अजय शाळकरी मुलगा, नव्याने शहरात आला. तिथेच त्याची विजयशी मैत्री झाली. सुरूवातीला सगळं छान चालल होतं. विजय अजयला नेहमी नवनवीन वस्तू दाखवायचा. त्याला त्या वस्तूबद्दल कुतूहल वाटायचं. तो वस्तू कोठून आणतो असे विचारता तो काही रंजक गोष्टीं सांगत फुशारक्या मारायचा.
"अरे, माझ्याकडे जादू आहे. हात टाकला की ती वस्तू मिळवू शकतो मी? तुला शिकायची का ही जादू ? मी शिकवेन तुला, फार काही मेहनतीचे काम नाही. एकदा हात मारला की कित्येक दिवस मौजमस्ती करायची त्यावर. "
"खरचं ,असं होऊ शकतं मग मला पण शिकवं की ."अजय उत्साहात म्हणाला.
खरे म्हणजे तो चोरीच्या कामाबद्दल बोलत होते, हे अजयच्या लक्षातच आले नाही. त्याला फक्त आपण आरामात मस्त मौजमजा करायचं हे डोक्यात घेतलं.
विजयने अजयला त्याचा त्या चोरीच्या कामात शामिल करून घेतले. सुरूवातीला थोडे आढेवेढे घेणारा अजय आता विजयच्या संगतीने त्या कामात निपुण झाला. जास्त काम न करताही भरपूर पैसा मिळू शकतो आणि आपण हवं तर जगू शकतो, मौजमस्ती करतो याचा त्याला आनंद होत असे.
एके दिवशी ते दोघेही एके खूप मोठ्या रक्कमेची बॅग चोरली आणि ते पळू लागले.
ज्या माणसाची ती बॅग होती, तो जोरजोरात ओरडू लागला "चोर ,चोर ऽऽ.. पकडा ..पकडा.. "
काही लोक त्यांच्यामागे धावू लागले. कोणीतरी पोलिसांना फोन केला. ते खूप वेगाने धावत होते.
एका वळणावर विजयने ती बॅग अजयकडे सोपवली आणि तो दुसऱ्या बाजूने पळून गेला. आता अजय ती बॅग सावरत पळत सुटला. पण फार लांब जाऊ शकला नाही. कारण काही लोक त्याच्यासमोर होते जे त्यांचा पाठलाग करत आले होते आणि सगळ्यांनी मिळून त्याला घेरले. ती बॅग छातीशी धरून तो तिथून निसटण्याच्या प्रयत्न करणार तोच त्या लोकांनी त्याला पकडले आणि त्याला खूपच चोपला.
लोकांच्या मारण्याने तो जवळजवळ अर्धमेला झाला होता. लोकांनी त्याला खूपच बेदम मारहाण केली. तेवढ्यात पोलिसही आले. पोलिसांनी त्याला लोकांपासून सोडवून त्यांच्या ताब्यात घेतलं. त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखलं झाला आणि तुरुंगात टाकण्यात आलं.
बोध:- १) वाईट संगतीत राहिल की वाईट मार्गाने जातो आणि प्रसंगी प्राणांशी गाठ पडते.
२) मोह करणे वाईट असते.
३) जे काम करतो ते करताना एकदा विचार जरूर करावा ते चांगले की वाईट.
२) मोह करणे वाईट असते.
३) जे काम करतो ते करताना एकदा विचार जरूर करावा ते चांगले की वाईट.
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा