वैऱ्याची रात्र
खण .... खण .. असा हातोड्याचा आवाज येत होता
खण .... खण .. असा हातोड्याचा आवाज येत होता
सोहम "अरे कौस्तुभ .. तिकडे नको इकडे टेन्ट लाव "
कौस्तुभ " अरे तिकडे नको .. इकडेच ठीक आहे .. जरा जरा अंतर असू दे ना मध्ये "
सोहम " अरे रात्री काही प्रॉब्लेम झाला तर एकमेकांना मदत करता येईल जवळ असेल तर "
कौस्तुभ " नको रे जरा तरी प्रायव्हसी पाहिजे ना .. थोडे लांब लांब च करू "
सोहम " अहो .. कौस्तुभ .. काय विचार काय आहे ?"
कौस्तुभ " शु... हळू बोल ना .. सोनाक्षी ने ऐकलं ना तर झोडून काढेल मला "
तेवढ्यात सोनाक्षी आणि वीणा या दोघी आल्या ..
कौस्तुभ " हे डिअर सोना .. हा बघ आपला टेन्ट "
सोनाक्षी आणि वीणा दोघी हसायला लागल्या
सोनाक्षी " कौस्तुभ .. मी आणि वीणा एका टेन्ट मध्ये झोपू आणि तू आणि सोहम झोप "
कौस्तुभ " ए यार .. नाही असे नाही करायचं .. इट्स माय ड्रीम .. एका टेन्ट मध्ये आपण रात्री ... "
सोनाक्षी " शु... कौस्तुभ .. गप ना .. अरे सोहम आणि वीणा चे अजून आपल्या सारखे लग्न नाही झालेय .. ते दोघे एकत्र कसे राहतील ?"
कौस्तुभ " यार ... मग कशाला आणले त्यांना इथे ? एंगेजमेंट तर झालीय ना पण ?"
सोहम " कौस्तुभ .. अरे काय ? काही पण बोलतोय तू ?"
कौस्तुभ ने लावलेला टेन्ट पुन्हा काढू लागला तो राग- रागाने "
सोहम " अरे .. हे काय करतोय ? काढतोय का ?"
कौस्तुभ " आता जवळच घ्यायला लागेल ना .. आपल्याला त्या टेन्ट मधून यांना बघत बसावे लागेल ना .. आणि काही इमर्जंन्सी आली तर म्हणजे जवळच लावायला लागेल "
सोनाक्षी " आपण थोडा वेळ झोपे पर्यंत एकत्र टाइम स्पेंड कर शकतो "
तेव्हा कुठे कौस्तुभ साहेबांच्या चेहऱ्यावर थोडेसे हसू आले .. आणि पुन्हा जोश मध्ये आला नि हातोड्याने खिळा ठोकू लागला
कौस्तुभ " सोहम .. विसरू नकोस .. अजून लग्न होयचंय .. माझे लक्ष आहे "
सोहम " गप ना .. किती चिडवशील "
दोघे आपापल्या बायकांना घेऊन आपापल्या टेन्ट मध्ये गेले ..
कौस्तुभ ने टेन्ट मस्त डेकोरेट केला होता .. कॅण्डल्स चा सुगंध आणि उजेड मंद होता .. छोटी बॅटरी पण होती .. आत मस्त मऊ गादि होती आणि गादीवर मस्त रोज पेटल्स टाकल्या होत्या ..
सोनाक्षी " wow !! हाऊ रोमँटिक "
कौस्तुभ ला नुसती घाई झालेली तिला ओढूनच घेतले त्याने आणि किस करू लागला .. दोघे एकमेकांत रमू लागले होते .. बाहेर मस्त पौर्णिमेची रात्र होती .. चंद्र आणि चांदणे पडले होतेच .. एकदम रोमँटिक वातावरण होते .. एका नदीच्या शेजारी साईडला उंच शेत होते .. मस्त थंडगार वारा येत होता .. आणि कौस्तुभ आणि त्याची बायको सोनाक्षी एकमेकांच्या बाहुपाशात एकमेकांत हरवत होते ..
