उद्या रविवार म्हणून स्वातीने आपल्या सोसायटीतल्या बायकांना हळदीकुंकूसाठी घरी आमंत्रित केले. उद्याचा मेन्यू म्हणून पावभाजीसाठी लागणाऱ्या भरपूर भाज्या आणि गाजर हलव्याचे साहित्य तिने मागवले .साधारण मैत्रिणी व सोसायटीतल्या मिळून ३० ते ३५ बायका उद्या येणार होत्या.
स्वातीने मागवलेल्या भाज्या पाहून उद्या भरपूर कामं पडेल हे ओळखून तिच्या चाणाक्ष मोलकरणीने दुसऱ्या दिवशी दांडी मारली.
शेवटी मनाशी चरफडतच तिने वॉचमनला त्याच्या बायकोला मदतीला पाठवण्याचा निरोप दिला.
सोसायटीच्या पाठीमागेच आवारात वॉचमन शाम त्याची बायको रूपाली आणि ५ वर्षाच्या केतकी सोबत राहत होता. रूपाली घरी राहून मशिनवर शिवणकाम करायची. सोसायटीतल्या आणि आसपासच्या बऱ्याच बायका तिला अल्टर फॉल पिको शिलाई वैगेरे कामं द्यायच्या.
नवऱ्याचा निरोप ऐकून रूपाली आपल्या लहान मुलीला केतकीला स्वातीच्या घरी घेऊन गेली. आल्या आल्याच स्वातीने रूपालीला स्वयंपाक काय कसा करायचा हे समजावून सांगितले आणि पार्लरची अपॉइंटमेंट घेऊन निघून गेली. तोपर्यंत रुपालीने व्यवस्थित भाज्या निवडून धुवून कापून भाजी शिजवायला ठेवली आणि दुसरीकडे गाजर किसत बसली. गाजर किसून होतेय तोच स्वातीने तिला फोन करून सांगितले ,
हे बघ इथे जरा गर्दी आहे त्यामुळे माझा नंबर फार लांबला आहे, मला यायला २ तास तरी लागतील तोवर प्लीज जरा हॉल आणि बाकीच्या खोल्या वैगेरे आवरून घे. पुढंच काहींच न ऐकून घेता स्वातीने फोन कट केला. आधीच एवढा स्वयंपाक करून दमलेल्या रुपालीने झाडलोट करायला सुरुवात केली. लहानशी केतकी एका कोपऱ्यात बसून आईची कामाची लगबग पाहत होती. गॅसवर शिजलेल्या पावभाजीचा सुगंध दरवळू लागला तशी केतकी आईकडे भूक लागली आहे खायला पाहिजे असा हट्ट करू लागली. रूपालीला पण भूक लागलीच होती पण तिने त्याकडे दुर्लक्ष करत एका छोट्या ताटात थोडीशी भाजी आणि एक पाव वाढून केतकीला खायला दिला.
तिचे खाऊन होतंय तेवढ्यात स्वाती आली. तशी रूपाली घरी जायला निघाली.

अगं थांब आता एवढं केलंच आहेस तर हळदीकुंकू लावून जा. बायका पण येतीलच एवढ्यात. स्वाती बोलली तशी रूपाली परत थांबली हे पाहून स्वातीने अंदाज घेतला आणि म्हणाली एक काम कर तोपर्यंत डिश वैगेरे पुसून ठेव पाव भाजायला घे. बरं म्हणून रुपालीने तेही करायला सुरुवात केली. हळूहळू बायकांचा ग्रूप येऊ लागला.
स्वातीने येतील तश्या बायकांना हळदीकुंकू लावले तिळगुळ दिला आणि वाण म्हणून सुंदरसा मिनी थर्मास दिला. आग्रह करून करून पावभाजी गाजर हलवा खायला लावला.
सर्व कामे उरकल्यानंतर स्वातीने रूपालीला हळदीकुंकू लावले आणि वाण म्हणून १ स्टीलची वाटी दिली आणि कामाच्या मोबदल्याचे ३०० रु हातात दिले आणि केतकीच्या हातात उरलेल्या पावभाजीचा डबा टेकवला.
वरून स्वाती म्हणाली आज जरा वाण कमीच पडले बघं. आता कोणी अजून आलं तर माझीच पंचाईत होईल.

हे पाहून रूपालीला राग आला केतकीचा हात धरून ती तरातरा निघून आली. तिला माहित होते स्वाती खोटं बोलत आहे . दुपारीच तिने खोली आवरताना भरपूर थर्मास पाहिले होते. हळदीकुंकू झाल्यावर उरलेले काही थर्मास स्वातीने आतल्या खोलीत नेले होते.
पुढच्या रविवारी रुपालीने आपल्या घरी हळदीकुंकू आयोजित केले आणि स्वातीला पण आमंत्रण देऊन आली. छोटं पण व्यवस्थित आवरलेलं घरं, धूप-अगरबत्तीचा सुवास, शेवयाच्या खीरीचा गोड दरवळ आणि दारात रांगोळी. वाण म्हणून रुपालीने खनांच्या कापडांचे सुंदर बटवे तयार केले.
थोड्या उशिरानेच स्वाती आली तस तिला हळदीकुंकू लावले आणि वाण म्हणून बटवा आणि एक मिनी थर्मास दिला.

स्वाती....- अरे वा ! वाण म्हणून २ वस्तू?
रुपालीने काहीश्या तोऱ्यातच उत्तर दिले, हो २ वस्तू पण फक्त तुम्हालाच बरं का. त्यादिवशी तुम्ही बायकांना वाण म्हणून थर्मास वाटले पण तुम्हालाच उरला नाही ना म्हणून माझ्यातर्फे हा.
तिचं उत्तर ऐकून स्वाती निमूटपणे निघून गेली.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा