंदेला त्यांनी माझ्याजवळ ठेवलं. काही दिवस नणंद सोबत असल्याने मलाही एकटेपणाची जाणीव झाली नाही. राजेश रोज फोन करून भरभरून बोलायचे. त्यामुळे मीही खुश होते.

एक दिवस आमच्या गावावरून फोन आला. सासुंची तब्बेत बिघडली असल्याने नंदुबाई गावी निघून गेली.खर तर मलाही जायचं होतं.पण मागच्या वेळी जो माझा सासरच्या लोकांनी त्रास केला होता.ते आठवताच मी तिकडे जायला नकार दिला. राजेश काही बोलले नाहीत. आता एकटेपण खाऊ लागलं होतं. मी शिकली सवरली असल्याने जॉब करायचं ठरवलं अन् तुमच्या कंपनीत रुजू झाले. अन् आज राजेशनी डायरेक्ट डिव्होर्स पेपरच पाठवले. माझी काय चूक झाली यात?”

“ त्यांना फोन करून विचारून घ्या. म्हणजे कारण समजेल.”

“हो, फोन केला होता.ते बोलले.तू मला अजिबात आवडत नाहीस.तुला मी माझ्या आयुष्यातून दूर करणार आहे. साधं माझ्या घरच्या लोकांकडे पाहता आलं नाही तुला मग माझ्या आयुष्यात तुला ठेऊन काय करू?”

“अरे,अस कसं डिव्होर्स मिळवणं इतकं सोप्पं आहे का?”

“माहित नाही. पण माझाही आता निर्णय झालाय.”

“कोणता.?”

“मी या पेपर वर साईन करणार आहे.”

“मिसेस कृतिका.. घाई घाईत निर्णय घेऊ नका.”

“त्यांना जर नी नकोच असेल तर, काही हरकत नाही विभक्त व्हायला. तसेही आमचं एक महिन्याच लग्न आणि जेमतेम एक दोनदा शारीरिक जवळीक.” कृतिका जवळीक या शब्दावर जोर देत बोलली.

तिचे बोलणे ऐकून इकडे अमरच्या मनात लाडू फुटू लागले होते.कारण ती तिच्या नवऱ्या पासून कायमची दूर होणार होती…!