तेवढ्यात सोनाक्षी ला घुंगरांचा आवाज .. छन ... छन ...
सोनाक्षी " कौ .. कौ .. थांब ना .. कसला आवाज येतोय "
कौस्तुभ " सोना .. कुठे . कसला आवाज नाहीये .. प्लिज डोन्ट स्पॉईल माय मूड " असे तो म्हणतच होता तर त्याला पण घुंगरांचा आवाज आला .. पटकन स्वतःला सावरून .. बाहेर जायला निघाला ..
कौस्तुभ " सोहम .. ए सोहम.. "
तो धावतच सोहम च्या टेन्ट जवळ गेला
कौस्तुभ " सोहम .. कुठे आहेस ?.. अरे रिप्लाय दे ना "
सोहम च्या टेन्ट मधून काहीच आवाज नाही आला "
कौस्तुभ ने टेंट मध्ये आता डोकावून पाहिले तर .. टेन्ट रिकामा
सोहम आणि वीणा गायब
कौस्तुभ मोठं मोठ्याने हाक मारू लागला " सोहम ... वीणा ... सोहम वीणा "
या दोघांचा काहीच पत्ता नाही म्हटल्यावर त्याला घाम फुटला .. रात्रीचे १२ वाजायला आले होते .. आणि हे दोघे कुठे गायब झाले .. म्हणुन सोनाक्षी ला सांगायला त्याच्या टेन्ट मधे आला तर सोनाक्षी गायब
कौस्तुभ च्या पायाखालची जमीनच सरकली .. भर थंडीत त्याला घाम फुटला आणि तो जोरात हाक मारू लागला
कौस्तुभ " सोना ... सोना ... सोहम ... वीणा ... "
कुठूनही काहीच रिप्लाय नाही
कौस्तुभ च्या डोळ्यांत पाणी येऊ लागले .. खूप घाबरला तो .. तिघे त्याच्या डोळ्यांसमोर गायब झाले होते ..
तेवढयात मागून तिघे हसत आले ..
सोहम " फसवलं रे फसवलं .. म्हणत "
तिघे एकमेकांवर टाळी देऊन हसू लागले .. पण कौस्तुभ मात्र खाली बसला तो एकदम शांतच होता .सोनाक्षी च्या लक्षांत आले इट्स नॉट फनी एनी मोअर .. तिने सोहम ला आणि वीणा ला तिथून जायला सांगितले
ते दोघे " सॉरी यार कौस्तुभ .. सॉरी "
कौस्तुभ अजूनही त्याच्याकडे बघत नव्हता
विणा आणि सोहम निघून गेले त्यांच्या टेन्ट मध्ये
कौस्तुभ च्या जवळ सोना बसली .. त्याला घट्ट मिठीत घेतले तिने " सॉरी .. सॉरी .. "
कौस्तुभ रागाने तिला मिठीत घेत नव्हता .. सोना ला डोळ्यांसमोर ना बघून खूप घाबरला होता .. डोळ्यांत पाणी होते त्याच्या
सोना " सॉरी ना शोना .. अरे मी खरंच यात सामील नव्हते .. घुंगरांचा आवाज आला होता ना तुला पण .. तू बाहेर गेलास आणि हे दोघे मागून आले आणि मग बाहेर घेऊन गेले "
कौस्तुभ " प्लिज असला मजाक पुन्हा करू नकोस ? जा तुम्ही दोघी जाऊन झोपा "
सोना " हमम .. ठीक आहे .. आणि ती जायला निघाला तर कौस्तुभ ने तिला घट्ट मिठीत घेतले " आय लव यु सोना .. देव करो माझे सगळे आयुष्य तुला लागू.. " तो काहीतरी बोलत होता तर सोना ने त्याच्या ओठांवर हात ठेवला.
सोना "कौ.. माझे सगळे आयुष्य तुझ्या बरोबर जगायचंय मला .. आपल्याला पतवंडाच्या लग्नात डान्स करायचाय"
कौस्तुभ हसतच " यु स्कीपड माय हार्ट बिट्स .. "
सोना " सॉरी ना डिअर "
सोहम आणि कौस्तुभ एका टेन्ट मध्ये झोपले आणि ह्या दोघी एक टेन्ट मध्ये झोपल्या
--------------------
--------------------
अर्धा एक तास झाला असेल. कौस्तुभ ला पुन्हा घुंगरांचा आवाज येऊ लागला ..
कौतुभ ने डोळे मिटले होते ते मिटूनच " सोहम .. मी वाजविन आता तुझ्या कानाखाली.. स्टॉप धिस नॉन्सेन्स . पोरी घाबरतील तिकडे कळलं ना "
सोहम गाढ झोपलेला
पाच एक मिनिटांनी पुन्हा घुंगरांचा आवाज आला .. आणि कौस्तुभ रागानेच उठला तर सोहम गाढ झोपला होता .. तो तसाच बसून राहिला .. आणि हळूच हाताने सोहम ला उठवू लागला ..
कौस्तुभ एकदम हळू आवाजात " सोहम .. वयी आर इन ट्रबल ... बाहेर कोणीतरी आहे "
सोहंम " कोण आहे ?"
कौस्तुभ " मगाशी जसा घुंगरांचा आवाज तू काढत होतास ना तसाच आवाज पुन्हा येतोय "
सोहम "घुंगरांचा आवाज .. मी नव्हता काढला ?"
कौस्तुभ " गप रे खोटे नको बोलूस "
सोहम " कौस्तुभ .. घुंगरू नाहियेत माझ्याकडे .. मी खरं बोलतोय "
कौस्तुभ " मगाशी टेन्ट लावतानाचा हातोडा कुठंय ? तो घे .. आपल्याला बाहेर जाऊन बघावं लागेल .. पोरींना आपल्या जवळच ठेवून घेऊ .. काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय इथे .. मगाशी पण आम्हांला दोघांना घुंगरांचा आवाज आला होता
सोहम " यार मला जाम भीती वाटायला लागलीय .. बाहेर डोकावून बघ ना "
कौस्तुभ " एक काम करू आपण ..टेन्ट राहू दे इथेच .. गाडीत जाऊन बसू .. आणि घराच्या दिशेला जाऊ .. हि जागा इतकी मागे आहे कि कोणाची मदत पण मिळणार नाही आणि फोन ला रेंज पण नाहीये .. आपण मोठ्या संकटात सापडायचा आधी इथून निघून जाऊ "
सोहम " ठीक आहे .. मी हळूच जाऊन पोरींना उठवतो "
कौस्तुभ " थांब सगळे एकत्रच राहू .. अजिबात हात सोडू नका एकमेकांचा "
सोहम ला आता घुंगरांचा आवाज आला तसा त्याची गाळणच उडाली
सोहम " यार .. भूत प्रेत तर नाही ना .. शीट यार उगाच आलोय इकडे "
कौस्तुभ " आता गप ना .. आत इथून बाहेर कसे पडायचं ते बघ .. "
दोघे हळूच आवाज न करता टॉर्च लावून चालत चालत दुसऱ्या टेन्ट पर्यंत गेले..
दोघे हळूच आवाज न करता टॉर्च लावून चालत चालत दुसऱ्या टेन्ट पर्यंत गेले..
दोघींना उठवली त्यांनी आणि खुणेनेच सांगितले " आपण निघतोय आताच्या आता "
वीणा तर घाबरून रडायलाच लागली .. सोना पण कौस्तुभ चा हात हातात घेऊन चालू लागली
चौघांनी एकमेकांचे घट्ट हात हातात घेतले आणि टॉर्च च्या उजेडात गाडी कडे जाऊ लागले ..
रात किड्यांचा किर किर आवाज येत होता .. मध्ये मध्ये घुंगरांचा आवाज येत होता .. कधी फास्ट .. कधी स्लो .. असे वाटे कोणीतरी त्यांचा पाठलाग करतंय कि काय ?
