वैर भाग ६

सख्खा भाऊ पक्का वैरी
वैर भाग ६


अमरच्या मनात लाडू फुटू लागले.अन् त्याच्या चेहऱ्यावरची खुशी रडण्याचे नाटक वटवणारी कृतिका डोळ्यातून गळणाऱ्या खोट्या आसवातून पाहू लागलेली. तिलाही हे नाटक वटावताना नाकेनऊ होऊन गेलेलं. कधी एकदा अमर निघून जातो आणि हे नाटक संपत अस तिला होऊन गेलं होतं.पण अमर काही तिथून हलत नव्हता.

“सर, माझं काय चुकतं का ओ?” त्याला ती कटवयला पाहत होती.

“नाही मिसेस कृतिका!तुमचं काहीही चुकत नाही आहे. उलट तुमचे मिस्टर चुकले आहेत. पण तरीही तुम्ही दोघांनी एकदा बोलून घ्या.”

“ नाही अजिबात नाही.मला काहीही बोलायचं नाही त्याच्याशी मी आताच साईन करतेय पेपरवर..” तिने ते पेपर घेतले आणि साईन करू लागली.


“ मिसेस कृतिका अहो हे काय करत आहात.?आधी त्यांच्याशी बोलून घ्या. मग निर्णय घ्या जो हवा तो.” मुद्दाम तिला सही करण्यापासून अमर तिला माघार घ्यायला सांगत होता. पण तीही कृतिका होती. अमर पेक्षाही शातिर ती बर याच्या मनाविरुद्ध वागणार होती.


“नाही मी आता जशास तसं उत्तर देणार आहे राजेशला.कारण त्याच्यामुळे मी माझ्या माहेरला मुकले आहे.आता अंतिम निर्णय घ्यावाच लागेल.”बोलता बोलता तिने डिव्होर्स पेपरवर साईन करून ते पाकिटात पॅकबंद केलही.

तिने त्या पेपरवर सही केेली आणि काही कळायच्या आधीच ती अमरच्या बाहुपाशात पहुडली.त्यानेही तिला दूर केलं नाही. ती हुंदके देत होती.पण डोळ्यात एकही अश्रू नव्हता.फक्त होता तो देखावा !

दुपार उलटली.पण अमर काही फोन उचलत नव्हता. त्यामुळे ऋषींना त्याची भयंकर चीड येत होती. खूप विश्वासाने त्यांनी त्याला कंपनीची जबाबदारी दिली होती. तरीही एखाद्याने कामात इतकी कुचराई करावी हे त्यांना अजिबात पटत नव्हत. त्यांनी रागाने त्यांचा नंबर डायल केला.कारण आता गप्प बसणं त्यांच्या सहनशीलते पलीकडं गेलं होतं.

फोनची रिंग वाजली. अन् अमरने तिची मिठी सोडवली.फोनवर बाबा नाव झळकत होतं. आता त्याच्या लक्षात आलं की बाबांनी त्याला आज महत्वाच्या कामासाठी लवकर यायला सांगितल होत.आणि आज त्याची महत्वाची मीटिंग मिस्टर शहा यांच्यासोबत होती.ती त्याच्यासाठी कितीतरी पटीने महत्वाची होती.हे ऋषींनी त्याला चार दिवसांपूर्वीच सांगितल होतं. जर मीटिंग कॅन्सल झाली तर त्यांना कितीचा तोटा सहन करावा लागेल याचा आकडा देखील ऋषींनी त्याला सांगितलेला होता.

त्याने घड्याळात पाहिले. दुपारचे दोन वाजले होते. अडीच वाजता शहा मीटिंग हॉल मध्ये असणार होते. त्यापूर्वी पंधरा मिनिट तरी अमरला ऑफिस मधे हजर असावे लागणार होते.

मिस्टर शहा काही साधीसुधी आसामी नव्हती.देश विदेशात त्याची कंपनी टॉप नंबरवर होती. आणि अशा कंपनी सोबत आपली कंपनी जोडली जावी अशी ऋषी यांची कितीतरी वर्षापासून इच्छा होती. ती आज पूर्ण होणार होती.पण त्याचा मुलगा त्यांच्या या इच्छेवर पाणी फिरवनार होता.

