Login

वानोळा (वानवळा)

काही तरी काय उलटी गंगा वाहते कां?

वानोळा


अगं रेखा, "किराण्याच्या सामानाची यादी करताना वाल आणि नारळ लिहून घे बाई नंदाला खूप आवडते वालाची उसळ , माझ्या हातचेउकडिचे मोदक. . आणी ते बोर्नविटा, शशांक करता"शोभाताई सूनेला म्हणाल्या.

लेक माहेरपणाला येणार असं कळल्यावर शोभाताईंच्या उत्साहाला उधाण आले होते.

आणि आहो ,--ते अंबे कसे म्हणालात? एक पेटी सांगून ठेवा. नंदा येती आहे माहेरपणाला.
",शशांक तर अंबे पाहून एकदम खुशीत येणार.त्याला अगदी रोजच्या रोज रस पोळी हवी, कधी आईस्क्रीम मेंगो च , शोभाताई उत्साहात बोलु लागल्या.

ओ‘अग हो हो येऊ तर दे! केव्हा येते आहे ?त्याच्या एक दिवस आधी आणतो." अजून काही हवं आहे ते सांगा.”

" काय माहित हो या मुलींचं काहीच कळत नाही नक्की सांगतच नाही."आपण आपल वाट पहात रहायचा. तिकडून परवानगी मिळाली की येणार ना.
"परवानगी काय म्हणते? दिलीपराव म्हणाले", ते काय नाही म्हणतात.

अहो घरातील सगळी व्यवस्था करून मगच जमेल असं म्हणत होती.
मला तर कधी येईल असे झाले आहे..”

‘ हो ना, ताईं येवून गेल्या कि बरं –रेखा काहिशी हिरमुसलेल्या स्वरात म्हणाली .

तेवढ्यात “,रेखा तुला पण सुट्ट्या लागल्या शाळेला. केव्हा जाणारे तू माहेरी?"रीतेश ने विचारले?

"अजून नाही ठरवलं अहो," ताई येणार आहे ना ." त्या येऊन गेल्या नंतर….
"हो ना ,मीच म्हटलं तीयेऊन गेल्यावर मगच तू जा बाई." सासुबाई म्हणाल्या.

रेखा काही बोलली नाही तरी मनातून उदास झाली. आईला बरं नाहीये कधीची बोलावते आहे. रेखा शिक्षिका होती तिलाही आत्ताच शाळेला सुट्टी होती.
काय करावे सासूबाईंना विचारावे कां ताई केव्हा येणारे ?
पण-- नकोच, समजून घेतलं तर ठीक नाही तर ---उगाचच गैरसमज, वादविवाद..

रेखाने सरळ नंदाताईंनाच फोन लावला .

काय"ताई कधीची वाट पाहतोय आम्ही केव्हा येता आहे?"
पाहते ग माझे काही नक्की होत नाहीये.’

‘ कां भाऊजी सोडत नाही वाटत रेखा ने मिस्किल पणे विचारले?

काहिही हं तुझं आपलंवहिनी..
तू जाऊन ये ना माहेरी तुझ्या आईला बरे नाहीये ना ?
हो पण आई तुमची खूप वाट पाहत आहे तुम्ही नाही आला तर विरसहोईल त्यांचा. आधी तुमचं माहेरपण मग मला जायला मिळेल
मी नंतर पुढे कधीतरी जाईन..

" पाहते" म्हणत नंदाने फोन ठेवला.

तिला लक्षात आले रेखालाही आत्ता शाळांना सुट्टी आहे तेव्हा तिचेही माहेर पण हे व्हायला हवे तिच्या आईला बरं नाही ये,.काहीतरी करायला हवे .

दुसऱ्या दिवशी सकाळी नंदाने फोन केला "आई तू माझी वाट पाहत आहे पण काय करू मला बरं वाटतं नाहीये . तुझी फार आठवण येते आहे तू आणि बाबा या ना इकडे मला जरा आराम मिळेल .

"अग बाई हो का? सांगते मी यांना उद्याचंच रिझर्वेशन करायला, येतो आम्ही."
त्यांनी सामानाची बांधाबांध केली,

शोभाताईंना स्टेशनवर घ्यायला जावई प्रकाश आले होते.
द्या सामान माझ्या जवळ म्हणत त्यांनी सावकाश पणे शोभाताईं, बाबाना रिक्षा त बसवलं.

घरी पोहोचल्यावर शोभाताईंनी पाहिलं नंदा अगदी व्यवस्थित दिसत होती.

आई ,बाबांना पाहून नंदा ला खूप आनंद झाला.

दुपारच्या जेवणानंतर शोभाताई म्हणाल्या काय होत आहे तुला अशी तर बरी दिसत आहे?

तुला पाहून बरी झाले.

‘ बाई ग,एवढ्या घाईघाईने निघाले कि तुझ्या करता काहीच आणता आले नाही. ‘
अग खाऊ आणलाय न तेवढा पुरे
असं कसं पापड, कुरडया, सांडगे, लोणचं, मेतकूट , शेवया काहीच करण जमलं नाही. ‘

अग असु दे, नंदा म्हणाली.

दोन दिवसांनी तिने शोभाताईंना विचारले “आई कुरडयांसाठी तू किती गहू भिजवते? “

‘एक किलो , पण आता हे सगळं कशासाठी तु आराम कर,. मी तिकडे घरी गेले कि करेन!’
नाही तर रेखा ला सांगेन करायला.”

नंदाने दोन किलो गहू भिजत घातले. आई तू दाखव मला कसं करते तस.
दोन दिवसांनी आईला विचारून चिक काढून कुरडया बनवल्या शोभाताईंनी तिला चीक कसा हाटायचा ते शिकवलं.
ह्याच पद्धतीने तिने पापड, मेतकूट, शेवया शिकून केल्या. सर्व पदार्थांचे दोन भाग करुन ठेवत गेली. मग लोणच मोरंबा, मसाले..

शोभाताई पहात होत्या हा दुसरा बाॅक्स?

हे तुझ्या साठी.

काही तरी काय उलटी गंगा वाहते कां?मुली माहेरून वानोळा आणतात.
मग काय झालं ?आता काळ बदलला आहे,मुली आईचं माहेरपण करतात आजकाल ,तसंच समज कि…हा तुला वानोळा .

दुसरे दिवशी शोभाताई नी रेखाला फोन केला”, आम्ही अजून पंधरा दिवस तरी येथे आहो, तू माहेरी केव्हा जाणार आहे? आईला बरं वाटलं कि ये आरामात ,नाही तर येताना त्यांना घेऊनच ये आराम करायला त्यांना ही माहेर पणा चाअनुभव घेऊ दे.

नंदा स्वयंपाक घरातुन सर्व ऐकत होती आई ला जाणीव झाली हे पाहून तिला खूप आनंद झाला तिचा प्लॅन सफल झाला.
तेवढ्यात शोभाताई आत येत म्हणाल्या अगं रेखा ला तुझ्या शी बोलायचं होतं.
मी करते मग!
दोन दिवसांनी रेखाने फोन केला ताई खूप खूप थॅन्क्स तुमच्या मुळे—-
अग अग असं नको बोलू , तू केव्हा पोचली माहेरी,आई कशी आहे?
आई बरी आहे परतताना तिला सोबत आणते तिला आरामाची गरज आहे, तुम्ही आणी आई केव्हा येणार?
अग आई मजेत आहे मला आरामाची गरज आहे तेव्हा महिनाभर तरी म्हणत नंदा ने हसत फोन ठेवला……