वणवा - भाग - 15

vanva
नशिबाचा वणवा - भाग - 15

दुस्र्या दिवशी सकाळी निशा उठून तयार होऊन साहीलच्या रूममध्ये जाते आणि बोलते एक तासाने तयार रहा, आपल्याला एक मिटिंग करून लगेचं दुपारी परतीच्या प्रवासाला निघायचं आहे. ओके मॅडम बोलून साहिल गप्प बसतो. त्याला निशाकडे बघावंसं पण वाटतं नसतं एवढा त्याला निशाचा राग आलेला असतो.

दोघे एक तासाने मिटिंग आटपून पुन्हा घरी जायला निघतात. निशा एका ठिकाणी जेवायला थांबूया म्हणते आणि मग दोघे जेवायला जातात. साहिल काहीच बोलत नसतो, शांत शांत असतो. तिथे हॉटेल मध्ये जेवणं ऑर्डर करून दोघे बसलेले असतात. निशा बोलायला सुरवात करते......

साहिल, आय लव्ह यू, आय कान्ट लिव्ह विथ आऊट यू, रडतं रडतं निशा बोलू लागली हे तीन शब्द बऱ्याच लोकांना समाधान देतात. पण हे शब्द तू मला बोलावेस अशी खूप अपेक्षा होती रे, प्लिज माझा स्वीकार कर रे... काय कमी आहे माझ्यात, मी सुंदर आहे, एका मोठ्या कंपनीची मालकीण आहे. मी खूप प्रेम करते रे तुझ्यावर, असा मला झिडकारू नकोसं, मी तुला खूप मोठं करेन, कंपनीमध्ये पार्टनर करेन, तू मला कां नाही म्हणतो आहेस असं बोलून निशा अजून हुंदके देऊन रडू लागली.

साहिल बोलू लागला, बट आय हेट यू, माझं सानिकावर प्रेम आहे, आणि मला ती खूप आवडते, आणि मला सानिकाशी लग्न सुद्धा करायचं आहे. सानिका आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही दोघे हे तुम्हाला आणि सुलभा आईला लवकरच सांगणार होतो पण त्या आधीच तुम्ही मिटिंगच ठरवलत आणि मग हे सगळं असं झालं..

निशा चिडली, मी लग्न चं होऊन देणार नाही तुमच्या दोघांचं, कसे करता लग्न ते बघतेच मी, असं बोलून ती रागाने गाडीत जाऊन बसली. साहिल तिथेच विचार करत खुर्चीत बसून राहिला. लग्न होऊच देणार नाही म्हणजे काय करणार आहेत मॅडम, असे अनेक विचार त्याच्या मनात येऊ लागले.

सानिकाला गेल्या गेल्या हे सगळं सांगायला हवे आणि लग्नाचा निर्णय पण घ्यायला हवा नाहीतर मॅडम काहीतरी वेगळंच करतील असं त्याला खूप वाटू लागलं तो मनातून खूप घाबरला, सानिकाचं प्रेम आणि घरी मामाला सांगण्यापासून घाईत लग्न कां करायला हवं असं सगळं सविस्तर घरी जाऊन आजच बोलायला हवं असा विचार करत तो दहा मिनिट तिथेच बसून राहिला आणि थोड्या वेळाने तो गाडीत जाऊन बसला.

साहिल गाडीत बसल्या बसल्या निशा बोलली हे आपल्या दोघांमधलं बोलणं जर सानिकाला सांगितलंस ना तर फार वाईट परिणाम होतील समजलं तुला, हूं बोलून साहिल बाहेर बघत बसला.

दोघे घरी पोचतात, साहिलने घरी घरी गेल्या गेल्या मामा, मामीला सांगितलं की मला उद्याच्या उदया एका अडचणीमुळे सानिकाशी लग्न करावं लागतंय, प्लिज मला मदत करा. मामा बोलला, बरं बाबा तुझी इच्छा असेल तर आम्ही कोण तुला अडवणारे. साहिल बोलतो, उदया चं सकाळी लग्न करायचं आहे मी मित्राशी बोलून तयारी करतो सगळी.

साहिलने सानिकाला कॉल करून सांगितलं उदया सकाळी आपण दोघे गुपचूप लग्न करतोय कां, कशाला ते सगळं नंतर सांगेन, तू तयार आहेस ना, सानिका बोलली अरे मी तयार आहे रे, पण काय झालं, साहिल बोलला सानिका उदया जर आपण लग्न केले नाही तर कठीण होईल सर्व, आणि ऐक हे घरी कोणालाही बोलू नकोसं. लवकरात लवकर लग्न करू, मी कां असं केलं ते तुला मी निवांत सांगेन. निशा मॅम ला चुकून पण कळलं नाही पाहिजे नाहीतर त्या तुला आणि मला कधीच एक होऊन देणार नाहीत.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - सानिका आणि साहिलंच असं अचानक लग्न झालेलं बघून निशा काय गोंधळ घालते ते )

🎭 Series Post

View all