शहा यांच्या कंपनीशी आपली डील होणं किती महत्वाचं आहे. हे ऋषी यांनी चार दिवसांपूर्वी जीव ओतून सांगूनही अमर असा वागेल अस त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं.

“हा बोला बाबा!”

“कुठे आहेस तू.?”

“बाबा मला महत्वाचं काम आलेलं म्हणून बाहेर आलो होतो. पोहचतो थोड्या वेळात.”

“कंपनीच्या डील पेक्षा तुझं काम महत्वाचं आहे का??”

“बाबा आता बोलण्यात टाईम वेस्ट करण्यापेक्षा मला वाटतं मी तिथं पोहचलेले बेटर होईल नाही का?”

“ठीक आहे लवकर पोहच..”

“ओके बाबा.” अमरने फोन ठेवला पाहतो तर काय जागी असूनही त्याच्या बाहुपाशात झोपेचं सोंग घेतलेल्या कृतिकाला अमरची ही डील कॅन्सल करायची होती.कारण ही डील जर ऋषींना मिळाली तर.. कृतिकाचा बॉस तिचा चांगलाच समाचार घेणार होता. त्यामुळेच हे सारं नाटक तिने वटवले होते. जरी अमर गेल्यावर आपली या नाटकातून सुटका होईल अस तिला मघाशी वाटलं असलं तरी त्याला गुंडाळून ठेवणं हेच तिचं जोखमीचे काम होते.

“मिसेस कृतिका मला निघायला हवं बाबाचा कॉल होता.आता माझी महत्वाची मीटिंग आहे.” त्याच बोलणं ऐकत असूनही झोपेचं सोंग घेवून ती तशीच त्याच्या खांद्यावर लेटून होती.

“मिसेस कृतिकाsss.” तो तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता.पण झोपेचं सोंग घेतलेल्या तिला उठायचंच नव्हतं तर ती का बरं उठेल.?

एक मात्र खरं झोपेत असलेल्या एखाद्याला आपण एका हाकेने उठवू शकतो. पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला दहा हाका जरी मारल्या तरी तो उठू शकत नाही.

दोन्ही बाजूने कचाट्यात सापडलेल्या अमरला आता काय करायचं काहीच कळेना. तिकडे ऋषी मात्र चातकासारखी त्याची वाट पाहत होते.आणि इकडे अमर मीटिंगला जाऊ नये यासाठी कृतिकाची धडपड सुरू होती.

कृतिकाला दूर करणं आता अमरच्या जिवावर आलं होतं. डील काय आज ना उद्या पुन्हा मिळवू शकतो.पण अशी हातात भेटलेली एक सुंदर परी पुन्हा नाही मिळवू शकत. या निष्कर्षापर्यंत तो पोहचला होता. आता त्याच्या मनात दोन गोष्टी गुंजन घालू लागलेल्या. एक वडिलांची ताकत आणि दुसरी त्याची हवस.


त्याला त्याच्या अंगावरची जबाबदारी आठवली.अन् तो जाण्यासाठी एका झटक्यात उठला.तो उठल्याच बघून झोपेचं सोंग करणारी कृतिका देखील त्याला अडवायला उठली.त्याला थांबवायला आता तिने दुसरी युक्ती शोधली.


तिला सोडून निघणाऱ्या अमरला पाहून ती जोराने कळवळली. कदाचित पोट दुखण्याच नाटक करत होती ती. अमरच्या साध्या स्वभावाचा ती पुरेपूर फायदा उचलत होती. तिला काहीतरी त्रास होतोय म्हणून पुढे जाणारा अमर झटक्यात मागे वळला.तिच्याजवळ जाऊन तिला काय होतं हे विचारू लागला.पण कसलाच त्रास न होणारी ती त्रास अधिक होत असल्याचा भास करून देत होती.

एक राजा इथेच हतबल झालेला.आणि राणी ती तिचा डाव तिने जिंकला होता.कारण तिकडे ऑफिस मधे मीटिंगचां टायमिंग झाला होता..!