वणवा - भाग - 18

vanva
नशिबाचा वणवा - भाग - 18

साहिल आणि सानिका घरातून निघून जातात. निशा घरात खूप आदळाआपट करते, सुलभा काकीं तीला समजावत असतात पण ती कोणाचंचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते. निशा खूप चिडलेली असते. ती मनात विचित्र विचार करू लागते.

हिचा संसार कसा सुखाचा होऊ देऊ मी, माझ्या वाट्याचं सुखं हिने हिरावून घेतलं आहे, सानिका मध्ये आली नसती तर मी आणि साहिलने लग्न केलं असतं ह्या वाड्यात आम्ही दोघे आनंदाने राहिलो असतो. पण तो साहिलपण करंट्या नशिबाचा निघाला हे ऐश्वर्य त्याच्या वाटयाला आलं नाही. साहिल ला मी कंपनीमध्ये एम डी केलं असतं तो हुशार पण होताच. आम्ही दोघे मिटिंग साठी बाहेरगावी गेलो असतो, बिजनेस कपल म्हणून फेमस झालो असतो पण साहिलने माझं प्रेम नाकारलं.. साहीलच्या नावाने ती मनातल्या मनात बडबडू लागते.

साहिलला कसं संपवता येईल असा विचार ती करू लागते. आता हा साहिल पण सानिकाच्या मदतीने बॉस च्या बरोबरीने मिरवू लागेल. त्याला ह्या सगळ्यातून दूरच केले पाहिजे असा ती विचार करू लागते. ह्या प्रॉपर्टीमध्ये मी त्याला अधिकार देणार नाही. त्याला संपवणार मी असा प्लॅन ती करू लागते.

इकडे साहिल आणि सानिका नव्या घरी जातात, साहिल च्या मामा - मामींनी त्यांच्या गृहप्रवेशाची तयारी करून ठेवलेली असते. सानिकाचा नवीन घरात गृहप्रवेश होतो. साहिलचे मामा - मामी भेट म्हणून त्यांना चार दिवसाची हनिमूनटूर ची तिकीट देतात. दोघेही दुस्र्या दिवशी सकाळी निघतात.

सानिका आणि साहिल मुद्दामच आपले फोन्स ऑफ करून ठेवतात कारण त्यांना माहित असते निशा ते दोघही ऑफिसला गेले नाहीत बघून कॉल करत राहणार. म्हणून दोघेही फोन बंद करून ठेवतात. इकडे निशा दुपारचे बारा वाजले तरी दोघे ऑफिसला आले नाहीत म्हणून त्यांना फोन लावून बघते तर दोघांचे बंद येतात ती रेसेपशन वर चौकशी करते तर ती बोलते सर आणि मॅडम चार दिवसांनी येणार आहेत ते दोघे बाहेर जातायत असा त्यांचा कॉल आला होता. निशा चिडचिड करते.

सानिका आणि साहिल सहाव्या दिवशी ऑफिसला येतात. सानिका आल्या आल्या स्टाफला बोलते आता साहिल सर पण तुमचे बॉस असतील त्यांच्याशी मानाने चं बोलायचं. निशा तिच्याकडे रागाने बघत असते. सानिका दोनच दिवसांत साहिलसाठी नवीन मोठी कॅबिन बनवून घेते.

असेचं दिवस जात असतात. दोघीं बहिणीं एकमेकींशी कामाव्यतीरिक्त एक शब्दसुद्धा बोलत नसतात. साहिल त्याचं कामं बरं आणि तो बरं असा अलिप्त वागत असतो. साहिल आणि सानिका एकत्रच ऑफिसला येत असतं, ते बघून निशाचा जाळफळाट होतं असे. ती रोज ह्यांचं नातं कसं तोडता येईल ह्याचा विचार करत असते. साहिलला मारलं तर ह्यांचा संसार हे नातं सगळंच संपेल आणि सानिका नाइलाजाने वाड्यात रहायला येईल असं सगळं तिच्या डोक्यात येत असे.

सानिका आणि साहिलचा संसार सुखाचा चाललेला असतो, बघता बघता त्यांच्या लग्नाला वर्ष होतं, दोघीं बहिणीं अजूनही बोलत नसतात. सुलभा काकीं हल्ली सारख्या आजारी पडत असतं, त्यांची ट्रीटमेंट केली जाते, त्यांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्याच निदान होतं, त्यांचं डायलेसिस सुरु होतं.

साहिल आणि सानिका अधून - मधून सुलभाकाकींना बघायला येत असतं. पण निशाबरोबर बोलत नसतं. दोघे जरा हसत बोलले तरी निशा मनातून त्यांना शाप देत असे. हसा, हसा किती दिवस हा आनंद टिकतोय ते बघा असं मनातून बोलत असे. तीला त्या दोघांचं नातं बघून राग येत असे.

आजारानंतर तीन महिन्यांनी सुलभाकाकीं जग सोडून जातात. निशा एकटीच वाड्यात उरते. ती सुलभाकाकीच्या कार्याच्या दिवशी सानिका आणि साहिलला बोलते जे झालं ते विसरून जाऊया, मी विनंती करते की तुम्ही दोघेही इथे रहायला या, मी तुम्हाला कसलाही त्रास देणार नाही.

साहिलला वाटतं असतं की नक्कीच हिच्या मनात काहीतरी चाललं आहे, पण सानिका त्याला बोलते असं नसेल रे ती एकटी पडलीय म्हणून तीला आपली चुक कळली असेल. ती मनापासून रडून बोलत होती, सानिकाच्या हट्टापुढे साहिलंच काही चालत नाही आणि मग दोघे वाड्यात रहायला येतात.

निशा काहीच झालं नव्हतं असं वागत असते, अगदि आपलेपणाने त्या दोघांबरोबर वागत असते. त्यामुळे निशाच्या मनात काहीतरी काळभेर आहे हा साहीलच्या मनातला विचार पण कालांतराने निघून जातो. तीन महिने अगदी छान जातात.

पण निशाच्या मनातला साहिलबददलचा राग तीला स्वस्थ बसू देत नव्हता. साहिलला मारण्यासाठी कोणाला तरी सुपारी द्यावी हा विचार करत ती दोन वर्ष घालवते. त्या दोघांच्या लग्नानंतर दोन वर्षांनी तीला एक व्यक्तीं भेटतो आणि ती त्याला साहीलच्या गाडीला ठोकण्यासाठी सांगते, त्यात साहिलचा जीव गेला पाहिजे असं ही सांगते. निशा त्या माणसाला बारा लाखाची सुपारी देते.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - ह्या सगळ्यात साहिलचा जीव पण जातो आणि निशाला सजा होते की नाही ते )

🎭 Series Post

View all