वणवा - भाग - 19

vanva
नशिबाचा वणवा - भाग - 19

( मागच्या भागात आपण बघितले - निशा साहिलला मारण्यासाठी बारा लाखाची सुपारी देते आता पुढे - )

सानिकाला जरा मळमळत असतं म्हणून ती निशा आणि साहिलला बोलते आज मी ऑफिसला येत नाही आहे, घरीच आराम करते आहे, साहिल तीला बोलतो बरं ठीक आहे तू आराम कर. निशा पण तीला हो आराम कर तू असं बोलून घाईघाईने निघून जाते.

निशा बोलते तुम्ही बोलत बसा मी पुढे जाते. निशा निघून गेल्यावर सानिका साहिलला बोलते, बहुतेक मी प्रेग्नेंट आहे आपण आज संध्याकाळी डॉक्टरकडे जाऊन कन्फर्म करून येऊया. साहिल खूप खुश होतो आणि बोलतो आपण मी संध्याकाळी आलो की डॉक्टरकडे जाऊया. आणि साहिल अर्ध्या तासाने निघतो.

निशा ऑफिसला निघून जाते. आणि त्या माणसाला कॉल करून सांगते आज साहिल ऑफिसला एकटाच येणार आहे त्यामुळे अशी संधी पुन्हा लवकर येणार नाही, आजच त्याला उडवायचा प्लॅन करा. निशा मनातून खुश असते. तीला साहिलला तीने हॉटेलमध्ये प्रपोज केल्यावर नाही बोलला होता तो क्षण आठवतो आणि तिच्या मनात राग उफाळून येतो. मला नाकारलं होतं ना घे आता कर्माची फळं असं ती मनातल्या मनात बोलते.

अकरा वाजताच्या दरम्यान तो माणूस निशाला कॉल करून सांगतो, गाडी ला ठोकलं आहे, मी शहराबाहेर निघून जातोय, तुमचं कामं फत्ते झालेलं आहे, ऍक्सीडंट झाला आहे असंच वाटते आहे, मी पटकन तिथून कसाबसा सटकलो आहे, बाकीचं तुम्ही सांभाळून घ्या, निशा हो, थँक यू बोलून फोन कट करते.

अर्ध्या तासाने त्या जागेवरून सानिकाला फोन येतो आणि एक माणूस फोनवर विचारतो हे साहिल कोण तुमचे, सानिका बोलते माझे मिस्टर, तो माणूस सांगतो त्यांचा ऍक्सीडेन्ट झाला आहे, आम्ही त्यांना सिटी हॉस्पिटल्ला नेतो आहे, सानिका रडतं रडतं हो मी लगेचच पोचते बोलून फोन ठेवते. सानिका निशाला कॉल करून लगेचं हॉस्पिटलला पोचायला सांगते.

सानिका हॉस्पिटल्मध्ये पोचते, साहिलचा जीव गेलेला असतो, ती रडते, तेवढ्यात निशा तिथे पोचते आणि हे कसं झालं अगं सानिका आपला साहिल असा कसा सोडून गेला आपल्याला असं बोलून जोरजोरात रडायला लागते. निशा तीने काहीच केलेलं नाही असं भासवते.

सानिका बोलते साहिल मी आपल्या बाळाची आई होणार आहे आणि तू असा मला कसा सोडून गेलास. हे ऐकून निशा स्तब्ध होते. निशा मनातून चरकते. प्रेत घरी आणण्यात येत. पोलीस चौकशी साठी येतात. वर वर बघता एकसिडेन्टचं वाटतं होता. सानिका अगदी खचलेली असते.
साहिलला नेण्यात येत. सानिका मनातून म्हणते साहिल तुझ्या पाठीमागे मला सुद्धा जगावंसं वाटतं नाही आहे पण आपल्या बाळासाठी मी जगेन, त्याला तुझ्या आठवणी सांगेन.

निशा साहिलला पंधरा दिवस झाल्यावर ऑफिसला जायला सुरवात करते. सानिका बोलते मी तिथे येण्याची माझी अजून मनस्थिती चं नाही आहे, तिथे साहीलच्या खूप आठवणी आहेत. निशा हो आरामात ये असं बोलून निघते.

निशा गेल्यावर सानिका विचार करत बसते की रोज आम्ही दोघे एकत्रच ऑफिसला जात होतो त्या दिवशी साहिल एकटा गेला आणि हे असं घडलं, तो एकटा चं जातोय हे मी निशा सोडून कोणालाच माहित नव्हतं. बरं त्याचं गाडी चालवण पण व्यवस्थित होतं मग असं का व्हावं.

अचानक तीला मनातून वाटू लागत निशाचा तर ह्यात हात नाही ना कारण तीला माहित होतं, साहिल एकटाच ऑफिसला जातोय ते...

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - निशाला सजा होते आणि सानिका आणि तिचा मुलगा भविष्यात कसे पुढे जातात ते )

🎭 Series Post

View all