वणवा - भाग - 14

vanva
नशिबाचा वणवा - भाग - 14

( मागच्या भागात आपण बघितले - निशाच्या मनात सुडाची भावना निर्माण होते आता पुढे )

सानिका आणि साहिल दिवसेंदिवस अजूनच जवळ येत असतात. त्यांचं हसून, मस्करी करून बोलत ऑफिसची कामं करत राहणं निशाला अतिशय खटकत असतं. ती साहिलशी जवळीक साधण्यासाठी एक प्लॅन बनवते, ती आतापर्यंत सगळ्या ऑफिसच्या मीटिंग्स ला एकटीच जात असते. ह्यावेळी ती साहिलला घेवून जायचं ठरवते आणि तिथे चं आपण त्याला आपल्या प्रेमाची कबुली देऊ असं ठरवते.

निशा साहिलला सांगते ऑफिसची एक मिटिंग आहे, बंगलोरला आणि त्यासाठी ह्यावेळी माझा असिस्टंट म्हणून तू दोन दिवसासाठी माझ्या बरोबर यायचं आहेस, ही ऑर्डर आहे. साहिल बोलतो पण मॅडम असं अचानक....निशा ओरडून बोलते, बॉस आहे मी तुझी मी कधीही मिटिंग ठरवू शकते. साहिल बरं चालेल बोलतो. सानिका आणि साहिल मात्र तिच्या या निर्णयाने अवाक होतात. कारण निशा कधीच असा अचानक प्लॅन करत नसे. तिच्या सगळ्या गोष्टी प्री- प्लॅन असतं.

इकडे निशा अतिशय खुश असते, एकदाचं आपल्या मनातले साहिलला बोलावे त्याच्याजवळ प्रेम व्यक्त करावे असे तीला खूप वाटतं असते. आणि तीने ती संधी साधून आणली होती. सानिका आणि साहिल मात्र खूप अस्वस्थ असतात. असं बॉसने अचानक दोन दिवसांसाठी साहिलला घेऊन जाणे त्या दोघांना सुद्धा पटत नसते. पण शेवटी निशा बॉस असते आणि तिचा हुकूम आहे म्हंटल्यावर जावेच लागणार होते.

निशा आणि साहिल प्रवासाला निघतात. निशा सतत साहिलशी जवळीक साधत असते, पण साहिल दूर दूर राहत असतो. संध्याकाळी मिटिंग झाल्यावर दोघेही हॉटेलवर पोचतात. निशा आणि साहिलसाठी वेगवेगळे रूम्स बुक केलेले असतात. ते पाहून साहिल मनातल्या मनात हुश्श बोलतो आणि सानिकाला तसं मेसेज करून कळवतो. साहिल बोलतो, नशीब रूम वेगळी आहे नाहीतर बॉस नुसत्या माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतायत. निदान रात्री रूम मध्ये बसून मी सानिकाशी निवांत गप्पा तरी मारू शकेन.

निशा आणि साहिल हॉटेल मध्ये खाली जेवायला जातात. आणि मग वर आल्यावर निशाला बाय करून साहिल त्याच्या रूम मध्ये जातो. साहिल फ्रेश होऊन रूममध्ये मोबाईलवर सानिका बरोबर बोलत असतो. एक तास होऊन गेलेला असतो. आणि रात्रीचे अकरा वाजत आलेले असतात त्यामुळे साहिल, सानिकाला बोलतो आता जरा मी आराम करतो, प्रवासाने थकल्यासारखं झालंय, ती ही हो तू झोप बोलून फोन ठेवते.

साडे - अकरा वाजता त्याच्या रूमचा दरवाजा वाजतो तो दरवाजा जाऊन उघडतो, तर त्याला त्या स्लीवलेस बॉडी वर बघून निशा त्याला बघतच राहते, तो विचारतो काय झालं मॅडम काही कामं होतं कां. साहिल मनातून नाराज होतो, पण बॉस चं म्हणणं कसं नाकारावं म्हणून ओके बोलतो.

निशा बोलते अरे जरा जेवण जड झालं होतं तर म्हंटल कोल्डड्रिंक पिऊया, म्हणून मग म्हंटल दोघे सोबतच पिऊ आणि उद्याच्या मिटिंगच पण प्लँनिंग करू, तुला झोप आली आहे कां, साहिल बोलतो, बरं चालेल या आत या. निशा साहिल आणि तिच्यासाठी कोल्डड्रिंक चे दोन ग्लास भरते आणि लॅपटॉपवर साहिलला उद्याच्या मिटिंगच प्रेझेनटेशन दाखवते.

दोघेही काम करत करत कोल्डड्रिंक पीत असतात. आणि साहिलचे डोळे जड होऊ लागतात. तो मनातून खूप घाबरतो आणि म्हणतो बॉसने ह्यात काही मिसळलं तर नव्हतं ना, पण त्याला प्रचंड नशा येऊ लागते, ....

निशा मनातून खूप खुश होते त्याला आपल्या मांडीवर झोपवते आणि बोलते, आय लव्ह यू साहिल, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, आणि ती त्याच्या केसावर हात फिरवू लागते. साहिल खूप ग्लानीत असतो, त्याला निशाला प्रतिकार करायचा असतो. पण त्याला चक्कर आल्यासारखं वाटतं असत. त्याला उठायला खूप थकवा जाणवत असतो.

निशा साहीलच्या अगदी जवळ जायचा प्रयत्न करते तेव्हा साहिल - सानिका, सानिका असा ग्लानीत बोलू लागतो, आणि ते ऐकून निशा अजून चिडते आणि त्याच्या एक कानाखाली मारते आणि बोलते मी एवढ्या जवळ असताना तुला सानिका हवी आहे कां रे नालायका, मी इथे तुझ्यावर जीव ओवाळून टाकतेय त्याचं काहीच नाही कां तुला. साहिल त्याही स्थितीमध्ये निशापासून दूर होण्याचा प्रयत्न करत असतो ते पाहून निशा त्याला तिथेचं बेडवर टाकून रागाने निघून जाते.

निशा रूममध्ये येते आणि रडून, सुडाने पेटून उठते आणि बोलते कशी तुला सानिका मिळते तेच बघते मी आता, एवढ्या मोठ्या मालकीनीला नाकारतोस काय.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत निशा चा सूड तीला कुठे नेवून पोचवतो ते )

🎭 Series Post

View all