कौस्तुभ " कोणीच मागे वळून बघू नका .. "
वीणा मनातच देवाचा धावा करत होती . हनुमान चालीसा म्हणत होती .. सोहम ची हवा खूपच टाईट झाली होती .. तसे तर चौघे ही घाबरले होते .. चालत चालत शेता जवळ आले .. मगाशी सूंदर वाटणारे शेत आता खूप भयानक वाटत होते .. वाढलेल्या गवताची उंची इतकी होती कि चौघांची फक्त डोकी दिसत होती .. कौस्तुभ टॉर्च ने सगळ्यांना उजेड दाखवत होता .. तेवढ्यात वीणा च्या पायावरून काहीतरी सर्रकन गेले असे तिला वाटले आणि ती जोर जोरात ओरडू लागली .. बहुदा उंदीर .. घूस किंवा मुंगूस .. यापैकी काहीतरी तिच्या पायावरून गेले असेल..
वीणा घाबरून रडायलाच लागली होती
.. आणि तिचे रडणे बघून सोना पण रडवेली झाली होती
.. आणि तिचे रडणे बघून सोना पण रडवेली झाली होती
घुंगराचा आवाज खूपच यायला लागला होता .. चौघांचे हृदय धडधडत होते .. कान गरम झाले होते .. आता पुढच्या क्षणी काय होईल याची खात्री नव्हती .. जगतोय का मरतोय ..
त्या शेतातल्या गवतात बरोबर मध्यात आले तर समोर हिरव्या रंगाचे दोन लाईट्स दिसायला लागले .. जसे डोळे हलत होते .. तसे घुंगरांचा आवाज वाढत होता .. कोणाचे डोळे ? हिरवे कसे काय ? हा कुठला प्राणी आहे ? हा प्राणी का अजून कोण आहे ? काहीच समजायला मार्ग नव्हता ..
कौस्तुभ " मागे चला .. मागे चला .. पुढे काहीतरी आहे .. काय आहे मला माहित नाही .. पण आहे .. मागे चला .. "पुन्हा मागे यायला लागले .. "
जे काही तिथे होते ते त्यांना गाडी पर्यंत पोहचू देत नव्हते .. सगळे धावत धावत मागे पळू लागले .. जिवाच्या आकांडतांडवाने पळत होते .. एका क्षणाला सोनाला धाप लागली .. पुढे पळायला ताकदच नाही राहिली तिला .. कौस्तुभ ने मागे वळून पहिले तर ते डोळे त्यांचा पाठलाग करतायत असे वाटू लागले .. कौस्तुभ ने लिटरली सोना ला खांद्यावर उचलून घेतले आणि धावू लागला
गवतातून बाहेर आले पुन्हा पहिल्या जागी .. चकवा होता का काय होते .. काहीच कळत नव्हते .. कौस्तुभ ला एक मोठे झाड दिसले .. त्या झाडाखाली जाऊ असे मनात विचार आला त्याच्या
वीणा" कौस्तुभ वडाचे झाड आहे ते .. रात्रीचे वडाच्या झाडाखाली जाऊ नये असे म्हणतात "
कौस्तुभ " मग काय ? कुठे जावे ? "
सोहम " पुन्हा टेन्ट मध्ये जाऊ .. एका टेन्ट मध्ये सगळे थांबू "
चौघे पुन्हा टेन्ट मध्ये आले
सकाळी त्यांना जाग आली तर आजु बाजूला खुप सारा घुंगरांचा आवाज येत होता तो आवाज ऐकून कौस्तुभ बाहेर आला तर बघतो तर खूप सारे बैल आणि गायी होत्या त्यांच्या गळ्यात घुंगरू बांधले होते ..
त्यान्ना बघून आपण घालवलेली वैऱ्याची रात्र आठवून कौस्तुभ ने डोक्यावर हात मारून घेतला..
समाप्त
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा